AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुलाबी चक्रीवादळाचा नाशिकला तडाखा, भारती पवारांचा पाटलांवर निशाणा

गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लासलगाव आणि येवला तालुक्यात मुसळधार पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले. तसेच लासलगावजवळील गाढवे नाल्याला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले, प्रताप सागर तलाव फुटल्याने 20 ते 25 कुटुंब असलेल्या झोपड्या आणि संसार वाहून गेले, असंही भारती पवार म्हणाल्या.

गुलाबी चक्रीवादळाचा नाशिकला तडाखा, भारती पवारांचा पाटलांवर निशाणा
| Edited By: | Updated on: Oct 03, 2021 | 8:50 PM
Share

नाशिकः गेल्या काही दिवसांपूर्वीच राज्याला गुलाबी चक्रीवादळानं तडाखा दिला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं. त्याच पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केलाय. गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे झालेल्या मुसळधार पावसाने शेती आणि शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. मात्र महाविकास आघाडीतील मंत्र्यांना काही देणे-घेणे नसून पक्षवाढीसाठी मेळावे घेत असल्याचा टोला केंद्रीय मंत्री भारती पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे नाव न घेता लासलगाव येथे नुकसान पाहणीनंतर माध्यमांशी बोलताना लगावलाय.

मुसळधार पावसाने शेती पिकाचे नुकसान

गुलाबी चक्रीवादळाच्या प्रभावामुळे लासलगाव आणि येवला तालुक्यात मुसळधार पावसाने शेती पिकाचे नुकसान झाले. तसेच लासलगावजवळील गाढवे नाल्याला मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी आले, प्रताप सागर तलाव फुटल्याने 20 ते 25 कुटुंब असलेल्या झोपड्या आणि संसार वाहून गेले, असंही भारती पवार म्हणाल्या.

आदिवासी बांधवांना मदतीचे आश्वासन देत अधिकाऱ्यांना सूचना

मात्र याठिकाणी मतदारसंघाचे आमदार आणि पालकमंत्री छगन भुजबळ पोहोचले नाहीत. तसेच राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील येवला दौरा कार्यकर्ते परिसंवाद मेळाव्यासाठी मार्गदर्शन करण्यासाठी आले होते. मात्र नुकसानग्रस्त भागाची किंवा नुकसानग्रस्तांचे सांत्वन न करता निघून गेले, मात्र आज केंद्रीय आरोग्य आणि समाज कल्याण राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार यांनी धावता दौरा करत संसार वाहून गेलेल्या आदिवासी बांधवांना मदतीचे आश्वासन देत अधिकाऱ्यांना सूचना केल्यात.

कोव्हॅक्सिन लसीला लवकरच परवानगी मिळणार

कोव्हॅक्सिन लसीला who कडून मान्यतेबाबत विचारले असता त्या म्हणाल्या, लसीच्या बाबतीत प्रक्रिया असतात. त्याकरिता कागदपत्राची पूर्तता करावी लागते. ते काम आता अंतिम टप्प्यात असल्याने काही काळाने लवकरच कोव्हक्सिन लसीला परवानगी मिळणार असल्याचे प्रतिपादन केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण राज्यमंत्री भारती पवार यांनी केले.

संबंधित बातम्या

पंकजा मुंडे आजारी, विरोधी पक्षनेत्यांचा बीड जिल्ह्यातील पाहणी दौरा रद्द!

सुभाष साबणे शिवसेनेतून बडतर्फ, देगलूरमध्ये आघाडीचाच उमेदवार; अनिल देसाई यांची माहिती

Bharti Pawar criticize jayant patil on Pink cyclone hit Nashik

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.