प्रसाद कर्वे कोण आहेत, ज्यांच्यामुळे शिवसेनेत भूकंपाचे आवाज गडगडतायत?

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप करण्यात आलाय. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा आरोप केला आहे. त्यात प्रसाद कर्वे यांचंही नाव समोर आलाय.

प्रसाद कर्वे कोण आहेत, ज्यांच्यामुळे शिवसेनेत भूकंपाचे आवाज गडगडतायत?
रामदास कदम, प्रसाद कर्वे यांच्यातील कथित ऑडिओ क्लिप


मुंबई : शिवसेनेचे नेते आणी माजी मंत्री रामदास कदम यांच्या कथित ऑडिओ क्लिपने रायकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. तसंच शिवसेनेत भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. परिवहन मंत्री अनिल परब यांच्या विरोधातील पुरावे रामदास कदम यांनीच भाजप नेते किरीट सोमय्या यांना पुरवल्याचा आरोप करण्यात आलाय. मनसेचे सरचिटणीस वैभव खेडेकर यांनी हा आरोप केला आहे. त्यात प्रसाद कर्वे यांचंही नाव समोर आलाय. अशावेळी प्रसाद कर्वे नेमके कोण आहेत? असा सवाल विचारला जात आहे. (Who is Prasad Karve? Audio clip between Ramdas Kadam and Prasad Karve goes viral)

कोण आहेत प्रसाद कर्वे?

प्रसाद कर्वे हे 2005 पासून माहिती अधिकार कार्यकर्ते म्हणून काम करतात. बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक मी आहे, असा दावा ते करतात. दापोली तालुक्यातील प्रसाद कर्वे हे पूर्वी मुंबईत कामाला होते. मुंबईत त्यांनी दत्ता साळवी, दत्ता नलावडे आणि गजानन किर्तीकर सारख्या नेत्यांसोबत काम केलं आहे. आतापर्यंत त्यांनी विविध कार्यालयात जवळपास 13 हजार माहिती अधिकार अर्ज दाखल केले आहेत. त्यांच्या अर्जामुळे अनेक अधिकाऱ्यांवर कारवायाही झाल्या आहेत. कर्वे यांचा मुख्य व्यवसाय हा पौरोहित्य आहे. त्यांना एक मुलगा पुण्यात नोकरीला आहे. तर दुसऱ्या मुलाचा स्वत:चा टेम्पो आहे. अनिल परब यांच्या विरोधातील माहिती रामदास कदम यांना पुरवली असं वैभव खेडेकर म्हणाले होते. त्यामुळे प्रसाद कर्वे यांचं नाव चर्चेत आलंय.

खेडेकरांकडून प्रसाद कर्वेंंचं नाव समोर

वैभव खेडेकर यांनी रामदास कदम यांनी प्रसाद कर्वे यांच्या माध्यमातून अनिल परब यांच्या रिसॉर्टबाबत माहिती मिळवली. तसेच नंतर ती किरीट सोमय्या यांना पुरवली गेली असा गंभीर आरोप केलाय. यानंतर त्यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. “अनिल परब आणि हे प्रकरण समाज माध्यमांवर यापूर्वीच आलेलं आहे. आता या संदर्भातील संभाषण ते माझं नसल्याचं म्हणत असतील. तर त्याबाबत फॉरेन्सिक तपास करावा. दुसरी गोष्ट म्हणजे जे प्रसाद कर्वे नामक माहिती अधिकार कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपल्या ऑडिओ क्लीप चोरीला गेल्याच्या पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. दुसरीकडे हे म्हणतात की त्या ऑडिओ क्लीप माझ्या नाहीत. यातच सगळा गौडबंगाल आहे. किरीट सोमय्या कोकणात येऊन उद्योजकांवर माहितीचा अधिकार टाकतात, सर्व माहिती मिळवतात. त्यांना स्थानिकांची साथ असल्याशिवाय ते एवढी मोठी डेअरिंग करुच शकत नाहीत. म्हणून मला म्हणायचंय शिवसेना आणि भाजपमध्ये सख्य नाहीय. त्यामुळे या ज्या क्लिप समाजमाध्यमांवर येत आहेत त्यांच्यात काहितरी तथ्य आहे, असे वैभव खेडेकर म्हणाले आहेत.

ज्यांनी राजकारणात उभं केलं, त्यांच्याविरोधातच पोटशूळ- प्रसाद कर्वे

तर दुसरीकडे प्रसाद कर्वे यांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. “खेड नगरपरिषदेच्या भ्रष्टाचाराबाबत नगराध्यक्षांनी जे घोळ केलेले आहेत, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. तो भ्रष्टाचार मी माहिती अधिकारात काढला. त्यांनंतर कायदेशीरपणे त्यांना अपात्र करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे नगरसेवकांद्वारे प्रस्ताव दिले. रामदास कदम आणि त्यांचे पुत्र कोट्यवधीचा निधी आणत असल्याने वैभव खेडेकर त्यांच्यावर वारंवार गंभीर आरोप करत आहेत. ज्यांनी त्यांना गुरु म्हणून राजकारणात उभं केलं त्यांच्याविरोधात त्यांचा पोटशूळ आहे,” असे प्रसाद कर्वे म्हणाले.

इतर बातम्या :

शिवसेनेत भूकंप, भाई, अनिल परबांचं ऑफिस तोडायची ऑर्डर झाली, रामदास कदम म्हणतात Very Good, व्हेरी गुड!

ते पाप माझ्या हातून होणार नाही, व्हायरल ऑडिओ क्लिपनंतर रामदास कदम यांची पहिली प्रतिक्रिया

Who is Prasad Karve? Audio clip between Ramdas Kadam and Prasad Karve goes viral

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI