गांधींचे विचार जगाला प्रेरित करणारे, वारसा दीर्घायुषी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी

सेवाग्राम येथील बापू कुटी हा देशाचा सर्वात मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो दीर्घायुषी झाला पाहिजे असा विचार राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्याकडे मांडला. राज्यपाल कोश्यारी यांनी आज सेवाग्राम आश्रमात भेट देत महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली.

गांधींचे विचार जगाला प्रेरित करणारे, वारसा दीर्घायुषी होण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी
BHAGAT SINGH KOSHYARI
चेतन व्यास

| Edited By: prajwal dhage

Oct 02, 2021 | 11:55 PM

वर्धा : ऐतिहासिक वारसा जोपासण्यासाठी त्याचे रूप बदलविण्याची गरज नाही. प्रत्येक वास्तूला एक वयाची सीमा असते. पण विज्ञानवादी दृष्टिकोनातून हा ठेवा जोपासला गेला पाहिजे. अशा वास्तू दोनशे वर्षापर्यंत टिकू शकतात. पण रूप न बदलविता या वास्तू जोपासल्या जाऊ शकतात. सेवाग्राम येथील बापू कुटी हा देशाचा सर्वात मोठा ऐतिहासिक वारसा आहे आणि तो दीर्घायुषी झाला पाहिजे असा विचार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी सेवाग्राम आश्रमाचे अध्यक्ष टी आर एन प्रभू यांच्याकडे मांडला. राज्यपाल कोश्यारी यांनी आज सेवाग्राम आश्रमात भेट देत महात्मा गांधी यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांनी सेवाग्राम आश्रमात आश्रमाच्या अध्यक्षासह अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.

साबरमती येथील वास्तू देखील विकसित करण्यात येत होती, पण विरोध झाला

यावेळी सेवाग्राम आश्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी भेट देऊन बापू कुटीची पाहणी केली. याेवळी त्यांनी नालंदा येथील वास्तूसोबत साबरमती येथील वास्तू देखील विकसित करण्यात येत होती. प्रधानमंत्र्याचे देखील दृष्टी तशीच होती. साबरमती येथील वास्तू देखील जोपासली जाणार होती, पण लोकांचा त्याला विरोध झाला याकडे प्रभू यांचे लक्ष वेधले. पण तेवढयात प्रभू यांनी कोर एरियात बदल न करता विकास व्हावा असेच तेथील गांधीवादी कार्यकर्त्यांचे मत होते असे सांगितले.

ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे

तसेच कोश्यारी यांनी सेवाग्राम आश्रमात ऐतिहासिक ठेवा जोपासताना काही सकारात्मक बदल होत असतील तर त्याचा विचार झाला पाहिजे. वास्तू दिर्घजीवी बनली पाहिजे.  विटा आणि लाकूड तसेच वापरण्यात आणलेल्या वस्तू यांची आयु किती आहे, याचाही विचार केला गेला पाहिजे. त्यानुसार ऐतिहासिक वारसा जपला गेला पाहिजे, असे मत बापू कुटी येथे आश्रमातील जबाबदार पदाधिकाऱ्यांसमोर मांडले.

सेवाग्रामचे दर्शन केले पाहिजे, धन्य वाटलं

गांधीजींचे विचार जगाला प्रेरित करत आहे. जेवढा कालावधी उलटत आहे तेवढे त्यांना आठवल्या जात आहे. आज महात्मा गांधींची जयंती आहे.  मला वाटले की आपण सेवाग्रामचे दर्शन केले पाहिजे, असे म्हणत धन्य वाटत असल्याचं राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी सेवाग्राम आश्रमात भेट दिली. राज्यपालांनी आश्रमात गांधीजींना अभिवादन केलं. महात्मा गांधींच्या आश्रमात प्रार्थनाही केली. महात्मा गांधी हे देशाचे आणि जगाचे सत्य शांती आणि अहिंसेचे प्रेरक राहिले आहे. यांनी आदर्श आणि त्यागमय जीवन जगले आहे. असे जीवन जगून त्यांनी शेकडो हजारो लोकांना प्रेरित केले, असंही राज्यपाल म्हणाले.

इतर बातम्या :

त्यांच्या कथाकथनची महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ, कथाकथनातील अस्सल मिरासदारी संपली, ज्येष्ठ लेखक द मा मिरासदार यांचं निधन

माझ्यासोबत कुणीच आलं नाही, मी माणुसकी मेलेली पाहिली, धनंजय मुंडेंची वेदना

सरकारने एअर इंडियाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही: पीयूष गोयल

Non Stop LIVE Update

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें