मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा, सांगलीत घडामोडींना वेग

राज्यात सध्या विधान परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. प्रचाराला देखील वेग आला आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू आहेत, त्यातच आता राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर आली आहे.

मोठी बातमी! राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा झटका, बड्या नेत्याचा भाजपला पाठिंबा, सांगलीत घडामोडींना वेग
शरद पवार गटाला धक्का
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 19, 2026 | 3:51 PM

महाराष्ट्रात सध्या विधान परिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. प्रचार अंतिम टप्प्यात आला असून, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू असल्याचं पहायला मिळत आहेत. राज्यात पाच जागांसाठी निवडणुका होणार आहेत. ज्यामध्ये नागपूर पदवीधर मतदारसंघ,  मराठवाडा पदवीधर मतदारसंघ, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ तसेच अमरावती शिक्षक मतदारसंघ  या जागांचा समावेश आहे. मात्र या निवडणुकांमध्ये काही प्रमाणात बंडखोरी झाल्याचं देखील पहायला मिळत आहे. काही ठिकाणी एकाच मतदारसंघात महाविकास आघाडीचे दोन उमेदवार निवडणूक लढवत आहेत, तर पुणे शिक्षक मतदारसंघत महायुतीमध्ये भाजप आणि शिवसेनेत मौत्रीपूर्ण निवडणूक होत असल्याचं चित्र आहे.

दरम्यान एकीकडे या सर्व घडामोडी सुरू असताना आता सांगिलीमधून मोठी बातमी समोर आली आहे, ती म्हणजे  पुणे पदवीधरचे विद्यमान आमदार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते अरुण लाड यांनी थेट महायुतीच्या मेळाव्याला हजेरी लावली आहे. पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये सांगलीत महायुतीचा मेळावा पार पडला, या मेळाव्याला अरुण लाड हे उपस्थित होते.  अरुण लाड यांच्या उपस्थितीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलं आहे.

Loading...

महायुतीच्या या मेळाव्यामध्ये महायुतीच्या नेत्यांसोबतच लाड देखील उपस्थित होते. त्यामुळे आता आमदार अरुण लाड हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरू झाली आहे.  त्याचे पुत्र शरद लाड यांनी आधीच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. आता शरद लाड यांच्यानंतर  आमदार अरुण लाड देखील भाजपात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

पुण्यात महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत 

दरम्यान पुणे शिक्षक मतदारसंघामध्ये महायुतीमध्ये मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचं आता स्पष्ट झालं आहे. या मतदारसंघावर भाजपसह शिवसेनेनं देखील दावा केला होता. परंतु महायुतीमध्ये ही जागा भाजपच्या वाट्याला गेली. त्यानंतर आता शिवसेना शिंदे गटाकडून या निवडणुकीत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या सचिन सानप यांच्या नावाची शिवसेना पुरस्कृत उमेदवार म्हणून घोषणा करण्यात आली आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us