Breaking : ईडीकडून अनिल परबांची तब्बल 8 तास चौकशी! तपासाला सहकार्य करणार, परबांची ग्वाही
शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री अनिल परब तब्बल 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

अनिल परब, परिवहन मंत्री
मुंबई : परिवहन मंत्री अनिल परब तब्बल 8 तासानंतर ईडी कार्यालयातून बाहेर पडले. ईडीच्या अधिकाऱ्यांकडून त्यांची तब्बल 8 तास चौकशी झाली. सकाळी 11 वाजता अनिल परब ईडी कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर संध्याकाळी 7 वाजता ते ईडी कार्यालयातून बाहेर पडले. त्यावेळी आपण ईडी अधिकाऱ्यांच्या सर्व प्रश्नांना उत्तरं दिल्याचं अनिल परब म्हणाले. तसंच यापुढेही ईडीला पूर्ण सहकार्य करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. (ED questioned transport minister anil parab for 8 hours)