AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

3 वर्षांपूर्वीही झाला होता भीषण विमान अपघात, अजितदादांच्या प्लेन दुर्घटनेशी काय कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. परंतु बारामतीच्या विमान तळावर टेक ऑफ करताना या विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजितदादांचा मृत्यू झाला.

3 वर्षांपूर्वीही झाला होता भीषण विमान अपघात, अजितदादांच्या प्लेन दुर्घटनेशी काय कनेक्शन? AAIB चा फायनल रिपोर्ट समोर
Ajit Pawar aircraft accidentImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 9:04 PM
Share

28 जानेवारी 2026 रोजी अजित पवार यांचं विमान मुंबईवरून बारामतीला निघालं होतं. परंतु बारामतीच्या धावपट्टीवर पोहोचताच या विमानाचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. खराब दृश्यमानतेमुळे आणि ढगाळ वातावरणामुळे पायलटला अंदाज आला नाही, त्यामुळे विमान धावपट्टीवर उतरताना विमान क्रॅश झालं, असा प्राथमिक अंदाज आहे. या अपघातामुळे संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला होता. ज्या विमानाचा अपघात झाला ते विमान व्हिसीआर कंपनीचं होतं. दरम्यान अजित पवार यांच्या विमान अपघातापूर्वी असाच एक अपघात सप्टेंबर 2023 मध्ये देखील झाला होता. मुंबई विमानतळावर एक विमान लँन्ड होताना कोसळलं होतं. हे चार्टर विमान देखील विसीआर कंपनीचंच होतं. या अपघाताचा फायनल रिपोर्ट आता एअर अ‍ॅक्सीडेंट इन्वेस्टिगेशन ब्यूरो AAIB कडून जारी करण्यात आला आहे.

या रिपोर्टमध्ये मोठा खुलासा झाला आहे, पायलटच्या अनस्टेबलाइज़्ड अप्रोचमुळे हा अपघात झाल्याचं कारण एएआयबीने आपल्या अहवालामध्ये नमूद केलं आहे. हे विमान देखील व्हिसीआर कंपनीचंच होतं. हे विमान रन वे वर कोसळलं. या अपघातामध्ये दोन क्रू मेंबर, आणि सहा प्रवासी गंभीर जखमी झाले होते. फ्लाइंग क्रू कडून एसओपीचं पालन व्यवस्थित करण्यात आलं नाही, म्हणून हा अपघात झाला. दरम्यान या कंपनीच्याच विमानाचा बारामतीमध्ये देखील अपघात झाला होता. या अपघातामध्ये अजित पवार यांचा मृत्यू झाला. विमानात असलेल्या इतरही लोकांचा मृत्यू झाला.

आपल्या अहवालामध्ये एएआयबीने म्हटलं की, 14 सप्टेंबर 2023 मध्ये एक नॉन शेड्यूल पॅसेंजर फ्लाइटने मुंबईला येण्यासाठी विखाखापट्टनमवरून टेक ऑफ केलं होतं. जेव्हा या विमानाने टेक ऑफ केलं तेव्हा कोणतीही समस्या नव्हती. त्यामुळे या विमानाला धावपट्टी क्रमांक 27 वर उतरण्याची परवानगी देण्यात आली. मात्र जेव्हा हे विमान लँड होणार होतं, तेव्हा मुंबईमध्ये अचानक जोरदार पाऊस सुरू झाला. पावसामुळे दृश्यमानता प्रचंड कमी झाली. त्यामुळे हा अपघात घडला. हे विमान लँड होत असताना डाव्या बाजुने झुकलं त्यानंतर त्यावर नियंत्रण मिळवणं पायलटला शक्य झालं नाही, आणि विमान क्रॅश झालं. खराब हवामान असताना पायलटने विमान लँड करण्याचा निर्णय घेतला, सूचना देखील उशिरा मिळाली, असंही एएआयबीने आपल्या अहवालामध्ये म्हटलं आहे.

Follow Us
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले भर...
ठाण्यातील प्रदीप पूर्णकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; म्हणाले, भर चौकात...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर...
मोठी बातमी! प्रदीप पुर्णेकर यांच्यानंतर आता पुतणी खुशबू पुर्णेकर टार्गेटवर? धमकीच्या मेसेजने खळबळ
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून...
दिल्लीतील पोलीस ठाण्याबाहेर तणाव! अभिजीत दिपके यांना भेटण्यापासून वकिलांना रोखलं, बाचाबाची...
अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
Chhagan Bhujbal : अर्थखातं राष्ट्रवादीला मिळेल... छगन भुजबळांचे रोहित पवारांना थेट उत्तर
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट