शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन पुन्हा सांगतो, मी चुकीचं काही केलं नाही, मी चौकशीला सामोरे जातोय: अनिल परब

शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे.(Maharashtra State Transport Minister anil parab reaction on ed enquiry)

शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन पुन्हा सांगतो, मी चुकीचं काही केलं नाही, मी चौकशीला सामोरे जातोय: अनिल परब
अनिल परब, परिवहन मंत्री
Follow us
| Updated on: Sep 28, 2021 | 11:09 AM

मुंबई: शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि माझ्या मुलीचं शपथ घेऊन मी मागेच सांगितलं होतं की मी काही चुकीचं केलेलं नाही. आताही तेच सांगत आहे. मी काहीच चुकीचं काम केलं नाही. मला दुसरं समन्स आल्याने मी ईडीच्या चौकशीला सामोरे जात आहे, असं परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगितलं. (Maharashtra State Transport Minister anil parab reaction on ed enquiry)

दुसरं समन्स आल्यानंतर अनिल परब आज ईडीच्या चौकशीला जात आहे. त्यांनी ईडीच्या चौकशीला जाण्यापूर्वी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली. मला ईडीचं दुसरं समन्स मिळालं आहे. मी चौकशीला जात आहे. शिवसेनाप्रमुख आणि मुलीची शपथ घेऊन मागे सांगितलं आहे की मी काहीही चुकीचं काम केलं नाही. चौकशीत जे प्रश्न विचारले जातील त्याचे उत्तर देईल. कशासाठी बोलावलं मला माहीत नाही. मला कोणतंही स्पष्ट कारण दिलं नाही. चौकशीला गेल्यावर कळेल. तिकडे गेल्यावर अधिकृतपणे कळेल, असं परब यांनी सांगितलं.

इतरांबद्दल बोलणार नाही

ईडीने मला आज चौकशीला बोलावलं आहे. त्यामुळे मी चौकशीला सामोरे जात आहे. माझ्याकडून कोणतीही चूक झाली नाही. हे मला नक्की माहीत आहे, असं ते म्हणाले. इतर शिवसेना नेत्यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. त्यावर त्यांची प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. मी माझ्या बाबतीत बोलत आहेत. इतरांबद्दल बोलणार नाही, असं त्यांनी सांगितलं.

दुसरं समन्स

शंभर कोटी वसुली प्रकरणात अनिल परब यांना ईडीने समन्स बजवून मंगळवारी हजर राहण्यास सांगितले होते. त्यानुसार आज अनिल परब हे ईडी कार्यालयात जात आहेत. पोलिसांनीही ईडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवला आहे.

ईडीची नोटीस नेमकी कशासाठी?

अनिल परब यांना ईडीने नोटीस जारी केल्यानंतर एकच खळबळ उडाली. त्यांना ईडीने 31 ऑगस्टला सकाळी 11 वाजता ईडी कार्यालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या 100 कोटी वसुली प्रकरणात परब यांना हे समन्स जारी करण्यात आलं होतं.

पहिलं समन्स

परिवहनमंत्री अनिल परब यांना 29 ऑगस्ट रोजी ईडीने पहिलं समन्स पाठवलं होतं. त्यावेळी याबद्दलची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ट्विट करुन दिली होती. ट्विट करताना आम्ही कायद्यानेच लढू असे सांगत राऊत यांनी भाजपवर टीका केली होती. (Maharashtra State Transport Minister anil parab reaction on ed enquiry)

संबंधित बातम्या:

ईडीची ‘100 कोटी वसुलीची नोटीस’, अनिल परब मात्र फार फार 60 शब्द बोलून निघून गेले

अनिल परबांना ईडीची नोटीस, राऊत म्हणतात, वरच्या सरकारचं लव्ह लेटर आलं, नॉर्मल माणसं लढाया लढतात

हिंमत असेल तर ईडीच्या चौकशीला सामोरे जा, नितेश राणे यांचं अनिल परब यांना आव्हान

(Maharashtra State Transport Minister anil parab reaction on ed enquiry)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.