AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Rohit Pawar : ‘ज्ञानेश कुमार करप्ट व्यक्ती…’ रोहित पवार यांचा घणाघात, SIR प्रक्रियेवरून आरोपांची लड

Rohit Pawar Criticized CEC Gyanesh Kumar : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी आता मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे. त्यांनी ज्ञानेश कुमार हे अत्यंत भ्रष्ट व्यक्ती असल्याची घणाघाती टीका केली आहे. मलेशियातील कंपनीचा उल्लेख करत त्यांनी हल्लाबोल केला आहे.

Rohit Pawar : 'ज्ञानेश कुमार करप्ट व्यक्ती...' रोहित पवार यांचा घणाघात, SIR प्रक्रियेवरून आरोपांची लड
ज्ञानेश कुमार करप्ट व्यक्ती... रोहित पवार यांचा घणाघात
| Updated on: Oct 22, 2026 | 11:18 AM
Share

Rohit Pawar Criticized CEC Gyanesh Kumar : MPSC विद्यार्थी आंदोलन, शेतकरी आंदोलनानंतर आता राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात मोर्चा उघडला. आज त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. SIR-निवडणूक आयोगाचे कारनामे या स्लाईड शो द्वारे त्यांनी पत्रकार परिषदेत आरोपांची राळ उडवून दिली. एसआयआरचा निर्णय नेमका कोणाचा? आयोगाच्या RTI ला दिलेल्या उत्तरात धक्कादायक खुलासा असल्याचा दावा त्यांनी केला.

निवडणूक आयोगाचे धक्कादायक उत्तर

इंडियन एक्सप्रेसच्या एका वृत्ताला कोट करत एसआयआरचा निर्णय नेमका कोणाचा, याविषयीची माहिती, माहिती अधिकारात मिळवण्यात आली होती. देशभरात इतकी मोटी एसआयआर मोहिम राबवण्याचा निर्णय नक्की कोणी, कधी आणि कोणत्या अभ्यासाच्या आधारावर घेतला असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. तर त्यावर एसआयआर प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलेला नाही. किंवा याविषयीचे तत्सम मंजूरीचे कोणतेही रेकॉर्ड उपलब्ध नाहीत असे धक्कादायक उत्तर निवडणूक आयोगाने दिल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. तर कॅबिनेट सचिवांनी सुद्धा सरकारने असा कोणताही निर्णय घेतलेला नसल्याचे सांगत असल्याचे पवार म्हणाले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या या उत्तरावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

13 कोटी मतदारांना वगळले

स्लाईड शो दरम्यान आमदार रोहित पवार यांनी आकडेवारी सादर केली. त्यानुसार,

देशात कायमचे स्थलांतरित झालेले 6.30 कोटी तर राज्यात 76.76 लाख नागरीक

गैरहजर वा पत्ता नसलेले देशात 3.01 कोटी, तर राज्यात 75.41 लाख नागरीक

मयत झालेले नागरीक देशात 2.80 कोटी, तर राज्यात 34.82 लाख नागरीक

दुबार मतदार देशात 1.02 कोटी, तर राज्यात हा आकडा 17.66 लाख इतका

पण मतदार पुनर्निरीक्षण प्रक्रिया, एसआयआर राबवितांना कोणत्याही ठोस पुराव्याशिवाय मनमानी पद्धतीने देशात 13 कोटी मतदारांना वगळण्यात आल्याचा आरोप रोहित पवार यांनी यावेळी केला. त्यांच्या या आरोपांनी आता खळबळ उडाली आहे.

प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह

यावेळी त्यांनी काही बोलकी उदाहरणं दिली. त्यात बिहारचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नितीश कुमार यांचा फोटो असलेले निवडणूक ओळखपत्र दाखवले. पण या निवडमूक ओळखपत्रावर नाव मात्र अभिलाषा कु्मारी असा आहे. इतरही अनेक उदाहरणं देत रोहित पवार यांनी एकूणच एसआयआर प्रक्रियेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी निवडणूक आयोगाच्या कार्यशैलीवर आणि कामकाजावर मोठा सवाल उपस्थित केला.

ज्ञानेश कुमार करप्ट व्यक्ती

या पत्रकार परिषदेतून रोहित पवार यांनी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर घणाघाती टीका केली. ज्ञानेश कुमार हे करप्ट व्यक्ती असल्याचा आणि त्यांचा इतिहास भ्रष्टाचाराचा असल्याचा आरोप त्यांनी केला. 2006 मध्ये ज्ञानेश कुमार हे केरळ कॅडरचे सनदी अधिकारी, IAS होते, केरळ राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात ते सचिव पदावर कार्यरत होते. या कालावधीत एका मलेशियन प्रकल्प अधिकाऱ्याने, ली बीन सीन याने आत्महत्या केली होती. त्याचा उल्लेख करत आमदार रोहित पवार यांनी ज्ञानेश कुमार यांच्यावर हे गंभीर आरोप केले. त्यांनी आरोपांची लड लावली. तर या सर्व प्रकरणाच्या चौकशीची मागणी केली. कारवाईची मागणी केली आहे.

Follow Us
मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल....
Jarange Patil Viral Audio Clip : मनोज जरांगेंना 500 कोटी मिळाल्याची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल; श्रीकांत शिंदेंचंही नाव, जरांगे काय खुलासा करणार?
पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या....
Sanjay Raut : पंतप्रधान मोदींच्या राजकीय भवितव्यावर राऊतांचं भाकीत; अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या दौऱ्याचा उल्लेख करत काय म्हणाले?
मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
Mumbai Airport : मुंबई विमानतळावर सोन्याच्या तस्करीचा पर्दाफाश; दोन किलो सोन्यासह....
मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; AQI थेट...
Mumbai Air Pollution : मुंबई जगातील तिसऱ्या क्रमांकाचं प्रदूषित शहर; नागरिकांच्या आरोग्याला धोका, AQI थेट...
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?