कोस्टल रोडच्या कामावर 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा ‘तवंग’, आशिष शेलारांचा गंभीर आरोप

या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तरर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे.

कोस्टल रोडच्या कामावर 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा 'तवंग', आशिष शेलारांचा गंभीर आरोप
आशिष शेलार, आमदार, भाजप
टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: सागर जोशी

Oct 02, 2021 | 7:52 PM

मुंबई : मुंबईकरांसाठी महत्वाच्या असणाऱ्या कोष्टल रोडच्या कामात 1600 कोटींच्या भ्रष्टाचाराचा तवंग आताचा दिसू लागाला आहे. त्यामुळे या प्रकरणी तातडीने कंन्सल्टनला काळ्या यादीत टाकण्यात यावे आणि या अपहाराची व लुटमारीची एसआयटी मार्फत चौकशी करण्यात यावी, अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा भाजपा नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. तरर केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र लिहून पर्यावरणाबाबत निकषांचे पालन न केल्या प्रकरणी महापालिकेकडून खुलासा मागावा अशी विनंतही शेलार यांनी केली आहे. (MLA Ashish Shelar alleges corruption of Rs 1,600 crore in Coastal Road project)

आशिष शेलार यांनी आज पुन्हा एकदा भाजपा प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन कोस्टलरोड मधील भ्रष्टाचार उघड केला. यापुर्वी त्यांनी 6 सप्टेंबरला पत्रकार परिषद घेऊन कोस्टल रोडच्या कामात 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा अरोप केला होता. त्याला तातडीने त्याच दिवशी मुंबई महापालिकेने खुलासा करून उत्तर दिले होते. या खुलाशामध्ये महापालिकेने, या कामात कोणत्याही प्रकारे भ्रष्टाचार व अनियमीतता न झाल्याचा दावा केला होता. त्यावर आज पुन्हा पत्रकार परिषद घेऊन आशिष शेलार यांनी पुराव्यासहित या कामात कसा भ्रष्टाचार होतोय हे उघड केले.

प्रकल्पाला विरोध नाही, त्यातील भ्रष्टाचाराला विरोध

याबाबत बोलताना ते म्हणाले की, कोस्टल रोड हा भाजपाचा ड्रिम प्रकल्प असून मुंबईला त्याची गरज आहे. म्हणून तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकल्पाच्या परवानग्या तातडीने मिळवून दिल्या. त्यानंतर मात्र ज्या पध्दतीने काम सुरू आहे त्यावरून कामाचा दर्जा निष्कृष्ट दर्जा आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे भवितव्यच धोक्यात आले आहे. या प्रकल्पाला भाजपाचा विरोध नसून यातील भ्रष्टाचाराला आमचा विरोध आहे असं शेलार यांनी यावेळी स्पष्ट केलंय.

कटकमिशनच्या व्यवहाराचा आरोप

मुंबई महापालिकेतील सत्ताधारी गेले अनेक वर्षे मुंबईच्या गल्लीतील रस्त्यांचे डांबरिकरण करून कटकमिशनचा व्यवहार करत आहेत. तीच कार्यपध्दती याच आंतराष्ट्रीय प्रकल्पाच्या बाबतीत सत्ताधाऱ्यांची आहे. प्रकल्पाचे काम अत्यंत निकृष्ठ दर्जाचे असून प्रकल्पासाठी अत्यंत धोकादायक बाब आहे. “हे काय तुम्ही करून दाखवताय?” असा सवालही त्यांनी केला. ही अशीच कार्यपध्दती राहली तर मुंबईकरांच्या 14 हजार कोटी गेले वाहून, असे होईल की काय अशी भिती वाटते आहे. हा मुंबईकरांच्या जीवाशी खेळ आहे. हा प्रकल्प व्हावा अशीच भाजपची भूमिका आहे. हा विषय शिवसेनेने प्रितष्ठेचा न करता प्रकल्प योग्य दर्जाचा व्हावा म्हणून यात होणाऱ्या चुका आम्ही दाखवून देत आहोत. त्या चुका त्या वेळीच सुधाराव्या असं आवाहनही शेलार यांनी केलंय.

एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे सादर

या प्रकल्पातील प्रियदर्शनी पार्क ते बरोडा पॅलेस या पॅकेज 1 या कामाबाबत डिसेंबर 2019 ते 2020 या कालावधीत एका वर्षातील भ्रष्टाचार आणि अपव्यवहाराचे पुरावे शेलार यांनी सादर केले. या प्रकल्पाला कायदेशीर पध्दतीने काम करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीने दोन कंन्सल्टन नियुक्ती केली असून ए.ई. काँम या कंपनीची जनरल कन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. लुईस बर्गर यांना प्रकल्प कंन्सल्टन म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासाठी या दोन कंपन्यानाला 600 कोटी रुपये देण्याचे स्थायी समितीने मंजूर केले आहे. महापालिकेला या दोघांनी सल्लामसलत करून काम योग्य दिशेने होईल, तसेच ठेकेदाराकडून योग्य दर्जाचे काम होईल यासाठी या दोन कंपन्यांची नियुक्ती करण्यात आली होती.

या दोन कंन्सल्टनेने कुठल्या दर्जाचा माल भरावासाठी घेण्यात यावा, तसेच कुठल्या खाणीतून हा माल घेण्यात यावा या प्रमाणीत खाणीच्या याद्या देण्यात आल्या. मालाची घनताही ठरवण्यात आली. प्रत्यक्षात मात्र कंन्सल्टनेने ठरवून दिलेल्या खाणीतील माल न घेता तो अन्य खाणीतून निकृष्ठ दर्जाचा माल घेण्यात आला त्यामुळे या प्रकल्पाच्या दर्जाबाबतच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे व प्रकल्पाला धोका निमाण झाला आहे.

शेलारांची प्रश्नांची सरबत्ती

कोस्टल रोडच्या भरावासाठी कंत्राटदाराने अप्रमाणीत अशा गवाण 356/9 श्री कन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन 41/1 वैभव कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. 53 भत्ताद कंन्ट्रक्शन, कुंडेवाल एस. एन. 54 दिप इंन्फ्रा, कुंडेवाल एस. एन. 51/ 2, कुंडेवाल एस. एन. 58 या सहा खाणीतून भराव माल घेतला. कंन्सल्टनेने प्रमाणीत केलेल्या नसताना या सहा खाणीतून का भरावाचा माल घेण्यात आला?, त्याचे लागेबांधे काय आहेत?, त्या खाणी कोणाच्या आहेत त्यातून होणारा नफा कोणाकडे जाणार आहे? या सहा अप्रमाणीत खाणीतून 8 लाख 40 हजार टन एवढा माल घेण्यात आला.

दुसऱ्या प्रकरणात खाण प्रमाणीत आहे मात्र त्या खाणीतून जो माल प्रमाणीत केला गेला होता न घेता अन्य माल घेण्यात आला आहे. त्यामध्ये गवाण ३५६/9 आणि कुंडेवाल एस. एन. 51/1 या दोन खाणीतील जो माल प्रमाणीत केला होता तो न घेता अन्य माल घेण्यात आला.

निकृष्ठ दर्जाचा भराव टाकल्याचा आरोप

तर तीस-या भागात कुंडेवाल एस. एन. 53 कुंडेवाल एस. एन. 54, कुंडेवाल एस. एन. 51 /2, कुंडेवाल एस. एन. 58 या खाणीतून आर्मर्र नावाचे भरणी मटेरिअर घेणे अपेक्षीत नव्हेते ते घेण्यात आले. तर पुष्पक नोड ही एक खाण अशी आहे की, ज्यावेळी यातील भराव माल घेतला त्यावेळी ती अप्रमाणीत होती मात्र माल घेतल्यानंतर ती प्रमाणीत करण्यात आली अशी बनवाबनवी करण्यात आली आहे. अशा प्रकारे गेल्या वर्षभरात एकुण 28 लाख टन माल समुद्रात भरावासाठी टाकण्यात आला आहे तो संपुर्ण माल निकृष्ठ दर्जाचा होता. जे महापालिकेने नियुक्त केलेल्या कन्सल्टननेच सांगितले होते त्याचे पालन का झाले नाही? त्यावर लक्ष ठेवण्याचे काम महापालिकेच्या अधिका-यांचे होते, त्यावर लक्ष ठेवण्याचे काम कन्सल्टनचे होते त्यावर दिशा देऊन योग्य लक्ष ठेवणे स्थायी समितीचे होते. मात्र तसे झालेले नाही. त्यामुळे निकृष्ठ दर्जाचा भराव टाकण्यात आला आहे.

केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना शेलारांचं पत्र

त्यामुळे केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांना शेलार यांनी पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, या प्रकल्पाला केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने परवानगी देताना ज्या अटी शर्ती महापालिकेने मान्य केल्या. महापालिकेने ज्या अटी शर्ती सांगितल्या त्या दर्जाचे काम होताना दिसत नाही त्यामुळे या प्रकरणी केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी महापालिकेकडून तातडीने खुलासा मागावा, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

महापालिकेने कंत्राटदारांना वाचवणारी आणि भ्रष्टाचाराला पांघरून घालणारी भूमिका घेऊ नये, आम्ही मुंबईकरांच्या हितासाठी चर्चेला तयार आहोत. त्या कामातील त्रुटी समजून घ्या, सत्ताधारी शिवसेनेन प्रितष्ठेचा विषय करू नये अन्यथा दिवाळी पुर्वी आणखी भ्रष्टाचाराचे फटके वाजतील, असा इशाराही शेलार यांनी यावेळी दिला आहे.

इतर बातम्या :

पालघर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुरंगी लढत, शिवसेना-भाजप-बविआ-राष्ट्रवादी आमनेसामने

अनिल परबांनी असं काय केलं की, रामदास कदम लोकायुक्तांच्या कारवाईवर व्हेरी गुड… व्हेरी गुड म्हणतायत?

MLA Ashish Shelar alleges corruption of Rs 1,600 crore in Coastal Road project

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें