‘..तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार’, चित्रा वाघ यांचा मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर

महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे.

'..तर माझ्यावर रोज 100 गुन्हे दाखल करा, मी बोलत राहणार', चित्रा वाघ यांचा मेहबूब शेख यांना प्रत्युत्तर
भाजप नेत्या चित्रा वाघ, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष महेबूब शेख


मुंबई : भाजपच्या उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्याविरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख (Mehboob Shaikh) यांनी गुन्हा दाखल केलाय. चित्रा वाघ यांनी बीडच्या शिरुरमध्ये येऊन माझी नको ती बदनामी केली, असा आरोप करत शेख यांनी पोलिसांत तक्रार दिली आहे. त्यावर आता चित्रा वाघ यांनीही मेहबूब शेख यांना जोरदार प्रत्युत्तर दिलंय. महिल्यांवर अत्याचार करण्याऱ्यांबाबत भाष्य केलं म्हणून माझ्यावर गुन्हा दाखल होत असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा, असं आव्हानच चित्रा वाघ यांनी शेख यांना दिलं आहे. (Chitra Wagh’s reply after Mehboob Sheikh filed the case)

“आज मी चिपळूणला आहे व मला बरेच जणांचे फोन येताहेत कि शिरूरकासार येथे मेहबूब शेख च्या तक्रारीवर माझ्यावर गुन्हा दाखल केलाय. महिलांवर अत्याचार करणाऱ्यांवर भाष्य केलं म्हणून राज्यात माझ्यावर गुन्हा दाखल होतं असेल तर असे दिवसाला 100 गुन्हे दाखल करा. पण मी बोलत रहाणार.. लडेंगे..जितेंगे”, असं ट्वीट चित्रा वाघ यांनी केलंय.

मेहबूब शेख यांनी पोलिस तक्रारीत काय म्हटलंय?

“18 जुलै 2021 रोजी शिवाजी एकनाथ पवार (जिल्हा परिषद सदस्य बीड) यांच्या घरी चित्रा वाघ आल्या होत्या. त्यांच्यासोबत बीड जिल्ह्याचे भाजपचे अध्यक्ष राजेंद्र म्हस्के आणि इतर असंख्य कार्यकर्ते हजर होते. चित्रा वाघ यांनी शिरुर येथे येऊन माझी बदनामी व्हावी या उद्देशाने मी एका मुलीवर बलात्कार केला असल्याचं सांगत, राज्य सरकार मेहबूबला अटक करत नाही, असं म्हटलं.”

“वास्तविक माझ्यावर झालेल्या आरोपांसंबंधी पोलिसांनी तपास करुन तो गुन्हा निकाली काढला आहे. मात्र तरीही माझी बदनामी व्हावी, या उद्देशाने त्यांनी माझ्यावर नको नको ते आरोप केले आणि माझ्या बदनामीचा प्रयत्न केला”, असं मेहबूब शेख यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटलंय.

“चित्रा वाघ यांनी केलेल्या आरोपाची व्हिडीओ क्लिप काही पत्रकार मित्रांनी मला दाखवली, जी पाहिल्यानंतर मला खूप मनस्ताप झाला. माझी समाजात बदनामी झाली”, असंही मेहबूब शेख यांनी म्हटलंय.

नेमकं प्रकरण काय?

औरंगाबादमधील एका तरुणीने राष्ट्रवादीचे युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. या प्रकरणात मेहबूब शेख चांगलेच अडचणीत आले होते. त्यावेळी त्यांची पोलिस चौकशीही झाली. या सगळ्या प्रकरणांवरुन चित्रा वाघ यांनी सातत्याने आवाज उठवला आहे. मेहबूब शेख यांना अटक व्हावी, अशी मागणी करणारे ट्विट त्यांनी मागील काळात केले.

संबंधित बातम्या : 

मेहबूब शेख यांच्याविरोधात बलात्काराची तक्रार देणारी तरुणी गायब, चित्रा वाघ आक्रमक

Rape Case | बलात्काराचा आरोप झालेले NCPचे मेहबुब शेख कोण?

Chitra Wagh’s reply after Mehboob Sheikh filed the case

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI