AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge..

रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर ठाकरे गटातून हकालपट्टी झालेले बाळ माने यांनी सोशल मीडियावर सूचक स्टेटस ठेवले आहे. या स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.

उद्धव ठाकरेंनी पक्षातून हकालपट्टी करताच बाळ मानेंची पोस्ट, म्हणाले Revenge..
Bal mane uddhav thackeray
| Updated on: Jun 05, 2026 | 9:15 AM
Share

राज्यातील १७ स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद मतदारसंघासाठी १८ जूनला मतदान होणार आहे. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार (शिवसेना ठाकरे गट) सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली. यामुळे राजकीय वातावरण तापले आहे. निवडणुकीतून माघार घेतल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्यांची पक्षातून हकालपट्टी केली होती. या सर्व घडामोडींनंतर बाळ माने यांनी एक त्यांच्या सोशल मीडियावर एक स्टेटस शेअर केले आहे. त्यांच्या या स्टेटसवरुन राजकीय वर्तुळात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.

राज्यातील विधानपरिषद निवडणुकीसाठी काल ४ जून रोजी अर्ज परत घेण्याचा शेवटचा दिवस होता. या शेवटच्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत वेगवान घडामोडी घडत असल्याचे पाहायला मिळाले. त्यातच रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग विधानपरिषद मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार सुरेंद्र ऊर्फ बाळ माने यांनी थेट भाजपचे मंत्री नितेश राणे यांच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल होत आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. यामुळे ठाकरे गटात मोठा राजकीय भूकंप झाला. या संपूर्ण हायव्होल्टेज ड्रामावर बाळ माने यांनी अद्याप कोणतीही अधिकृत पत्रकार परिषद घेतलेली नाही. मात्र, पक्षातून झालेल्या हकालपट्टीनंतर अवघ्या काही तासांतच त्यांनी आपल्या सोशल मीडिया स्टेटसवरून अत्यंत सूचक आणि मार्मिक पोस्ट ठेवल्या आहेत. त्यांच्या या व्हॉट्सॲप स्टेटसची संपूर्ण कोकणात चर्चा पाहायला मिळत आहे.

संशय, प्रेम आणि विश्वासावर सूचक भाष्य

बाळ माने यांनी आपल्या व्हॉट्सॲप स्टेटसवर एक अत्यंत मार्मिक संदेश पोस्ट केला आहे. त्यात ते म्हणाले, मनाच्या ज्या दरवाज्यातून संशय आत प्रवेश करतो… त्याचवेळी त्या दरवाजातून प्रेम आणि विश्वास दोघेही बाहेर पडतात. शुभ दिवस. Revenge is just a waste of time, असे बाळ माने यांनी म्हटले आहे. बदला घेणे हा केवळ वेळेचा अपव्यय आहे, असे सूचक विधान बाळ माने यांनी केले आहे. यामुळे सध्या चर्चांना उधाण आले आहे.

या राजकीय स्टेटसव्यतिरिक्त बाळ माने यांनी आपल्या दुसऱ्या एका स्टेटसच्या माध्यमातून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर (श्रीगुरुजी) यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन केले आहे. बाळ माने हे मूळ भाजपचे नेते आहेत. त्यामुळे ते पुन्हा मूळ विचारांकडे म्हणजे भाजपमध्ये घरवापसी करणार असल्याचे बोललं जात आहे. त्यामुळे आता पक्षातून झालेल्या हकालपट्टीनंतर बाळ माने काय भूमिका घेतात याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Follow Us
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात
पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर...
Manoj Jarange | पोलिसांनी अडवलं तर बाजूला सारून पुढे जा; हल्ला केला तर... जरांगेंनी सांगितली आंदोलनाची रणनीती!
विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी...
Kunbi Certificate Update | विखे पाटलांच्या अध्यक्षतेखाली मोठी बैठक; कुणबी प्रमाणपत्रासाठी महत्त्वाचे निर्णय, जरांगेंच्या डेडलाइनपूर्वी सरकारची तयारी
मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर...अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा
Ambadas Danve | मागण्या तात्काळ मान्य करा, नाहीतर... जरांगे पाटलांच्या खालावलेल्या प्रकृतीवर अंबादास दानवेंचा सरकारला थेट इशारा