मेथीच्या भाजीच्या वादातून घडले महाभारत; मोठ्या वहिणीवर ब्लेडने हल्ला; गुन्हा दाखल होताच दिर फरार

घरामध्ये जेवण करताना भाजी देण्याच्या कारणावरुन आई वडिलांना त्यांचा मुलगा शिव्या देत होता. आई वडिलांचे आणि मुलाचा वाद वाढू नये म्हणून त्या घरातील वहिणीने मध्यस्ती करत त्यांनी दिराला वाद करु नका म्हणून हटकले. या कारणावरुन वहिणीवर ब्लेडने वार करण्यात आले.

मेथीच्या भाजीच्या वादातून घडले महाभारत; मोठ्या वहिणीवर ब्लेडने हल्ला; गुन्हा दाखल होताच दिर फरार
उल्हासनगरमध्ये विधेवर कात्रीने केला हल्ला
Image Credit source: tv9
| Updated on: May 14, 2022 | 5:36 PM

भंडाराः मेथीच्या आळणासाठी (भाजी) आई-वडिलांना शिविगाळ करणाऱ्या दिराला मोठ्या वहिनीने हटकले म्हणून लहान दिराने चक्क वहिनीच्या गालावर ब्लेडने हल्ला (Blade Attack) केल्याची घटना घडली आहे. भंडारा (Bhandara) जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील जांभोरा (Jambhora) येथे ही घटना घडली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. ब्लेडने हल्ला केला गेल्याने महिला जखमी झाली असून त्यांना रुग्णालयात दाखल केले गेले आहे, त्यानंतर या हल्ल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून दिरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

घरामध्ये जेवण करताना भाजी देण्याच्या कारणावरुन आई वडिलांना त्यांचा मुलगा शिव्या देत होता. आई वडिलांचे आणि मुलाचा वाद वाढू नये म्हणून त्या घरातील वहिणीने मध्यस्ती करत त्यांनी दिराला वाद करु नका म्हणून हटकले.

ब्लेडमुळे गंभीर जखम

त्यावेळी मला का हटकले या रागातून दिराने चक्क ब्लेडने आपल्या वहिनीवर हल्ला केला. ब्लेडच्या या हल्ल्यात वहिणी जखमी झाली असून हल्ला झाल्याच्या कारणातून त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांना दिराचा शोध

वहिणीवर ब्लेडने हल्ला केल्याप्रकरणी पोलिसात तक्रार दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल केला गेला आहे. ही गोष्ट त्या दिराला समजताच तो फरार झाला आहे. त्याचा तपास करडी पोलीस करत असून या प्रकरणाची माहिती घेण्याचे काम सुरु आहे.

कुटुंबीयांनाही धक्का

याप्रकरणी पोलीस दिराचा कसून तपास करत असून त्याला ताब्यात घेण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. भाजीच्या वादातून घरात वाद झाल्यानंतर ब्लेडने हल्ला करण्यात आल्याने कुटुंबीयांनाही यामुळे धक्का बसला आहे. जखमी झालेल्या वहिणीला रुग्णालयात दाखल केले गेले असून पुढील तपास करडी पोलीस करत आहेत.