AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजितदादांच्या निधनानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांसह कोण कोण मैदानात? रोहित पवारांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार आज उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने पेच निर्माण झाला आहे.

अजितदादांच्या निधनानंतर बारामती कोणाची? सुनेत्रा पवारांसह कोण कोण मैदानात? रोहित पवारांच्या ट्वीटमुळे चर्चांना उधाण
Baramati By-Election 2026
| Updated on: Apr 06, 2026 | 9:40 AM
Share

महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीच्या उमेदवार आणि विद्यमान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आज दुपारी १२.३० वाजता या पोटनिवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी सत्ताधारी पक्षाकडून प्रयत्न सुरू आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने आपला उमेदवार जाहीर केल्याने बारामतीची रणधुमाळी रंगणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन

सुनेत्रा पवार या आज बारामती पोटनिवडणुकीसाठी अर्ज करणार असल्याने महायुतीकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येणार आहे. सुनेत्रा पवार यांचा अर्ज भरण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ उपस्थित राहणार आहेत. छगन भुजबळ हे या निवडणुकीत स्टार प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळणार आहेत. विशेष म्हणजे ते बारामतीत जाहीर सभाही घेणार आहेत.

तर दुसरीकडे बारामती पोटनिवडणुकीवरुन महाविकासआघाडीत पेच निर्माण झाला होता. शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने सुनेत्रा पवारांविरुद्ध उमेदवार न देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शिवसेना ठाकरे गटानेही सामंजस्याची भूमिका घेत अर्ज दाखल करणार नसल्याचे सांगितले आहे. पण काँग्रेसने मात्र अ‍ॅड. आकाश मोरे यांना उमेदवारी दिली आहे. आकाश मोरे हे माजी आमदार विजय मोरे यांचे पुत्र असून निष्ठावान काँग्रेस कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनीही निवडणुकीत उडी घेण्याचे संकेत दिले आहेत. त्यांची मनधरणी करण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते दत्तात्रय भरणे यांनी त्यांची भेट घेतली. मात्र अद्याप त्यांच्याबद्दलची कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्या – रोहित पवार

तसेच आमदार नितेश राणे आणि रोहित पवार यांनी ही निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. रोहित पवार यांनी एक ट्वीट केले आहे. बारामती विधानसभा मतदारसंघात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी मा. सुनेत्राकाकी आज उमेदवारी अर्ज दाखल करतायेत. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी आमच्या सर्वांची इच्छा आहे, त्यामुळं उमेदवारी अर्ज भरणाऱ्या इतरांना आणि त्यांच्या पक्षालाही ही निवडणूक बिनविरोध करण्याची आमची विनंती आहे आणि ते मान्य करतील असा विश्वास आहे, परंतु तसं झालं नाही तर आजही अजितदादाच ही निवडणूक लढवत आहेत, असं समजून बारामतीकरांनी सुनेत्राकाकींना विक्रमी मताधिक्याने निवडून द्यावं, असं आवाहन करतो! तुमचं एक मत हीच अजितदादांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली ठरेल..!, असे आजित पवारांनी म्हटले आहे. मात्र, विरोधकांनी हा प्रस्ताव फेटाळून लावत लोकशाहीत निवडणूक लढवण्याचा अधिकार असल्याचे म्हटले आहे.

यावर विविध नेत्यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. विरोधकांना आपली स्थिती माहित आहे, त्यामुळे केवळ क्रेडिट घेण्यासाठी त्यांनी पाठिंबा देण्याचे नाटक केले असावे. कोणीही विरोधात उभे राहिले तरी सुनेत्रा पवार विक्रमी मतांनी विजयी होतील, असे केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी म्हटले. तर काँग्रेस उमेदवार आकाश मोरे यांनी आम्ही काँग्रेस म्हणून सक्षमपणे लढणार आहोत. २१ एप्रिलपर्यंत दिवसाची रात्र करून जनतेपर्यंत पोहोचू आणि त्यांचे प्रश्न मांडू, असे म्हणत मैदानात उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक २०२६

केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केल्यानुसार, बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीची प्रक्रिया खालीलप्रमाणे पार पडेल:

  • निवडणूक अधिसूचना प्रसिद्ध होणे: २७ मार्च २०२६
  • उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख: ६ एप्रिल २०२६
  • उमेदवारी अर्जांची छाननी: ७ एप्रिल २०२६
  • अर्ज मागे घेण्याची अंतिम मुदत: ९ एप्रिल २०२६
  • मतदान कधी: २३ एप्रिल २०२६
  • मतमोजणी आणि निकाल: ०४ मे २०२६
  • निवडणूक प्रक्रिया पूर्ण होण्याची तारीख: ०६ मे २०२६

Follow Us
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या...
वांद्र्यातील अनधिकृत बांधकाम कारवाईवर काँग्रेस नेता संतापला, त्या....
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.