आमचा मेळावा सीनिअर तर तुमचा…. बीडच्या राजकारणात दसरा मेळाव्यावरून ‘शिमगा’, पंकजा मुंडे यांना सुरेश धस यांचे सणसणीत उत्तर

Suresh Dhas on Pankaja Munde Over Dasara Melava: 20 ऑक्टोबर रोजी बीड जिल्ह्यात तीन दसरा मेळावे झालेत. त्यात मनोज जरांगे, धनंजय मुंडे, पंकजा मुंडे आणि सुरेश धस यांनी विचार पुष्प गुंफले. या दसरा मेळाव्यावरून आता बीड जिल्ह्यात राजकीय शिमगा सुरू झाला आहे. मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी टीका केली आहे.

आमचा मेळावा सीनिअर तर तुमचा.... बीडच्या राजकारणात दसरा मेळाव्यावरून शिमगा, पंकजा मुंडे यांना सुरेश धस यांचे सणसणीत उत्तर
बीडच्या राजकारणात दसरा मेळाव्यावरून 'शिमगा'
| Updated on: Oct 22, 2026 | 11:36 AM

Suresh Dhas on Pankaja Munde Over Dasara Melava: राज्यात दसरा मेळाव्याची परंपरा जुनीच आहे. पण गेल्या काही वर्षात दसरा मेळाव्यातून होणारी टीका, अप्रत्यक्ष टोलेबाजी नेहमी चर्चेत असते. 20 ऑक्टोबर, मंगळवारी दसरा मेळावा झाला. बीड जिल्ह्यात तीन दसरा मेळावे झालेत. मंत्री पंकजा मुंडे यांचा भगवान भक्तिगडावरील दसरा मेळावा, सुरेश धस यांचा आष्टी तालुक्यातील मच्छिंद्रनाथ गडावरील दसरा मेळावा तर नगद नारायण गडावरील मनोज जरांगे यांचा दसरा मेळावा चांगलाच गाजला. या दसरा मेळाव्यानंतर आता बीड जिल्ह्यातील राजकीय शिमगा समोर आला आहे. मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. त्यावरून वाद सुरू असतानाच मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर सुरेश धस यांनी टीका केली आहे.

तुमचा मेळावा ज्युनिअर…

Loading...

बीडच्या राजकारणात दसरा मेळाव्याच्या निमित्ताने पुन्हा एकदा पंकजा मुंडे विरुद्ध सुरेश धस असा राजकीय संघर्ष पेटलाय. डोंगरकपाऱ्यातील माझा दसरा मेळावा कोणाच्या डोळ्यात का खुपतो, असा सवाल मंत्री पंकजा मुंडे यांनी उपस्थित केला होता. आता याच विधानावर आमदार सुरेश धस यांनी जोरदार पलटवार केलाय. मी त्यांच्यावर बोललो नाही, त्यांच्या मेळाव्यावरही बोललो नाही, मग हे विधान कोणासाठी, हे मला माहीत नाही, असं म्हणत धस यांनी टोला लगावलाय. आमचा मेळावा अठरा वर्षांपासून सुरू आहे, त्यामुळे आमचा मेळावा सीनियर आणि तुमचा ज्युनिअर असं धस म्हणाले.

पंकजा मुंडे यांचा कुणावर निशाणा?

मंत्री पंकजा मुंडे यांनी भगवान भक्तिगडावर मार्गदर्शन करताना माझा डोंगरकपाऱ्यातील भरणारा दसरा मेळावा अनेकांच्या डोळ्यात का खुपतो? असा थेट सवाल उपस्थित केला होता. त्यांचा रोख कुणावर होतो हे स्पष्ट झाले नाही. पण या मेळाव्यातून त्यांनी धार्मिक आणि जातीय तेढ निर्माण करणाऱ्यांवर टीकेचा आसूड उगारला होता. त्यांनी कुणाचे नाव घेतले नसले तरी त्यांचा रोख कुणावर होता हे स्पष्ट आहे. तर धनंजय मुंडे यांनी सुद्धा बहीण-भावावर सातत्याने आरोप करण्यात येत असल्याचा आरोप केला होता.

सुरेश धस यांची पंकजा मुंडे यांच्यावर टीका

पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याचे पडसाद उमटले आहेत. आमदार सुरेश धस यांनी आपल्याच पक्षाच्या नेत्या आणि मंत्री पंकजा मुंडे यांच्यावर टीका केली. मी त्यांच्यावर अथवा त्यांच्या दसरा मेळाव्यावर वैयक्तिकरित्या काहीही बोललो नव्हतो, असे धस म्हणाले. आमचा दसरा मेळावा हा गेल्या 18 वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे आमचा मेळावा सीनियर आणि तुमचा ज्युनिअर असा टोलाही धस यांनी लगावला.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us