AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ; आशिष शेलार म्हणतात, अंतर्गत धोका असावा

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. (Ashish Shelar)

संजय राऊतांच्या सुरक्षेत वाढ; आशिष शेलार म्हणतात, अंतर्गत धोका असावा
ashish shelar and sanjay raut
| Edited By: | Updated on: Sep 01, 2021 | 3:09 PM
Share

मुंबई: शिवसेना नेते संजय राऊत यांच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. त्यावरून भाजप आमदार आशिष शेलार यांनी राऊत यांना टोला लगावला आहे. राऊत हे सतत मीडियासमोर असतात. त्यामुळे पक्षव कोण चालवतंय हे सर्वांना दिसतंय. त्यामुळेच बहुतेक त्यांना अंतर्गत धोका निर्माण झाला असावा, असा टोला आशिष शेलार यांनी लगावला आहे. (ashish shelar reaction on maharashtra government increased sanjay raut security)

आशिष शेलार यांनी आज वांद्रे येथे पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांना संजय राऊत यांच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना शेलार यांनी हा टोला लगावला. संजय राऊत यांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे चांगले आहे. ते नेते आहेत, संपादक आहेत. नेहमी पुढे बोलताना दिसतात. त्यामुळे पक्ष कोण चालवतो हेही दिसतंय. बहुतेक त्यामुळेच त्यांना बाहेरून नाही तर अंतर्गत धोका असावा म्हणून त्यांची सुरक्षा वाढवण्यात आली असावी, असा टोला शेलार यांनी लगावला.

खासदाराच्या जावयाच्या वाटाघाटी

राज्यातले थिअटर सुरू करण्यासाठी सत्ताधारी आघाडीतला एक राज्यसभा सदस्यांचा जावई सरकारच्यावतीने वाटाघाटी करतो आहे. वाटाघाटी करा, मग निर्बंध शिथिल करू, असा धंदा सुरू आहे. शिवसेनेच्या राज्यसभा सदस्याच्या जावयाने हे धंदे बंद करावेत, अन्यथा आम्ही नाव जाहीर करू, असा गर्भित इशारा त्यांनी दिला.

वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात

ठाकरे सरकारने निर्बंधाचा नवीन धंदा सुरू केलेला आहे. वाटा मिळाला की निर्बंध शिथिल होतात. जिथे घाटा आहे तिथे निर्बंध कडक राहतात म्हणून रेस्टॉरंटवाले, बारवाले, भेटले “वाटघाटी” झाल्या. वाटा मिळाला की, निर्बंधात शिथिलता दिली जाते. तर दुसरीकडे घाट्यात असलेले मराठी कलावंत, नाटक कलावंत, मराठी लोककलावंत, धुप कापूर विकणारे हे घाट्यात आहेत. वाटाघाटी करु शकत नाहीत. वाटा देऊ शकत नाहीत म्हणून त्यांच्यावर निर्बंध लादले गेले आहेत. त्यांची उपासमार सुरु आहे, हा वाटघाटीचा धंदा बंद करा. आता गणेशोत्सव, नवरात्र मंडळांसोबत पण शिवसेना वाटघाटी करणार का? असा सवाल त्यांनी केला.

शिवसेनेकडून लांगुलचालन

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याच्या सरकारच्या भूमिकेच्या बाजूने भाजपा आहे, पण निर्बंधांमध्ये वाटाघाटी करून निर्बंधाचा धंदा करण्याच्या सिलेक्टीव्ह कामामध्ये आम्ही बरोबर नाही. आम्ही त्या विरोधात आहोत. आमची भूमिका स्पष्ट आहे, नियम नियमावली करून मंदिर उघडा. प्रादुर्भाव वाढणार नाही याची काळजी घेऊन, त्याचे नियम करून गणेशोत्सव साजरा करू द्या. हिंदू सणांवरील आक्रमण बंद करा. एका विशिष्ट वर्गाची मतं मिळायला लागल्यापासून गेल्या तीन-चार वर्षांपासून शिवसेनेने हे काम सुरू केले आहे. याची सुरुवात बेहराम पाड्यापासून झाली आहे. या बेहराम पाड्यात शिवसेनेचा नगरसेवक निवडून आला आणि सर्वेमध्ये एका विशिष्ट वर्गाची मते मिळत आहेत असे दिसू लागल्यावर शिवसेनेने एका विशिष्ट वर्गाचे लांगुलचालन सुरु केले आहे. लालबाग, परळ आणि महाराष्ट्रातील जनतेकडे दुर्लक्ष केले आहे. तुम्हाला तुमचे राजकारण लखलाभ. सामान्य जनतेसाठी आम्ही आवाज उठवत राहू, असेही त्यांनी स्पष्ट केले. (ashish shelar reaction on maharashtra government increased sanjay raut security)

संबंधित बातम्या:

अटक,धरपकड करायला गोविंदा काय लादेन आहे का?; आशिष शेलारांचा आघाडी सरकारला संतप्त सवाल

लिस्टमधला 12 वा खेळाडू जितेंद्र आव्हाड, किरीट सोमय्यांचा जाहीर दावा; आव्हाडांना ईडीची नोटीस येणार?

ज्या आमदारांच्या जीवावर मुख्यमंत्री झालात त्यांना समजून घ्या; राष्ट्रवादीच्या आमदाराचा मुख्यमंत्र्यांना घरचा आहेर

(ashish shelar reaction on maharashtra government increased sanjay raut security)

Follow Us
मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर..
Dahi Handi in Mumbai | मुंबईच्या दहीहंडीला गालबोट! दुपारपर्यंत तब्बल 22 गोविंदा जखमी; एकावर रुग्णालयात उपचार सुरू
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून मोठं विधान
धमकीला भीक न घालता... शिवसेनेतील बड्या नेत्याने भर मंचावरून केलं मोठं विधान
दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला! पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी...
मोठी बातमी! दहीहंडीचा सांगाडा काढताना काळाचा घाला, पिंपरी-चिंचवडमध्ये लोखंडी कमानीखाली दबून महिलेने गमावला जीव
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात...
उद्धव ठाकरेंच्या खांद्यावर चढून... ठाण्यातील दहीहंडी कार्यक्रमात शिंदे गटातील नेत्याचा राऊतांना खोचक टोला
ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; शाळेतूनच प्रो-गोविंदा...
Dahi Handi in Thane | ठाण्यात दहीहंडीच्या 21व्या वर्षी मोठा संकल्प; गोविंदांना शाळेतूनच प्रो-गोविंदा प्रशिक्षण, लक्ष्य थेट...
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी
रविंद्र फाटकांच्या दहीहंडी कार्यक्रमात हास्यजत्रेतील कलाकारांची हजेरी; प्रत्येक कलाकाराचे...
कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश
Krushi Exam | एका पेपरला एक परीक्षक, तर काहींना तीन? कृषी सेवा परीक्षेच्या निकालावर विद्यार्थ्यांनी उपस्थित केले गंभीर प्रश्न
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट...
देवेंद्र फडणवीस मुंबई, ठाण्यात 14 दहीहंडी मंडळांना देणार भेट; राज्यभरात गोविंदांचा उत्साह
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत
शुभम मोटघरे यांच्या घरावर गोळीबार प्रकरणात मोठी कारवाई! 7 आरोपी अटकेत; मुख्य सूत्रधारावर तब्बल...
तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध
Babanrao Taywade | ओबीसींच्या हक्कांवर गदा आली तर रस्त्यावर उतरू! बबनराव तायवाडेंचा भुजबळांना पूर्ण पाठिंबा; सरसकट कुणबी प्रमाणपत्राला विरोध