AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भंडारा 10 नवजात बालक मृत्यू प्रकरणात राज्य सरकारची पोकळ कारवाई? निलंबित डॉक्टर पुन्हा कामावर रुजू

भंडारा इथल्या माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. प्रमोद खंडाते पुन्हा आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. डॅा. खंडाते वर्धा जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे.

भंडारा 10 नवजात बालक मृत्यू प्रकरणात राज्य सरकारची पोकळ कारवाई? निलंबित डॉक्टर पुन्हा कामावर रुजू
| Edited By: | Updated on: Jan 25, 2021 | 12:16 PM
Share

भंडारा : संपूर्ण देश हादरवून सोडणाऱ्या भंडारा जिल्हा रुग्णालयात लागेलेल्या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणात राज्य सरकारची थातूरमातूर कारवाई केली का? असा प्रश्न आता समोर येत आहे. कारण, भंडारा इथल्या माजी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा. प्रमोद खंडाते पुन्हा आरोग्य विभागात रुजू झाले आहेत. डॅा. खंडाते वर्धा जिल्हा रुग्णालयात रुजू झाल्याची माहिती समोर येत आहे. आरोग्य उपसंचालक डॅाक्टर संजीव जायसवाल यांनी यासंबंधी माहिती दिली आहे. यामुळे राज्य सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. (Bhandara hospital fire state government Suspended doctor resumes work)

मिळालेल्या माहितीनुसार, 10 नवजात बाळ मृत्यू प्रकरणात डॅा. प्रमोद खंडाते यांना निलंबीत करण्यात आलं होतं. पण आता ते पुन्हा कामावर रुजू झाले आहेत. त्यामुळे राज्य सरकारने नेमकी कशी कारवाई केली असा प्रश्न आता जनतेमधून विचारला जात आहे. दरम्यान, काही दिवसांआधीच राज्य सरकारने या प्रकरणात मोठी कारवाई केली होती. या दुर्घटनेला जबाबदार ठरवत तिथले डॉक्टर आणि नर्सवर कारवाई करण्यात आली होती. सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांना निलंबित करण्यात आलं होतं. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली होती. तशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली होती. पण आता प्रमोद खंडाते यांच्या कामावर रुजू झाल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

रुग्णालयातील कर्मचाऱ्यांचा हलगर्जीपणा

9 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा रुग्णालयातील शिशू केअर युनिटला मध्यरात्री आग लागली होती. या आगीत 10 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. त्यात 8 मुली तर 2 मुलांचा समावेश होता. या आगीत 3 बालकांचा होरपळून तर 7 बालकांचा धुरामुळे गुदमरून मृत्यू झाला होता. दरम्यान, रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे 7 बालकांना वाचवण्यात यश आलं होतं. या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले होते. त्यानुसार विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमण्यात आली होती. या समितीनं केलेल्या तपासात रुग्णालयातील कर्मचाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे आग लागल्याचं समोर आलं आहे.

7 जणांवर कारवाई, 6 जणांचं निलंबन

आरोग्यमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार, भंडारा जिल्हा रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेसंबंधीचा अहवाल काल उशिरा आरोग्य विभागाला मिळाला. त्या अहवालानुसार रेडियंट हिटरमध्ये स्पार्क झाल्यानं आग लागली होती. रात्री 1 ते 1.30 च्या सुमारास ही आग लागली. रुम बंद आणि तिथं प्लास्टिक असल्यानं आग पसरली. 2015 मध्ये या रुग्णालयाचं उद्घाटन झालं होतं. त्यावेळी रुग्णालयाचं फायर ऑडिट झालं नाही. आगीमागे ते कारणही आहे. तसंच तिथं उपस्थित असलेल्या डॉक्टर आणि नर्सनी कर्तव्यात कसूर केल्याचं दिसून आल्याची माहिती टोपे यांनी दिली आहे.

या प्रकरणात सिव्हिल सर्जन डॉ. प्रमोद खंडाते, वैद्यकीय अधिकारी अर्चना मेश्राम यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली. तर डॉ. सुनिता बडे यांची तातडीनं बदली करण्यात आली आहे. त्याचबरोबर सुशील अबाते यांना बडतर्फ करण्यात आलं आहे. नर्स ज्योती भास्कर, स्टाफ नर्स स्मिता आंबीददुलके आणि शुभांगी साठवणे यांचं निलंबन करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. (Bhandara hospital fire state government Suspended doctor resumes work)

संबंधित बातम्या – 

Bhandara Hospital Fire : भंडारा जिल्हा रुग्णालय आग प्रकरणात अखेर मोठी कारवाई, सिव्हिल सर्जनसह 6 जणांचं निलंबन

भंडारा शासकीय रुग्णालयातील आगीला जबाबदार कोण? राज्याच्या आरोग्य यंत्रणेवर मोठं प्रश्नचिन्ह

Bhandara Hospital Fire | “माझ्या बाळाला एकदा तरी पाहू द्या”, बाळांच्या आई आणि नातेवाईकांची आर्त हाक

(Bhandara hospital fire state government Suspended doctor resumes work)

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...