माणसातील राक्षस…! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर

भीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांची क्रूर हत्या झाली. या हत्येचे धक्कादायक फोटो आणि व्हिडीओ समोर आले आहेत. आरोपींनी देशमुखांना जबरदस्त मारहाण केली. सीआयडीने चार्जशीट दाखल केली असून या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू आहे

माणसातील राक्षस...! महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर
santosh deshmukh beaten photos
| Updated on: Mar 03, 2025 | 11:01 PM

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची क्रूरपणे हत्या करण्यात आली. संतोष देशमुखांची हत्या करताना त्यांना मारहाण करण्यात आली होती. आता त्यांना मारहाण करतानाचे आणि हत्येचे काही फोटो टीव्ही 9 मराठीच्या हाती लागले आहेत. यात आरोपींचे चेहरे स्पष्ट पाहायला मिळत आहे. तसेच संतोष देशमुखांना झालेल्या मारहाणीचे 8 फोटो आणि 15 व्हिडीओ समोर आले आहेत. संतोष देशमुख यांची हत्या खंडणी प्रकरणातून झाल्याचे समोर आले आहे.

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सीआयडीने चार्जशीट दाखल केली आहे. यात 66 पुरावे आणि 184 जबाब महत्त्वाचे ठरले आहेत. सध्या हे प्रकरण न्यायालयात असून याप्रकरणी नवनवीन खुलासे समोर येत आहेत. संतोष देशमुख हत्येप्रकरणी दाखल केलेल्या आरोप पत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. त्यातच आता संतोष देशमुख यांना मारहाण करतानाचे 8 फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. हे सर्व फोटो संवेदनशील आहेत. त्यामुळे हे फोटो आम्ही प्रसिद्ध करु शकत नाही. तसेच ‘टीव्ही 9 मराठी’ या फोटोंना दुजोरा देत नाही.

संतोष देशमुखांच्या हत्येचा संपूर्ण घटनाक्रम आणि हादरवणारे फोटो  

  • यातील पहिल्या फोटोत जनावरांप्रमाणे मारहाण केल्यानंतर जयराम चाटे संतोष देशमुख यांची पँट काढतोय.
  • दुसऱ्या फोटोत आरोपी महेश केदार हा त्या दृष्याचे सेल्फी घेत हैवानासारखा हसतो.
  • तिसऱ्या फोटोत अमानुष मारहाणीनंतर संतोष देशमुख अर्धमेले झाले, तेव्हा प्रतिक घुले देशमुखांच्या छातीच्या दोन्ही बाजूला पाय टाकून चेहऱ्यावर लघवी करतो.
  • सुदर्शन घुले देशमुखांच्या शेजारी उभा राहून फोटो काढतो. त्यावेळी हैवानी आवेश चेहऱ्यावर दिसतोय.
  • मारेकरी जयराम चाटे देशमुखांच्या अंगावर शर्ट ओरबाडून काढतो. काढलेला शर्ट हातात धरुन हसतो.
  • यानंतर मारेकरी पाईप आणि वायरने देशमुखांवर वार करतात. लाथा-बुक्क्यांनी मारहाण शिवीगाळ होते.
  • वायरीसारख्या हत्याराचं बंडल देशमुखांच्या पाठीवर मारुन वार केले जात आहेत
  • दृश्य पाहून जल्लाद – राक्षसांना पाझर फुटेल, अशावेळी महेश केदार सारं हसत हसत शूट करतो.
  • मारहाणीनंतर सुदर्शन घुले हा सगळ्यांचा बाप आहे, असं देशमुखांनी म्हणावं, यासाठी त्यांना जबरदस्ती केली जाते.
  • संतोष देशमुखांना अंतर्वस्त्रावर बसवून त्यांच्या पाठीवर पाईपने मारहाण होते.
  • हैवानासारख्या मारहाणीनंतर देशमुखांना शरीरातील रक्त ओघळून त्यांच्या तळपायापर्यंत आल्याचे दिसतंय.

माझ्याकडे काहीच बोलायला शब्द नाहीत – अंजली दमानिया

महाराष्ट्राला हादरवणाऱ्या संतोष देशमुखांच्या हत्येचा घटनाक्रम सध्या समोर आला आहे. या हत्यावेळेचे सर्व व्हिडीओ आणि फोटो पोलिसांकडून हस्तगत करण्यात आले आहेत. संतोष देशमुखांच्या क्रूर हत्येचे फोटोसमोर आले आहेत. “मला त्या फोटोबद्दल काहीही बोलायचं नाही. ते इतके भयानक आहेत की माझ्याकडे काहीच बोलायला शब्द नाहीत. प्लीझ मला काही विचारु नका. इतकं निर्दयीपणे त्यांना मारलं गेलंय. तो माणूस गेला. आपण त्यावर नको बोलूया”, अशी प्रतिक्रिया सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया म्हणाल्या.

मला बोलण्याची हिंमत नाही – धनंजय देशमुख

“समाजातील लोक त्यांना शिक्षा देतील. त्यांनी केलेले कृत्य अतिशय चुकीचे आहे. सर्व माध्यमांनी हे सर्व फोटो डिलिट करुन टाका, अशी मी विनंती करतो. कारण आम्ही जगू शकत नाही. माझ्या भावाला त्रास देण्यात आला. तुमच्या माध्यमातून मी सर्वांना ही विनंती करतो. मला हे फोटो बघवत नाहीत. मला बोलण्याची हिंमत नाही. याला जातीवादाचे स्वरुप आणलं जात होतं. आम्ही जातीवाद करणारे नाहीत. मग हे सर्व आरोपी ज्या जातीचे आहेत ती जात म्हणजे विकृती आहे आणि त्यांचे ज्यांनी समर्थन केलंय, जे समर्थक आहेत. त्यांना एकदा समोर यावं आणि तुम्ही माणसाची औलाद आहात का?” असा सवाल संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख यांनी केला.