पालघर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुरंगी लढत, शिवसेना-भाजप-बविआ-राष्ट्रवादी आमनेसामने

पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर या गटामध्ये 5 तर नंडोरे देवखोप या गटामध्ये 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर तालुक्यातील 9 पंचायत समिती गणासाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार एकमेकांना आव्हान देणार असल्याने ही निवडणूक तालुक्यात चुरशीची होईल असं दिसतं.

पालघर झेडपी आणि पंचायत समिती निवडणुकीत बहुरंगी लढत, शिवसेना-भाजप-बविआ-राष्ट्रवादी आमनेसामने
Palghar-ZP-Election
Follow us
| Updated on: Oct 02, 2021 | 7:17 PM

पालघर : पालघर जिल्ह्यातील 29 जागांपैकी पालघर तालुक्यात जिल्हा परिषदेच्या 2 व पंचायत समितीचे 9 अशा 11 जागांवर निवडणूक होणार आहे. या जागांवर बहुरंगी लढती होणार असल्याचे दिसून येत आहे. पालघर तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर या गटामध्ये 5 तर नंडोरे देवखोप या गटामध्ये 6 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. तर तालुक्यातील 9 पंचायत समिती गणासाठी 47 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. या तालुक्यामध्ये महाविकास आघाडीचे घटक पक्षाचे उमेदवार एकमेकांना आव्हान देणार असल्याने ही निवडणूक तालुक्यात चुरशीची होईल असं दिसतं. (Fight between Congress, Shiv Sena, BJP, NCP in Palghar ZP and Panchayat Samiti elections)

कोणत्या जि. प. गटात कशी लढत?

जिल्हा परिषदेच्या सावरे एम्बुर गटांमध्ये तिरंगी लढत रंगणार आहे. शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडीचे उमेदवार एकमेकांविरोधात उभे आहेत. या गटामध्ये याआधी सदस्य पद रद्द झालेल्या शिवसेनेच्या महिला उमेदवारांसमोर भाजप व बहुजन विकास आघाडीचे आव्हान राहणार आहे. या भागामध्ये बहुजन विकास आघाडीची निर्णायक मते इथला उमेदवार ठरवतील असे सांगितले जात आहे. असे असले तरी भाजप उमेदवार निवडून आणण्यासाठी जोर लावला जात आहे.

नंडोरे देवखोप जिल्हा परिषद गट पोटनिवडणुकीसाठी चर्चेचा विषय बनला आहे. या गटामध्ये प्रत्यक्षात शिवसेना-भाजप अशी दुरंगी लढत असली तरी बहुजन विकास आघाडीनेही आपला उमेदवार उभा केल्यामुळे काही मतांच्या फरकाने उमेदवाराचे भवितव्य ठरणार आहे. अवघ्या 90 मतांनी पराजय झालेल्या गेल्या वेळच्या शिवसेनेच्या महिला उमेदवाराला यंदा पुन्हा संधी मिळाली असली तरी विद्यमान सदस्यपद रद्द झालेल्या भाजपच्या महिला उमेदवाराचा प्रभाव मतदारांवर पडण्याची शक्यता आहे. गेल्या वेळ शिवसेनेचाच येथील काही पदाधिकाऱ्यांनी शिवसेना उमेदवाराच्या विरोधात मते फिरवल्यामुळे त्यांना पराभव पत्करावा लागला होता. आता मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी त्यांच्यासमोर विकास कामांच्या आश्वासनांचा डोंगर उभा करुन शिवसेना आणि भाजप प्रयत्नांची पराकाष्ठा करताना दिसून येत आहेत. या गटातील काही गावांमध्ये बहुजन विकास आघाडीचे प्राबल्य असल्यामुळे ही निर्णायक मते सेना भाजपच्या उमेदवारांचे भवितव्य ठरवतील.

पालघर पंचायत समितीमध्ये काही ठिकाणी दुरंगी, तिरंगी, चौरंगी लढती रंगताना पहावयास मिळणार आहेत. नवापूर पंचायत समिती गणांमध्ये भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि अपक्ष अशी चौरंगी लढत रंगणार आहे. या भागामध्ये शिवसेना आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी विशेष प्रयत्न करत आहेत. असं असलं तरी भाजपही त्याच प्रयत्नात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने इथे चांगला उमेदवार दिल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पारड्यातही मते पडतील असा त्यांचा विश्वास आहे. शिवसेनेचा प्रभाव असलेल्या सालवड पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपा अशी दुरंगी लढत रंगण्याची शक्यता आहे. शिवसेनेच्या महिला उमेदवाराचे पद रद्द झाल्यामुळे पुन्हा त्यांना तिथे संधी देण्यात आली आहे. मात्र भाजपच्या रूपाने त्यांना कडवे आव्हान असणार आहे. सरावली अवधनगर पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना, भाजप, काँग्रेस अशी लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसही या ठिकाणी उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्नात आहे.

मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी शिवसेनेचे दिग्गज पदाधिकारी या भागांमध्ये निवडणूक प्रचार करून शिवसेनेच्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत असले तरी भाजप इथं आव्हानात्मक लढत देणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनेही या गणात प्रतिष्ठित प्रचाराला सुरुवात केली आहे. त्यामुळे या ठिकाणी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप या तिघांमध्ये खरी लढत रंगणार आहे.

सरावली या गणांमध्ये शिवसेनेचे प्राबल्य असले तरी शिवसेना व भाजप अशी दुरंगी लढत पाहायला मिळणार आहे. भाजपने शिवसेनेचे कडवे आव्हान पेलल्याचे त्यांच्या प्रचारातून दिसून येते. मात्र येथील मतदार कोणाला आपला उमेदवार ठरवतील हे येणारा काळच सांगेल. मान गणामध्ये यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सदस्य निवडून आले होते. त्यानंतर हे पद रद्द झाल्यामुळे आता येथे मनसेच्या माजी उमेदवारासह शिवसेना व भाजपच्या स्थानिक उमेदवाराला संधी दिल्याने तिरंगी लढत पहायला मिळणार आहे. मनसेमार्फत मतदारांना आपलेसे करून घेण्यासाठी खटपट सुरू आहे. तर याउलट शिवसेना व भाजपा या भागांमध्ये आपला उमेदवार निवडून आणण्यासाठी विविध मतदारांना प्रभावीत करून त्यांना आपल्याकडे खेचत असल्याचे दिसत आहे.

शिगाव खुताड गणामध्ये भाजप, शिवसेना, बहुजन विकास आघाडी अशी तिरंगी लढत पाहायला मिळेल. शिवसेना या भागांमध्ये आपल्या पक्षश्रेष्ठींच्या जोरावर उमेदवार निवडून आणण्यासाठी मतदारांवर प्रभाव टाकताना दिसत आहेत. याउलट या भागांमध्ये बहुजन विकास आघाडीची काही निर्णायक मते असल्यामुळे भाजप व शिवसेनेच्या उमेदवारासाठी येथे आव्हान असणार आहे. बऱ्हाणपूर गणांमध्येही भाजप, शिवसेना अशी खरी लढत असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसला स्थानिक उमेदवार व मतदारांना ओळख असणारा चेहरा दिल्यामुळे राष्ट्रवादीही या लढतीमध्ये सामील झाली आहे. याच बरोबरीने या भागांमध्ये आदिवासी लोकसंख्या लक्षात घेता माकपने आपला उमेदवार उभे करून शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, व भाजपला आव्हान दिले आहे.

कोंढाण पंचायत समिती गणामध्ये यापूर्वी अपक्ष उमेदवार निवडून आले होते. मात्र त्यांचा अकाली मृत्यू झाल्याने त्यांच्या चुलत भावाला शिवसेनेकडून कडून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे सहानुभूतीची मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते प्रयत्नशील आहे. तर काँग्रेसच्या उमेदवाराचे येथे चांगले प्राबल्य असल्यामुळे बहुतांश मते आपल्या पदरात पाडून घेण्यासाठी ते प्रयत्नांची पराकाष्ठा करीत आहेत व त्यादृष्टीने निवडणुकीचा प्रचारही ते करत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमार्फत या गणात नवा चेहरा मिळाल्याने या उमेदवारालाही पसंती दिली जात आहे. नवघर घाटीम या गणात भाजप, सेना व बहुजन विकास आघाडी अशी लढत पाहावयास मिळणार आहे. असे असले तरी भाजप या भागामध्ये आपला प्रभाव टाकताना दिसून येत आहे. तर शिवसेना भाजपच्या विरोधात याठिकाणी कडवे आव्हान देत आहे. बहुजन विकास आघाडीची काही मते या भागात असल्यामुळे त्यांनाही चांगली मते पडणार आहेत असे सांगण्यात येत आहे. मात्र येथे सेना, भाजप एकमेकांना खऱ्या अर्थाने आव्हान देणार आहेत.

पालघर तालुक्यातील 9 पंचायत समिती गण

याआधी पालघर तालुक्यातील 9 पंचायत समिती गणांमध्ये शिवसेना, भाजप, बहुजन विकास आघाडी यांचा मतदारांवर प्रभाव असल्याचे दिसून येत आहे. असं असलं तरी आता होत असलेल्या पोट निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस यासह काही ठिकाणी माकपने आपले उमेदवार उभे करून सेना-भाजपला आव्हान दिले आहे. यामुळे सेना-भाजपची अनेक मते बहुजन विकास आघाडीसह राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसकडे वळणार आहेत. या पार्श्वभूमीवर गेल्या वेळच्या निवडणुकीपेक्षाही आगामी निवडणूक अधिकच रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने नवीन उमेदवार दिले असले तरी हे उमेदवार स्थानिक स्तरावरचे असल्याने स्थानिक मतदार त्यांना पसंती देतील का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. या सर्व उमेदवारांचे राजकीय भवितव्य 5 ऑक्टोबर रोजी मतदार मतपेटीत बंद करणार आहे. त्यामुळे मतमोजणीच्या दिवशी यापैकी कोणत्या उमेदवाराला मतदारांनी पसंती दिली आहे, हे निकाला दिवशीच स्पष्ट होईल.

पालघर तालुका जि.प.गट

सावरे एम्बुर-5 नंडोरे- देवखोप-6

पालघर तालुका पं.स.गण

नवापुर-6 सालवड- 5 सरावली (अवधनगर)-5 सरावली-5 मान-6 शिगाव खुताड-6 बऱ्हाणपूर-6 कोंढाण-4 नवघर घाटीम-4

इतर बातम्या :

प्रसाद कर्वे कोण आहेत, ज्यांच्यामुळे शिवसेनेत भूकंपाचे आवाज गडगडतायत?

ते पाप माझ्या हातून होणार नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया

Fight between Congress, Shiv Sena, BJP, NCP in Palghar ZP and Panchayat Samiti elections

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.