माझ्यासोबत कुणीच आलं नाही, मी माणुसकी मेलेली पाहिली, धनंजय मुंडेंची वेदना

मुंडे यांनी कोरोनाकाळातील आठवणी सांगितल्या. त्यांनी भावनिक होत मला कोरोना झाला तेव्हा माझ्यासोबत कुणीच आलं नाही. मी माणुसकी मेलेली पाहिली, असे उद्गार काढले. तसेच परनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे तोंडभरुन कौतूक केले.

माझ्यासोबत कुणीच आलं नाही, मी माणुसकी मेलेली पाहिली, धनंजय मुंडेंची वेदना
धनंजय मुंडे
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 11:07 PM

अहमदनगर : सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तसेच राष्ट्रवादीचे नेते आज अहमदनगरच्या दौऱ्यावर होते. धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत आमदार निलेश लंके यांच्या मतदारसंघातील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी बोलताना मुंडे यांनी कोरोनाकाळातील आठवणी सांगितल्या. त्यांनी भावनिक होत मला कोरोना झाला तेव्हा माझ्यासोबत कुणीच आलं नाही. मी माणुसकी मेलेली पाहिली, असे उद्गार काढले. तसेच परनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोरोनाकाळात केलेल्या कामाचे तोंडभरुन कौतूक केले.

मी माणुसकी मेलेली पहिली आहे

“लंके यांच्यात अद्भुत शक्ती आहे. कोरोनाकाळात तुम्ही माणुसकी दाखवली. कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट आली. यामध्ये मला कोरोना संसर्ग झाला. मला कोरोनाची लागण झाल्याचे रात्री बारा वाजता समजले. कोविडच्या संकटात मी माणुसकी मेलेली पहिली आहे. कोरोना होण्याआधी मी फिरत होतो, तेव्हा 50 लोक माझ्यासोबत असायची. मात्र कोरोना झाला तेव्हा मी एकटाच रुग्णवाहिकेमध्ये बसलो होतो. माझ्यासोबत कोणीच नव्हते, अशी वेदना धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवली.

निलेश लंके यांनी माणुसकी दाखवली, जास्त निधी देणार

तसेच पुढे बोलताना मुंडे यांनी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी कोविड सेंटर उभारल्यामुळे निलेश लंके यांचे कौतुक केले. निलेश लंके यांनी माणुसकी दाखवली आहे. इतरांपेक्षा जास्त निधी मी या मतदारसंघात देणार आहे. तुमच्या मतदारसंघात पाणी वाहण्याचा शब्द मी देत आहे, असे आश्वासन धनंजय मुंडे यांनी निलेश लंके यांना दिले.

 राष्ट्रवादीच्या नेते आमदार निलेश लंके यांच्या घरी

दरम्यान, राष्ट्रवादीचे नेते आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आमदार निलेश लंके यांच्या घरी शरद पवारांनी भेट दिली. आमदार निलेश लंके यांचं घर अत्यंत साधं आहे. एक रुम, त्यातच छोटं किचन आणि बाजूला बाथरुम अशी निलेश लंके यांच्या घराची रचना आहे. आमदार लंके यांच्या या छोट्या घरात देशातील बडा नेता असलेले शरद पवार यांनी भेट दिल्यामुळे लंके कुटुंबीय भारावून गेलं. आमदार लंके यांच्या छोटेखानी घरात राष्ट्रवादीचे बडे नेते उपस्थित होते. यावेळी शरद पवारांसोबत नगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे आणि आमदार रोहित पवार हे सुद्धा निलेश लंके यांच्या घरी दाखल झाले होते. राज्यातील भारदस्त नेते छोट्या घरात आल्यानंतर, लंके कुटुंबाची एकच धावपळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं होतं.

इतर बातम्या :

विधानसभा निवडणूक कधीही होवो, स्वबळावर जिंकण्यास भाजपा सज्ज, चंद्रकांत पाटलांचा दावा

त्यांच्या कथाकथनची महाराष्ट्रातलील जनतेला भुरळ, कथाकथनातील अस्सल मिरासदारी संपली, ज्येष्ठ लेखक द मा मिरासदार यांचं निधन

कोस्टल रोडच्या कामावर 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘तवंग’, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

(dhananjay munde remind day when he was infected with corona virus said humanity is almost dead)

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.