Baramati Rahuri Assembly Bypoll 2026 :संजय निरुपम यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र
Baramati Rahuri Assembly Bypoll 2026: दिवंगत अजित पवार यांच्या निधनामुळे बारामती विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात पोटनिवडणूक घेतली जात आहे. तर भाजपचे ज्येष्ठ आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे राहुरी विधानसभा मतदारसंघाची जागा रिक्त झाली आहे.

आज बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी मतदान पार पडत आहे. नुकतंच या दोन्ही ठिकाणच्या मतदानाला सुरुवात झाली आहे. राज्याच्या राजकारणात अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या या दोन्ही मतदारसंघांतील जागा लोकप्रतिनिधींच्या निधनामुळे रिक्त झाल्या होत्या, ज्यामुळे ही निवडणूक जाहीर करण्यात आली. बारामतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार रिंगणात आहे. तर राहुरीमध्ये दिवंगत शिवाजी कर्डिले यांचे पुत्र अक्षय कर्डिले (भाजप) आपले नशीब आजमावत आहेत. सकाळी 7 वाजल्यापासूनच मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्या असून, प्रशासनाने कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आतामहाराष्ट्राचे लक्ष मतदानाकडे आणि 4 मे रोजी लागणाऱ्या निकालाकडे लागले आहे. आज होणाऱ्या बारामती आणि राहुरी विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीबद्दल आणि देश – विदेश, राजकीय आणि तसेच अन्य घडामोडी जाणून घेण्यासाठी हा ब्लॉग फॉलो करा…
LIVE NEWS & UPDATES
-
कोल्हापूर : आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात आंदोलन
कोल्हापूरात आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात डाव्या आघाडीकडून निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज चौकात आंदोलनाला सुरवात झाली आहे. यावेळी आमदार गायकवाड यांच्या अटकेची मागणी करण्यात येत आहे.
-
मुंबई : 34 लाखांचे दागिने चोरणाऱ्यांना अटक
मुंबईतील चारकोप पोलिसांनी एका महिलेच्या घरातून 34 लाख रुपयांचे दागिने चोरणाऱ्यांना अटक केली आहे. मोहिनी चौधरी नावाच्या महिलेच्या घरातील कपाट फोडून चौरी केल्याप्रकरणी एका महिलेला आणि एका पुरुषाला अटक करण्यात आली आहे, तसेच सर्व दागिने जप्त केले आहेत.
-
-
नाशिक : सप्तशृंगी देवीच्या नक्षीकामात 22 चांदीची तफावत
नाशिक जिल्ह्यातील प्रसिद्ध देवीस्थान सप्तशृंगी मंदिर वणी येथे चांदीच्या नक्षीकामात तब्बल २२ ते २३ किलो चांदीची तफावत आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ मानल्या जाणाऱ्या या मंदिराच्या ट्रस्टच्या कारभारावर आता गंभीर संशय व्यक्त केला जात असून मंदिर प्रशासनाची विश्वासार्हता राहिली आहे का? असा सवाल उपस्थित होऊ लागला आहे.
-
संजय निरुपम यांचे मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र
शिवसेना नेते संजय निरुपम यांनी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या मुद्द्यावर मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र लिहिले आहे. या पत्राद्वारे रिक्षा-टॅक्सी चालकांच्या मराठी भाषेच्या सक्तीबाबत पुनर्विचार करण्यासाठी विनंती निरुपम यांनी केली आहे.
-
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपचे निकष ठरले… आज रात्री १० वाजता पुन्हा भाजपच्या कोअर कमिटीची वर्षा निवासस्थानी बैठक… कालच्या बैठकीत पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील नावांवर खलबतं.. .आज उर्वरित विभागातील नावांवर चर्चा होणार
-
स्थलांतरित लोक चीन- भारत या नरकसदृश्य ठिकाणाहून अमेरिकेत येतात-ट्रम्प
स्थलांतरित लोक चीन- भारत या नरकसदृश्य ठिकाणाहून अमेरिकेत येतात.. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत आणि चीनबद्दल हे आक्षेपार्ह विधान केलंय…. अमेरिकेतील जन्मसिद्ध नागरिकत्वासंदर्भात बोलतांना ट्रम्प यांनी हे वादग्रस्त विधान केलयं…
-
सप्तश्रृंगी मंदिरातून 22 किलो चांदी गायब
साडेतीन शक्तिपीठांपैकी एक सप्तश्रृंगी मंदिर ट्रस्टमध्ये तब्बल 22 किलो चांदीची तफावत समोर आल्यानं खळबळ उडालीये… जिल्हाधिकारी कार्यालयानं याबाबत गंभीर दखल घेत सखोल चौकशीचे आदेश दिलेत…..
-
परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरणातील आरोपी अयान अहमदनं वापरलेली थार जप्त
अमरावतीच्या परतवाड्यातील लैंगिक शोषण प्रकरण. आरोपी अयान अहमदने वापरलेली थार पोलिसांकडून जप्त. परतवाडा पोलिसांच्या खाक्या चर्चेत, आरोपी अयानची धिंड काढली. अयानला फ्लॅट उपलब्ध करुन देणारा मानव सुगंधेची प्रकृती बिघडली
-
एलपीजी गॅस पंप चालकाने नियमाचे उल्लंघन केले तर कारवाई
ऑटो एलपीजी गॅस पंप चालकाने नियमाचे उल्लंघन केले तर होणार कारवाई. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांचा इशारा. जिल्ह्यासाठी 1 लाख 44 हजार लिटर केरोसीनचा कोटा मंजूर, 62 रुपये निघाला दर. या आठवड्यात केरोसीन वितरित केलं जाईल, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांची माहिती.
-
पियुष गोयल यांच्याकडून मोफत वैद्यकीय शिबिराचे उदघाटन
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी मुंबईतील बोरिवली येथे मोफत वैद्यकीय शिबिर आणि रुग्णवाहिकेचे उद्घाटन केले.” ही रुग्णवाहिका गरिबांसाठी मोफत असेल. आम्ही प्रत्येक मतदारसंघात अशा रुग्णवाहिकांची संख्या वाढवू. भगवती रुग्णालयही लवकरात लवकर पुन्हा सुरू करू. शताब्दी रुग्णालयाला पहिले उच्च दर्जाचे रुग्णालय बनवणार” असं पियुष गोयल म्हणाले.
-
तोतया इस्त्रो सायंटिस्टचा पर्दाफाश
मॅट्रिमोनियल वेबसाईटवर फेक प्रोफाइल अकाउंट बनवून महिलांची फसवणूक करणाऱ्या तोतया इस्त्रो सायंटिस्टचा पर्दाफाश. मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मवर इस्त्रोमध्ये सायंटिस्ट असल्याचे फेक प्रोफाइल अकाउंट बनवून घातली लग्नासाठी मागणी. फिर्यादीच्या मुलीच्या शिक्षणाचा सगळा खर्च उचलणार असे सांगून केला विश्वासन संपादन.
-
ज्या दिवशी संपावर जाल, त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू – अविनाश जाधव
“महाराष्ट्रात राहतात तर त्याचा वास्तव्याचा दाखला आणि मराठी बोलता आलं पाहिजे. मराठी येत नसेल तर त्यांचं लायसन्स परवाना रद्द झाला पाहिजे. ज्या अधिकाऱ्याने लायसन्स आणि परवाना दिला आहे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. ज्या दिवशी संपावर जाल, त्या दिवशी आम्ही रस्त्यावर उतरू. सदावर्ते हा खोटा माणूस आहे. पोलीस संरक्षणासाठी सदावर्ते असे करत आहे. निर्णयाचे स्वागत करतो” असं मनसे नेते अविनाश जाधव म्हणाले.
-
बीड कारागृहातील कैद्यांना हलवा -धनंजय देशमुख
बीड कारागृहात कैद्यांना मारहाणप्रकरणात धनंजय देशमुख मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिणार आहे. पुढच्या आठवड्यात मी सीएम साहेबांशी पत्र व्यवहार करणार आहे. चाललेले जे काही प्रकार आहेत त्याला कायमचं बंद करण्यासाठी त्याच्यावर काय उपाय योजना करता येतील या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी मुख्यमंत्र्यांकडे जाणार आहे. सर्व कैद्यांचे वेगवेगळ्या ठिकाणी ट्रान्सफर करण्यासाठी पत्र देणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.
-
बीडच्या कारागृहातून आणखी एक रेकॉर्डिंग व्हायरल
बीडच्या कारागृहातून आणखी एक ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यामध्ये ज्या अझर पठाण नावाच्या कैद्याने त्याला सुदर्शन घुले व प्रत्येक घुले यांनी मारहाण केल्याचा दावा केला होता त्यानेच आता. आमचा वाद मिटला होता. या लोकांनी भीती दाखवून मला हे करायला लावलं. मला हा सर्व प्रकार सनी आठवले व परभणे यांनी करायला भाग पाडले. यामध्ये जेलचा एक कर्मचारी देखील सहभागी आहे.. मला त्याचे नाव माहीत नाही.. मस्साजोग येथील इलेक्शन होत आहे.. त्यासाठी हे सगळं सुरू आहे. वाल्मीक आण्णा कराड ला टार्गेट केले जात आहे. या लोकांनी मला भीती दाखवून हे करायला लावले. जरांगे पाटील यांचा या प्रकरणात संबंध नाही. ही सगळी खिंडकर याची शाळा आहे, असा संवाद या ऑडिओ क्लिपमध्ये आहे.
-
डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत सांगलीच्या तलाठ्यांना पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते लॅपटॉप वाटप
सांगलीमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत तलाठ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले आहे.सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुक्यातील 53 तलाठयांना प्राथमिक स्वरूपात लॅपटॉप वाटप करण्यात आले,या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.सांगली जिल्ह्यासाठी साडेतीनशे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत.या लॅपटॉपच्या माध्यमातून अधिक पद्धतीने नोंदी ठेवणं सोपं जाणार असून शेतकरयांच्या वेदना लक्षात घेऊन शेतकरयांच्या अडचणी सोडवण्याचे काम तलाठ्यांनी करावं,असं आवाहन या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
-
बोरवेल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी गाठली पंचायत समिती
भर उन्हाळ्यात पाणीची समस्या असून ग्रामपंचायत आणि प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप होत आहे. गोंदिया जिल्ह्यातील ग्रामस्थांनी बकेट आणि गुंडी घेऊन गटविकास अधिकाऱ्यांचे केबिन गाठले. आता तरी प्रशासन बोरवेल दुरुस्त करून पाणी समस्या दूर करेल का नागरिकांचे लक्ष लागलं आहे.
-
खासदार नरेश म्हस्के राज ठाकरे यांच्या भेटीला
माझ्या आयुष्यातील राजकारणाची सुरुवात ही विद्यार्थीदशेपासून झाली, आणि त्या प्रवासात ज्यांच्या नेतृत्वाखाली पहिलं पाऊल टाकलं, ते म्हणजे राज ठाकरे. त्यांच्या विचारांमधून, त्यांच्या ठाम भूमिकांमधून आणि लोकांशी जोडून घेण्याच्या शैलीतून नेतृत्व कसं असावं, हे शिकायला मिळालं. नुकतीच त्यांची सदिच्छा भेट घेतली. अनेक दिवसांनी त्यांच्याशी मनमोकळ्या गप्पा झाल्या आणि जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. त्यांनी देखील नेहमीप्रमाणे आपुलकीने विचारपूस केली आणि एक कार्यकर्ता म्हणून माझ्यावर कायम विश्वास दाखवत सदिच्छा दिल्या असे भेटीनंतर खासदार नरेश म्हस्के यांनी प्रतिक्रिया दिली.
-
विजय वडेट्टीवार यांचा भाजपवर हल्लाबोल
गिनीज बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव नोंदलं जाईल अशा पार्टी कडून महिला विधेयक संदर्भात काँग्रेसचा अपप्रचार केला जातो. काँग्रेस महिला विरोधी ठरवलं जात आहे. मोदी यांनी देशाला संबोधलं तो प्रचार होता का, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी विचारला. काँग्रेसने मागणी केली होती की 2024 ला बिल आणावे. हे लागू करतात 2029 ला. यांचा कुटिल डाव आहे. कटकारस्थान आहे.गिरे तो भी टांग उपर असा यांचा थाट आहे, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.
-
गोंदियात बोअरवेल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती गाठली
गोंदियात बोअरवेल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत सदस्यांनी पंचायत समिती गाठली आहे. भर उन्हाळ्यात पाणीची समस्या असून ग्रामपंचायत आणि प्रशासन दुर्लक्ष करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बादली आणि गुंडी घेऊन ग्रामस्थांनी गटविकास अधिकाऱ्यांचं कार्यालय गाठलं आहे.
-
बारामतीत भरउन्हातही नागरिकांचा मतदानासाठी उत्साह
बारामती विधानसभा मतदारसंघ पोट निवडणूक-२०२६ मध्ये दुपारी १ वाजेपर्यंत ३१.९१ टक्के मतदान झाले. उन्हाचा पारा वाढला असल्याने दुपारी मतदारांची संख्या रोडवण्याची शक्यता आहे. तर चार वाजेनंतर पुन्हा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता आहे.
-
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी दुपारी 1 वाजेपर्यंत 31.91% मतदान
बारामती विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी आज मतदान पार पडलंय. दुपारी एक वाजेपर्यंत मतदारसंघात 31.91 टक्के मतदान झालं आहे.
-
यंदा केंद्र सरकारकडून दोन लाख मेट्रिक टन कांद्याची बंपर खरेदी होणार
यंदा केंद्र सरकारकडून दोन लाख मेट्रिक टन कांद्याची बंपर खरेदी होणार आहे. नाफेड एनसीसीमार्फत दरवर्षीप्रमाणे यंदाही खरेदी केली जाणार आहे. नाफेडने बाजार समितीतून कांद्याची खरेदी करावी अशी शेतकऱ्यांची मागणी आहे. या मागणीची दाखल घेत लासलगाव आणि पिंपळगाव इथल्या गोडाऊनमध्ये आधुनिक कांदा चाळीची उभारणी करण्यात आली आहे.
-
कॉंग्रेसला महिलाविरोधी ठरवलं जात आहे- वडेट्टीवार
“गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नाव नोंदवलं जाईल अशा पार्टीकडून महिला विधेयकासंदर्भात काँग्रेसचा अपप्रचार केला जातो. कॉंग्रेसला महिलाविरोधी ठरवलं जात आहे. मोदी यांनी देशाला संबोधलं, तो प्रचार होता का? यांचा हा कुटील डाव आहे, कटकारस्थान आहे,” असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला.
-
रिक्षाचालकांना मराठी सक्तीविरोधात गुणरत्न सदावर्ते हे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या भेटीला
1 मे पासून रिक्षाचालकांना मराठी भाषा सक्तीची करण्याच्या निर्णयाला काही संघटनांनी विरोध केला आहे. मिरा भाईंदरचे भाजप आमदार नरेंद्र मेहता यांची भेट घेण्यासाठी भाजप जिल्हा कार्यालयात वकील गुणरत्न सदावर्ते दाखल झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर वकील गुणरत्न सदावर्ते आज मीरा-भाईंदरला भेट देणार आहेत. गोल्डन नेस्ट येथे रिक्षा युनियनच्या पदाधिकाऱ्यांशी ते महत्त्वाची चर्चा करतील. या बैठकीनंतर मराठी सक्तीच्या विरोधात सदावर्ते कोणती कायदेशीर भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
-
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट
गोरेगाव ड्रग्ज प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. वनराई पोलिसांनी आरोपी आयुष साहित्यकडून अमली पदार्थ जप्त केले. वनराई पोलिसांनी सुमारे 15 लाख रुपये किमतीच्या 933अमली पदार्थांच्या गोळ्या केल्या जप्त. अटक होण्यापूर्वी आयुषने त्याच्याकडील ड्रग्ज फेकून दिले होते, तेच पोलिसांनी जप्त केले. वनराई पोलीस या प्रकरणात आज दुपारी मोठा खुलासा करणार आहेत.
-
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे भाजपच्या विरोधात आंदोल
छत्रपती संभाजीनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे भाजपच्या विरोधात आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्याच्या विरोधातील काळे कायदे रद्द झाल्याच पाहिजे या मागणीसाठी आंदोलन करण्यात येत आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चुलीवर भाकरी थापत काँग्रेसने आंदोलन केलं असून शेतकरी विरोधी US ट्रेडी रद्द करा, MSP ची कायदेशीर देण्याची मागणीही करण्यात येत आहे. – गळ्यात भाजीपाल्याच्या माळा घालून, स्वतःच्या अंगावर दूध ओतून आंदोलक आक्रमक झाले आहेत.
-
छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान सहन करणार नाही – नवनाथ बन
छत्रपती शिवाजी महाराजांविषयी कोणीही अपशब्द वापरू नयेत, महाराजांचा अपमान महाराष्ट्रात कोणीही सहन करणार नाही असं भाजपच्या नवनाथ बन यांनी म्हटलं आहे. महाराजांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही नवनाथ बन यांनी केली आहे.
-
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर- सूत्रांची माहिती
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. जयदत्त क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशासाठी अनेकांच्या माध्यमातून लॉबिंग, क्षीरसागर यांच्या भाजप प्रवेशासाठी संतांनी मध्यस्थी केल्याची चर्चा आहे.
जयदत्त क्षीरसागर यांची ओबीसी नेते म्हणून ओळख आहे. त्यांनी दोन वेळेला कॅबिनेट मंत्रीपद भूषवलं आहे. अखिल भारतीय तैलिक महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जयदत्त क्षीरसागर कार्यरत आहेत .
-
भोंदू अशोक खरातला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
नाशिक – भोंदू अशोक खरातला पाचव्या गुन्ह्यात 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सहाव्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यासाठी SIT कडून न्यायालयाला विनंती करण्यात आली आहे. न्यायालयाच्या आदेशानंतर भोंदू खरातला SIT पुन्हा सहाव्या गुन्ह्यात ताब्यात घेणार आहे.
-
बारामती पोटनिवडणुकीसाठी पिंक मतदान केंद्र
बारामती पोटनिवडणुकीसाठी पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी विधानसभेला पिंक कलरचे कॅम्पेनिंग केले होते. त्यामुळे बारामतीकरांसाठी पिंक मतदान केंद्र जिव्हाळ्याचा विषय ठरतोय.
शहरातील जळोची भागातील तान्हाई नगर मध्ये हे पिंक मतदान केंद्र उभारण्यात आलं आहे. महिलांना सुरक्षित मतदान करता यावे यादृष्टीने या पिंक मतदान केंद्राची उभारणी केली आहे. केंद्रावर सहा कर्मचारी असून सर्वांनी पिंक रंगाच्या साड्या धारण केल्या आहेत.
-
गोरेगाव ड्रग्ज केसमध्ये वनराई पोलिसांना मोठे यश; आरोपी आयुष साहित्यच्या मुसक्या आवळल्या, महत्त्वाचे पुरावे हाती
गोरेगाव येथील ड्रग्ज प्रकरणाला आता एक वेगळे वळण मिळाले असून वनराई पोलिसांनी यातील आरोपी आयुष साहित्य याच्याकडून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत. अटक होण्याच्या भीतीने आयुषने आपल्याकडील ड्रग्ज फेकून देऊन पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला होता, मात्र पोलिसांनी सतर्कता दाखवत हे ड्रग्ज ताब्यात घेतले आहेत. या कारवाईमुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता असून, वनराई पोलीस आज दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणाचा मोठा खुलासा करणार आहे
-
बारामती पोटनिवडणूक: सकाळी 11 वाजेपर्यंत 20.59 टक्के मतदान; मतदारांमध्ये उत्साह
बारामती विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज सकाळपासूनच मतदानाला सुरुवात झाली आहे. मतदारांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे. पहिल्या चार तासांत म्हणजेच सकाळी ११ वाजेपर्यंत या मतदारसंघात २०.५९ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळच्या सत्रात ग्रामीण भागासह शहरातही मतदान केंद्रांवर रांगा लागल्याचे चित्र आहे. कडक बंदोबस्तात ही प्रक्रिया शांततेत पार पडत आहे. दुपारच्या सत्रात मतदानाचा टक्का आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
वर्ध्यात उन्हाचा कडाका वाढला, शाळांच्या वेळेत मोठा बदल
वर्धा जिल्ह्यात उन्हाची तीव्रता प्रचंड वाढल्याने शालेय विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर होणारा परिणाम लक्षात घेऊन जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण यांनी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आणि उच्च प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याचे आदेश दिले आहेत. नव्या निर्णयानुसार आता या शाळा सकाळी ७ वाजता भरतील आणि सकाळी १० वाजताच सुटतील. वाढत्या उष्णतेमुळे लहान बालकांना उष्माघाताचा त्रास होऊ नये, या उद्देशाने हा बदल करण्यात आला असून याची तात्काळ अंमलबजावणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
-
मुलांच्या भांडणाचं हाणामारीत रुपांतर, महिलेने घरात घुसून शेजाऱ्यांना काठीने बदडले
लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये मुलांच्या किरकोळ भांडणावरून एका महिलेने टोकाचे पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संतापलेल्या महिलेने हातात काठी घेऊन थेट शेजाऱ्याच्या घरात घुसून कुटुंबातील सदस्यांना बेदम मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही (CCTV) कॅमेऱ्यात कैद झाली असून, यामध्ये महिला अत्यंत आक्रमकपणे काठी चालवताना दिसत आहे. या हिंसक प्रकारानंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, पीडित कुटुंबाच्या तक्रारीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात संबंधित महिलेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
-
प्राजक्त तनपुरे बजावला मतदानाचा हक्क, भूमिकेबाबत अद्यापही सस्पेन्स कायम
राहुरी येथील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री प्राजक्त तनपुरे आज आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मात्र, या निवडणुकीत त्यांची नेमकी भूमिका काय असेल, याबाबत अद्यापही संभ्रम कायम आहे. तनपुरे यांनी स्थानिक पातळीवरील कार्यकर्त्यांशी आणि पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून, त्यांना विश्वासात घेऊनच मतदान करण्याचे आवाहन केल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आले आहे. मतदानाच्या अंतिम टप्प्यातही त्यांनी आपली भूमिका गुलदस्त्यात ठेवल्याने राहुरीच्या निकालात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
-
स्वतः मदतीसाठी फोन केला, पण रुग्णवाहिका उशिरा पोहोचल्याने रुग्णाचा दुर्दैवी अंत, कल्याणमध्ये धक्कादायक घटना
कल्याणमध्ये आरोग्य यंत्रणेच्या भोंगळ कारभाराचा एक हृदयद्रावक प्रकार समोर आला आहे. प्रकृती खालावल्यानंतर मेवालाल गुप्ता यांनी स्वतः १०८ रुग्णवाहिका सेवेला फोन करून मदतीची याचना केली होती. मात्र, अवघ्या ३ मिनिटांच्या अंतरावर असलेल्या दीपक हॉटेल परिसरात पोहोचण्यासाठी रुग्णवाहिकेला तब्बल ४० मिनिटे लागली. वेळेवर मदत न मिळाल्याने मेवालाल यांचा मृत्यू झाल्याचा आरोप प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. धक्कादायक म्हणजे आलेल्या रुग्णवाहिकेत डॉक्टरही उपलब्ध नसल्याने संतप्त नागरिकांनी प्रशासनाविरोधात मोठा गोंधळ घातला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या आरोग्य व्यवस्थेवर आता गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. या प्रकरणी आरोग्य अधिकाऱ्यांनी चौकशी सुरू केली आहे.
-
भोंदू राजेंद्र गडगेची पोलीस कोठडी संपली; आज पुन्हा न्यायालयासमोर हजर करणार
मंत्र-तंत्राच्या साहाय्याने दुर्धर आजार बरे करण्याचा खोटा दावा करून लोकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू राजेंद्र गडगेला आज संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले जाणार आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या (अंनिस) तक्रारीनंतर अटकेत असलेल्या गडगेची पाच दिवसांची पोलीस कोठडी आज संपणार आहे. या काळात झालेल्या तपासाच्या आधारे पोलीस आज न्यायालयात अधिक तपासासाठी वाढीव कोठडीची मागणी करण्याची दाट शक्यता आहे. आता न्यायालय गडगेला पुन्हा पोलीस कोठडी सुनावणार की त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
-
बदलापूर स्त्री बीज प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ३० डॉक्टरांना पोलिसांची नोटीस
बदलापूर स्त्री बीज प्रकरणी मुंबईसह ठाणे जिल्ह्यातील ३० डॉक्टरांना पोलिसांनी नोटीस पाठवली. संबंधित आयवीएफ सेंटर चालवणाऱ्या डॉक्टर वर पोलिसांचा संशय असल्याने धाडली नोटीस. या प्रकरणात आतापर्यंत तीन डॉक्टरांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बी स्त्री बीज तस्करी प्रकरणी आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली आहे.
-
पोलिस कर्मचारी असलेल्या जावयाला सासू सासऱ्याकडून मारहाण..
बुलढाणा जिल्ह्यातील अंढेरा येथे एका निलंबित पोलीस कर्मचाऱ्याला त्याचे सासू सासऱ्याने त्याच्या घरी जाऊन गल्लीत चांगलीच मारहाण केली . त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे .. मारहाण झालेल्या निलंबित पोलिस कर्मचाऱ्याचे नाव प्रभू चाटे असून मुंबई पोलिस दलात कार्यरत असल्याची माहिती मिळाली आहे .. मात्र चार महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीने आत्महत्या केली होती, दरम्यान पोलिस कर्मचारी प्रभू चाटे वर गुन्हा देखील झाला होता .. प्रभू चाटे हा घरी आल्याने त्याचे सासू सासरे यांनी प्रभू चाटे चे घरी जाऊन त्याला रस्त्यात ओढून ने मारहाण केली, कपडे काढण्याचा प्रयत्न ही केलाय .. यासंदर्भात अंधेरा पोलिसांत सासू सासरे सह साला या तिघांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल झाला आहे ..
-
60 दिवस झाले तरी CBI ही FIR स्वीकारत नाही- रोहित पवार
अपघतानानांतर VSR कंपनीला 100 कोटी बील दिले गेले. 60 दिवस झाले तरी केस घेत नाहीत. सुशांत सिंग राजपूतची आत्महत्या झाल्यावर 4 दिवसात केस घेतली. 30 एप्रिल किंवा 10 मे पर्यत आम्ही वाट पाहू. काही पुरावे दिलेत काही पुरावे आम्ही आमच्याकडे ठेवलेत.
-
बारामतीत पहिल्या दोन तासात 8.1 टक्के मतदान …
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सकाळी सात ते नऊ या दोन तासात ८.०१ टक्का इतके मतदान झाले आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ८४ ,हजार ५७९ मतदार आहेत पहिल्या दोन तासात ३० हजार ७९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.उन्हाची तीव्रता असल्याने मतदानाचा टक्का वाढण्यासाठी जय पवार मतदान केंद्रांवर बूथप्रमुखांच्या भेटी घेत आहेत…
-
पहलगाम हल्ला आणि इराण-अमेरिका युद्धाचा काश्मिर पर्यटनावर परिणाम
काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचे पडसाद अजूनही पर्यटन क्षेत्रावर उमटत असून, त्यातच इराण-अमेरिका युद्धाच्या तणावामुळे पर्यटकांच्या संख्येत मोठी घट झाल्याचे चित्र समोर येत आहे. स्थानिक पर्यटन व्यावसायिकांच्या मते, यावर्षीच्या उन्हाळी हंगामात पर्यटनात सुमारे ५० टक्क्यांनी घट झाली आहे. सुरक्षेच्या घटना आणि आंतरराष्ट्रीय तणावामुळे नागरिकांच्या मनात अनामिक भीती निर्माण झाली असून, अनेक पर्यटकांनी काश्मिरचा प्रवास पुढे ढकलला आहे.
-
परिवार एकत्र आला पाहिजे हे सत्य असले तरी राजकीय गोष्टी वेगळ्या असतात- रोहित पवार
2024 ला दादावेळी पवार वि. पवार झाले. 029 ला सर्वपक्षीय निवडणूक होईल. 2029 ला पवार वि. पवार होईल हे नाकारता येत नाही. परिवार एकत्र आला पाहिजे हे सत्य असले तरी राजकीय गोष्टी वेगळ्या असतात. परिवार म्हणून एकत्र येणे हा सोपा निर्णय नाही. जय वि. युगेंद्र असा सामना होऊ शकतो. लोकांची इच्छा नसली तरी ते होईल. पवारांची लीगसी कमी व्हावी म्हणून काही पक्ष प्रयत्न करत आहेत. दादा आज असते तर विलिनीकरण झाले असते.
-
गोविंद मोकाटे यांनी बजावला मतदानाचा हक्क
राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया सुरू
राष्ट्रवादी (शरद पवार गट) उमेदवार गोविंद मोकाटे यांनी बजावला मतदानाचा हक्क
गोविंद मोकाटे यांच्याकडून यावेळी भाजप सरकारवर जोरदार टीका
मला कोणतेही आव्हान नाही, माझाच विजय होईल, मोकाटे यांनी केला दावा
मतदारसंघात भाजप विरुद्ध मविआ अशी थेट लढत
मोकाटे विरुद्ध भाजपचे अक्षय कर्डिले यांच्यात प्रमुख सामना
-
बारामती विधानसभा पोटनिवडणूक, रोहित पवार मतदानासाठी रवाना
बारामती विधानसभा पोटनिवडणूक
आमदार रोहीत पवार मतदानासाठी निघाले
पिंपळी येथील मतदान केंद्रावर करणार मतदान
वडील राजेंद्र पवार, आई सुनंदा पवार, पत्नी कुंती पवार देखील मतदानाचा हक्क बजावणार
-
ठाण्यात पुन्हा मोठी वाहतूक कोंडी
ठाण्यातील तीन हात नका ते कोपरी उड्डाणपुलापर्यंत वाहतूक कोंडी
ठाण्याहून मुंबईच्या दिशेने वाहतूक कोंडी
लिक्विड टँकर बंद पडल्यामुळे झाली वाहतूक कोंडी
वाहतूक विभागाकडून लिक्विड टँकर बाजूला करण्याचं काम सुरू
सध्या वाहतूक धीम्या गतीने सुरू
-
गोंदियामध्ये धक्कादायक प्रकार, लग्नासाठी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण
लग्नासाठी केले अल्पवयीन मुलीचे अपहरण
हात-पाय बांधून जिल्हा परिषद शाळेत ठेवले डांबून
गोंदियाच्या तिरोडा तालुक्यातील धक्कादायक प्रकार
आरोपी विरोधात पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल
रात्री उशिरा आरोपीला पोलिसांनी केली अटक
-
खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या निवासस्थानी दाखल
खासदार सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत. मतदानाची प्रक्रिया पार पडल्यानंतर सुप्रिया सुळे रोहित पवारांच्या निवासस्थानी दाखल झाल्या आहेत.
-
धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये येत्या जून पासून पहिली ते पाचवी पर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार
धाराशिव जिल्हा परिषदेमध्ये येत्या जून पासून पहिली ते पाचवी पर्यंत सेमी इंग्रजी वर्ग सुरू होणार. घसरत चाललेली शाळांची पटसंख्या वाढवण्यासाठी जिल्हा परिषदेचे प्रयत्न सुरु आहेत. याबाबत जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेमध्ये सर्वपक्षीय एकमताने ठराव मंजूर करण्यात आला. धाराशिव जिल्हा परिषदेने मुख्याध्यापक इंग्रजी भाषा शिकवणारे शिक्षक आणि शालेय व्यवस्थापन समिती तसेच पालकांकडून संमती पत्र घेतले.
-
जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाची अचानक तपासणी करत ६२ कृषी केंद्रांवर मोठी कारवाई
जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाची अचानक तपासणी करत ६२ कृषी केंद्रांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. तपासणीदरम्यान विविध अनियमितता आढळून आल्याने कृषी सेवा केंद्रांवर कारवाई करण्यात आली आहे. २१ केंद्राचा परवाना कायमस्वरूपी रद्द तर २० केंद्रांचे परवाने निलंबित आणि २१ परवानाधारकांना सक्त ताकीद देण्यात आली आहे. गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक विकास बोरसे यांच्या नेतृत्वाखाली कृषी विभागाच्या पथकांनी केलेल्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी उघडकीस आल्याने कारवाई करण्यात आली आहे.
-
नाशिक | टीसीएस प्रकरणात पीडितेचा धक्कादायक जबाब
टीसीएस प्रकरणात पीडितेचा धक्कादायक जबाब नोंदवण्यात आला आहे. कंपनीत नेटचे पासवर्डही अश्लील भाषेत होतं धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप करण्यात आले आहेत. चौथ्या पीडितेचा जबाब SIT आणि महिला आयोगासमोर नोंदवण्यात आला आहे. वरिष्ठांकडे तक्रार करूनही दुर्लक्ष, छळ अधिक वाढल्याचा दावा पीडितेने केला आहे. आरोपींकडून कामावरून काढण्याची धमकी देत अत्याचार केले.
-
महापालिकेच्या मालमत्तेची माहिती एकाच क्लिकवर…
महापालिकेच्या मालमत्तेची माहिती एकाच ब्लिकवर मिळण्यासाठी डॅशबोर्ड विकसित करण्याचे नियोजन महापालिकेच्या मालमत्ता व्यवस्थापन विभागाने केले आहे. महापालिकेच्या मालमत्ता जतन संरक्षण देखभाल विनियोग, संचलन करण्यासाठी सर्व मालमत्तेचे सर्वेक्षण करून एकत्रित डेटाबेस तयार करणे आवश्यक आहे, जेणेकरून सदर मालमत्तांचा प्रभावीपणे विनियोग करणे शक्य होणार आहे, असा यामागील हेतू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
-
भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी तपासात धक्कादायक माहिती समोर
एका पीडित महिलेच्या गर्भपात प्रकरण गुन्ह्यात चौकशीदरम्यान काही नवे धक्कादायक खुलासे केले. नाशिकमधील काही बड्या डॉक्टरांसह महापालिकेतील एका डॉक्टरने देखील खरातला मदत केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या पुरवल्याचा आरोप करण्यात येत आहे. संबंधित डॉक्टरांना लवकरच चौकशीसाठी बोलावण्याची शक्यता आहे. पीडित महिला गरोदर राहिल्यास गर्भपाताच्या गोळ्या देत असल्याची माहिती समोर आली आहे. काही डॉक्टर आणि सोनोग्राफी सेंटर्सच्या भूमिकेचाही तपास सुरू आहे. गर्भपाताच्या गोळ्या कुठून आणल्या याचाही तपास सुरूअसून प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
-
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस असणार हवामान विभागाचा अंदाज
राज्यात पुढील तीन दिवस अवकाळी पाऊस असणार असा हवामान विभागाचा अंदाज आहे. राज्यात विदर्भातील काही जिल्हे वगळता बहुतांश भागात वादळी पाऊस असणार आहे. कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यामध्ये 25 एप्रिल पर्यंत पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
-
भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला
भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. बुऱ्हानगर येथील जिल्हा परिषद शाळेत सकाळी सव्वा सात वाजता त्यांनी मतदान केलं. पहिल्यांदाच निवडणूक लढवत असल्याची कर्डिले यांनी प्रतिक्रिया दिली. दिवंगत आमदार शिवाजी कर्डिले यांच्या आठवणींना उजाळा दिल “वडील सोबत नाहीत” अशी खंत त्यांनी व्यक्त केली.
-
खासदार सुप्रिया सुळे यांनी बजावला मतदानाचा हक्क
खासदार सुप्रिया सुळे यांनी लेक रेवती सुळे, रणजित पवार आणि शुभांगी पवार यांच्यासोबत मतदानाचा हक्क बजावला आहे.