भंडारा : पानटपरी फोडणाऱ्या चोरट्याला अटक, 44 हजारांचा मुद्देमाल हस्तगत

मोहाडी तालुक्यातल्या चिचोलीमध्ये पानटपरी फोडून 44 हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या.

भंडारा : पानटपरी फोडणाऱ्या चोरट्याला अटक, 44 हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Follow us
| Updated on: Dec 12, 2021 | 9:47 AM

भंडारा : मोहाडी तालुक्यातल्या चिचोलीमध्ये पानटपरी फोडून 44 हजारांचा मुद्देमाल लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी अटक केली आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर अवघ्या काही तासांच्या आतच पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून मुद्देमाला जप्त करण्यात आला आहे. दरम्यान या प्रकरणात अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

मुद्देमाल जप्त

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील चिचोलीमध्ये राजेंद्र सुधाकर सोनकुसरे यांच्या मालकीची पानटपरी आहे. या टपरीचे शटर तोडून अज्ञान चोरट्याने 38 हजार रुपये रोख व इतर साहित्य असा मिळून 44 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल  चोरून नेला होता. टपरीत चोरी झाल्याची घटना लक्षात आल्यानंतर सोनकुसरे यांनी आंधळगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रार मिळताच पोलिसांनी तपासाला सुरुवात केली.

अवघ्या काही तासांमध्ये चोरट्याला अटक

दरम्यान तपास सुरू असताना अवघ्या काही तासांमध्येच पोलिसांनी संबंधित चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ज्यामध्ये 38 हजार रुपये रोख व इतर साहित्याचा समावेश आहे. चोरट्याची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या 

MHADA exams | म्हाडा भरती पेपर फुटीचा प्रयत्न, मोठे मासे गळाला, पुण्यात तिघा जणांना अटक

Cyber Fraud | 400 रुपयांचा केक घेताना मुंबईत डॉक्टर महिलेची फसवणूक, 53 हजारांचा ऑनलाईन गंडा

Breaking: पंतप्रधान मोदींचं ट्विटर अकाऊंट हॅक, बिटकॉईन्सच्या संदर्भात खोडसळ घोषणा, फॉरवर्ड करु नका

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.