AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या

भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी यांनी केली आहे. (Chitra Wagh)

राष्ट्रवादी युवक अध्यक्षावर बलात्काराचा गुन्हा, अजूनही अटक का नाही? चित्रा वाघ कडाडल्या
चित्रा वाघ, भाजप नेत्या
| Updated on: Dec 29, 2020 | 11:01 PM
Share

मुंबई: भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी पुन्हा एकदा राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. “राज्यातील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख याच्यावर बलात्काराचा गन्हा दाखल झालाय”, असं चित्रा वाघ म्हणाल्या.  या पद्धतीच्या प्रकरणांत आरोपीला अटक करण्यात येते. औरंगाबाद पोलिसांनी आरोपीला अद्याप अटक केलेली नाही. सर्वसाधारण आरोपी असता तर त्या आरोपीला अटक करण्यात आलेली नाही, असा आरोप चित्रा वाघ यांनी केला. चौकशी आणि तपासाच्या नावाखाली आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. आरोपी समोर दिसत असताना पोलीस का शांत बसले आहेत, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला आहे. (Chitra Wagh demanded Mehboob Shaikh should be arrested by Aurangabad Police )

राज्यात लागू करण्यात येणाऱ्या शक्ती विधेयकात राजकीय कार्यकर्त्यांसाठी विशेषत: सत्ताधारी पक्षांच्या कार्यकर्त्यांसाठी वेगळी तरतूद करण्यात आलीय का? हा प्रश्न चित्रा वाघ यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांना विचारला आहे. ज्या आरोपींवर गुन्हा दाखल झालाय त्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर कँम्पेन राबवण्यात येत आहे. पीडिते आणि तिच्या कुटुंबावर दबाव टाकण्याचा प्रयत्न असून पोलिसांनी त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

औरंगाबाद पोलिसांनी आरोपी मेहबूब शेख याला तात्काळ अटक करावी, अशी मागणी चित्रा वाघ यांनी केली आहे.

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे ट्विट

काय आहे प्रकरण?

औरंगाबाद पोलीस ठाण्यात मेहबूब इब्राहिम शेख याच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख यांनी या सगळ्या प्रकाराशी सबंध नसल्याचा खुलासा केला आहे. औरंगाबाद शहरात शिकवण्या घेणाऱ्या एका तरुणीला नोकरी लावण्याचे आमिष दाखवण्यात आले होते. 14 नोव्हेंबरच्या रात्री 9 वाजण्याच्या सुमारास संबंधित तरुणीला महेबूब शेख याने भेटण्यासाठी बोलवून घेतले आणि त्यानंतर गाडीत बसवून निर्जन ठिकाणी नेत बलात्कार केला, अशी तक्रार संबंधित तरुणीने औरंगाबादच्या सिडको पोलीस ठाण्यात दिली होती. त्यानुसार सिडको पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, हा गुन्हा दाखल झाल्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा प्रदेश अध्यक्ष महेबूब शेख यांनी आपला खुलासा जाहीर केला आहे. ज्या खुलशात या प्रकरणाशी आपला संबंध नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

मेहबूब शेख यांचा खुलासा

औरंगाबादमधील सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याची माहिती मिळाली. त्यानंतर मी पोलीस अधिकाऱ्यांशी बोललो आणि मेहबूब इब्राहिम शेख या व्यक्तीचा शोध घेण्याची मागणी केली, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख म्हणाले. संबंधित तरुणीला प्रत्यक्ष भेटलो किंवा फोनवर बोललेलो नाही. मी 10 आणि 11 तारखेला मुंबईत होतो, माझे मुंबईत कार्यक्रम होते. आरोपी मी असेन तर माझी नार्को टेस्ट करावी, अशी मागणी पोलिसांकडे करतोय, असं मेहबूब शेख म्हणाले. 14 नोव्हेंबरला गावाकडं होतो. पोलिसांना सर्व पुरावे माहिती देण्यास तयार आहे. या प्रकरणामागे कोण आहे, याचा पोलिसांनी शोध घ्यावा, असंही मेहबूब शेख म्हणाले. मेहबूब शेख यांनी त्यांच्या फेसबूक अकाऊंटवर याबाबत एक व्हिडीओ शेअर केला आहे.

संबंधित बातम्या:

Amravati | प्रत्येक क्वारंटाईन सेंटरमध्ये CCTV लावा, अमरावतीच्या घटनेनंतर चित्रा वाघ यांची मागणी

Hathras Rape | अनिल देशमुखांचा योगी आदित्यनाथांवर हल्ला, चित्रा वाघ यांचा गृहमंत्र्यांवर निशाणा

(Chitra Wagh demanded Mehboob Shaikh should be arrested by Aurangabad Police )

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.