AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी; सीबीआयचं पथक पुन्हा नांदेडमध्ये, दोन ठिकाणी छापे

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआयचं पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झालं आहे. सीबीआयकडून नांदेडमध्ये तीन ठिकाणी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी; सीबीआयचं पथक पुन्हा नांदेडमध्ये, दोन ठिकाणी छापे
NEET Paper CaseImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 28, 2026 | 9:15 PM
Share

नीट पेपर फुटीप्रकरणात मोठी बातमी समोर येत आहे. सीबीआयचं पथक पुन्हा एकदा नांदेडमध्ये दाखल झालं आहे. सीबीआयकडून नांदेडमध्ये तीन ठिकाणी चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये दोन ठिकाणी सीबीआयकडून छापा टाकण्यात आला आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात दोन विद्यार्थी आणि एका कुटुंबाची सीबीआयकडून चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. सुमारे सात ते आठ तास चौकशी केल्यानंतर सीबीआयचं पथक नांदेडहून पुन्हा लातूरकडे रवाना झालं आहे.

वैद्यकीय परीक्षेसाठी नीट ही अत्यंत महत्त्वाची परीक्षा आहे. मात्र या परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं प्रकरण समोर आल्यानं देशभरात मोठा गोंधळ उडाला होता. नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं समोर येताच सरकारने ही परीक्षा रद्द केली आणि या प्रकरणाच्या तापासाची जबाबदारी सीबीआयकडे सोपवण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत सीबीआयकडून 13 जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाराष्ट्रातल्या देखील काही जणांचा समावेश आहे.

दरम्यान आज पुन्हा एकदा सीबीआयचं पथक नांदेडमध्ये आलं होतं. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार यावेळी सीबीआयकडून तीन ठिकाणी चौकशी करण्यात आली.  शिवाजीनगर आणि भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोन ठिकाणी छापे टाकत सीबीआने तपास केला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणात सीबीआयने दोन विद्यार्थिंनीची आणि एका कुटुंबाची चौकशी केली आहे. यापूर्वी चौकशी केलेल्या एका विद्यार्थिनीची पुन्हा एकदा चौकशी करण्यात आली आहे. सुमारे सात ते आठ तास ही चौकशी सुरू होती, त्यानंतर  सीबीआयचं पथक पुन्हा लातूरकरडे रवाना झालं.  पेपरफुटी प्रकरणाचा तपासा सुरू असताना समोर आलेल्या माहितीच्या आधारे,  पेपर विकत घेतल्याच्या संशयावरू ही चौकशी करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

दरम्यान पुन्हा नीट परीक्षा पेपर लीक सारखी घटना घडू नये, यासाठी आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. पेपरच्या सुरक्षेची जबाबदारी भारतीय लष्कराकडे सोपवण्यात आली आहे. मात्र सरकारच्या या निर्णयावर शिक्षण वर्तुळातून समिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल