लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?, लंकेवरील टीकेचा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून समाचार

चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

लाचखोर नवऱ्याची बायको म्हणून तुमची राज्याला ओळख, नीतिमत्ता कुणाला शिकवता?, लंकेवरील टीकेचा राष्ट्रवादीच्या नेत्याकडून समाचार
मेहबूब शेख, चित्रा वाघ आणि निलेश लंके
Follow us
| Updated on: Sep 06, 2021 | 7:56 AM

अहमदनगर : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यावर कडाडून टीका केलीये. “चित्रा वाघ यांचे पती किशोर वाघ यांच्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली. वाघ काय खातो तर वाघ पैसे खातो आणि वाघिणीला नेऊन देतो”, अशी बोचरी टीका करत आमदार निलेश लंके यांच्यावरील टीकेचा मेहबूब शेख यांनी खरपूस समाचार घेतला.

लंकेवरील टीकेचा मेहबूब शेख यांच्याकडून समाचार

पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी कोव्हिड काळात केलेल्या कामाने ते पूर्ण देशात लोकप्रिय झाले. परंतु मागच्या महिन्यात पारनेरच्या तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपाने ते अडचणीत सापडले होते. चित्रा वाघ यांनी आक्रमक भूमिका घेत निलेश लंके यांच्यावर आरोपाच्या फैरी झाडल्या होत्या. याच आरोप प्रत्यारोपांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी सडेतोड उत्तर दिलं. ते पारनेर तालुक्यातील विविध विकासकामांच्या उद्घाटनाप्रसंगी बोलत होते.

“अहो चित्रा वाघ लाचखोर नवऱ्याची बायको ही तुमची महाराष्ट्राला ओळख आहे. अगोदर नीतिमत्ता तुमच्या नवऱ्याला शिकवा नंतर आम्हाला शिकवा, अशी खरमरीत टीका मेहबूब यांनी केली. महिलांचा आदर आम्हाला काय शिकवताय?, राष्ट्रवादी पक्षच महिलांचा आदर करणारा पक्ष आहे. आधी आपल्या घरात नीतिमत्ता शिकवा”, असा पलटवार त्यांनी चित्रा वाघ यांच्यावर केला.

मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय?

“तुमच्या-माझ्या सारख्या कार्यकर्त्याला चित्रा वाघ नीतिमत्ता शिकवायला निघाल्या आहेत. आधी तुमच्या नवऱ्याला नीतिमत्ता शिकवा, नंतर आम्हाला शिकवा. तुमचे पती लाच घेतल्याप्रकरणी अटकेत होते, असं सांगायला देखील शेख विसरले नाहीत. मेलेल्या मढयावरचं लोणी खाणारी तुमची अवलाद, तुम्ही आम्हाला नीतिमत्ता शिकवताय, अशा शब्दात मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्ला चढवला. तुमच्या नवऱ्याकडे बेहिशोबी मालमत्ता सापडली, हे मी नाही बोलत तर एसीबीचा रिपोर्ट आहे, असं शेख म्हणाले.

सर्वसामान्य कुटुंबातील मुलगा पुढे जात असेल तर ती गोष्ट कुणाच्या तरी डोळ्यात खुपते

आमदार निलेश लंके यांच्यावर तहसीलदार ज्योती देवरे यांनी केलेल्या आरोपावर देखील त्यांनी भाष्य केलं. “लंके यांच्यावर आरोप झाला मात्र सर्वसामान्य कुटुंबातील एखादा कार्यकर्ता स्वतःच्या मेहनतीवर स्वतःचं अस्तिव निर्माण करत असेल त्यावेळी ही गोष्ट कोणाच्या तरी डोळ्यात खुपत असते, त्यातून असे आरोप होत असतात”, असं ते म्हणाले.

सुपारी देण्याची पद्धत निघालीय, चांगल्या माणसाला बदनाम करायचं

“पूर्वी लोक कोणाला खल्लास करायचं असेल तर डाकूला सुपाऱ्या द्यायचे. मात्र आता सुपारीची नवीन पद्धत निघाली आहे. एखाद्या चांगल्या माणसाला बदनाम करायची सुपारी दिली जाते. तुमचं प्रकरण विचित्र पध्दतीने लोकांसमोर मांडल गेलं असून माझ्यावरही असेच आरोप झाले. तुमच्या वेळी मुंबईवरुन ज्या धावून आल्या, त्या सकाळ संध्याकाळ माझं नाव घेतात”, असा टोला मेहबूब शेख यांनी चित्रा वाघ यांना लगावला.

तुमच्या नवऱ्याच्या नार्को टेस्टसाठी तुम्ही तयार आहात का?

“ज्या दिवशी माझ्यावर आरोप झाला त्याच दिवशी पत्रकार परिषद घेऊन मी सांगितले की माझी नार्को टेस्ट करा. दोषी असेल तर मला चौकात फासावर चढवा… जसं मी पुढे येऊन सांगतोय तसं तुम्हीही पुढे येऊन सांगा, माझा नवरा दोषी नाही… त्याची देखील नार्को टेस्ट करा”, असं आव्हानच त्यांनी चित्रा वाघ यांना दिलं.

तसेच चित्रा वाघ यांना राष्ट्रवादीचे सर्व लोक ओळखतात… कुणीही त्यांना गांभीर्याने घेत नसून भाजपचे लोक सांगतात तुमचं नाव करायचं असेल तर 5 कोटी द्या, अशी मागणी त्या करतात…. अशा प्रकारची अनेक प्रकरणं माझ्याकडे आहेत… योग्यवेळी पुराव्यानिशी बोलेल, असा इशारा त्यांनी जाताजाता चित्रा वाघ यांना दिलाय.

(NCP Youth President Mahebub Shaikh Attacked BJP Chitra Wagh over MLA Nilesh Lanke Criticism)

हे ही वाचा :

‘..तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार’, चित्रा वाघ यांचा मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब, चित्रा वाघ आक्रमक

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.