AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी सावध, पाहा कुठे-कुठे रेल्वेचा मेगाब्लॉक ?

मुंबईत लोकल मार्गावर दर रविवारी मेगाब्लॉक घेतला जातो. या काळात रेल्वेची दुरुस्तीची कामे केली जातात. परंतू यामुळे रेल्वे मार्गावरील लोकल उशीराने धावणार असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. प्रवाशांनी मेगाब्लॉकनुसार प्रवास करवा.

मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडण्यापूर्वी सावध, पाहा कुठे-कुठे रेल्वेचा मेगाब्लॉक ?
| Updated on: Nov 14, 2025 | 11:09 PM
Share

मध्य रेल्वेच्या प्रवाशांनो रविवारी मेगाब्लॉक असल्याने घरातून बाहेर पडताना लोकलचे वेळापत्रक पाहूनच तुम्हाला निर्णय घ्यावा लागणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्ग, हार्बर मार्ग आणि ट्रान्सहार्बर अशा तिन्ही मार्गावर रविवारी मेगाब्लॉकचे कामे असल्याने प्रवाशांना प्रवास करताना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. चला तर पाहूयात कोणत्या वेळात हे मेगाब्लॉक आहेत.

मध्य रेल्वेच्या मुंबई डिव्हीजनच्या उपनगरीय मार्गावर १६ नोव्हेंबर २०२५ रोजी विविध इंजिनिअरिंग आणि देखभालीच्या कामासाठी खालील प्रमाणे मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला आहे.

मुख्य मार्गावर –

सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार स्थानकाच्या दरम्यान सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ दरम्यान अप आणि डाऊन दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. त्यामुळे सीएमएमटी मुंबई हून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ पर्यंत धावणाऱ्या डाऊन धिम्या लोकल सीएसएमटी मुंबई आणि विद्याविहार दरम्यान डाऊन जलद मार्गाने वळवल्या जातील.त्यामुळे त्या भायखळा, परळ, दादर, माटुंगा, सायन आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुन्हा विद्याविहार स्थानकानंतर डाऊन धिम्या मार्गावर धावतील.

घाटकोपरवरुन सकाळी १०.१९ वाजता दुपारी ३.५२ वाजता सुटणाऱ्या अप धिम्या लोकल ट्रेन विद्याविहार आणि सीएसएमटी मुंबई स्थानकादरम्यान अप फास्ट मार्गाने वळवल्या जातील आणि कुर्ला, सायन, माटुंगा, दादर, परळ आणि भायखला स्थानकावर थांबतील.

हार्बर मार्ग ब्लॉक

पनवेल आणि वाशी स्थानकांच्या दरम्यान अप आणि डाऊन हार्बर मार्गावर (पोर्ट लाईन वगळून ) सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ वाजताच्या दरम्यान मेगाब्लॉक असणार आहे.

हार्बर मार्गाच्या लोकलची स्थिती

पनवेल येथून सुटणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसकडे जाणाऱ्या अप हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ पर्यंत आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ पर्यंत बेलापूर/पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील लोकल रद्द राहतील.

ट्रान्स-हार्बर मार्ग –

ट्रान्स हार्बर मार्गावरील स्थिती

पनवेलहून सुटणाऱ्या ठाण्याकडे जाणाऱ्या अप ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत आणि ठाणे येथून सुटणाऱ्या पनवेलकडे जाणाऱ्या डाऊन ट्रान्स-हार्बर मार्गावरील लोकल सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० पर्यंत रद्द राहतील.

ब्लॉक कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-वाशी विभागात विशेष लोकल चालवल्या जातील. ब्लॉक काळात ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान ट्रान्स-हार्बर लाईन सेवा उपलब्ध असतील. ब्लॉक काळात पोर्ट मार्ग उपलब्ध असणार आहे.

Follow Us
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...
गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी वेगळं...
Gautami Patil On Dahi Handi | गौतमीचं मुंबईवर अपार प्रेम, काय म्हणाली पहा? आणखी खास...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय...
दहीहंडी उत्सवादरम्यान मोठी दुर्घटना; मुंबईतील हंडी फोडताना 7 वर्षीय गोविंदा दगावला
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना..
प्रकाश सुर्वे यांच्या दहीहंडी उत्सवात संजय दत्त यांची उपस्थिती, अपना भाई है म्हणत...
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती;
मुंबईतील नामांकित दहीहंडी कार्यक्रमात अजिंक्य देव यांची उपस्थिती; पहा खास व्हिडीओ