मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटप होताच महायुतीमध्ये मोठं बंड? एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, वातावरण तापणार

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. मात्र त्यानंतर आता महायुतीमध्ये मोठ्या बंडाची शक्यता आहे.

मोठी बातमी! विधान परिषद निवडणुकीच्या जागा वाटप होताच महायुतीमध्ये मोठं बंड? एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय, वातावरण तापणार
Eknath Shinde
Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Oct 03, 2026 | 4:55 PM

राजकीय वर्तुळातून मोठी बातमी समोर येत आहे. विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीचा फॉर्म्यूला ठरला आहे. पुण्याच्या दोन्ही जागा शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघ भाजपच्या वाट्याला गेले आहेत. मंगेश चिवटे यांचा पत्ता कट झाला आहे. दरम्यान त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांनी मंगेश चिवटे यांना उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या सुचना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान पुणे शिक्षक मतदार संघाची जागा जरी महायुतीमध्ये भाजपच्या वाट्याला आली असली तरी देखील मंगेश चिवटे हे आता मंगळवारी पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  त्यामुळे आता जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरताच महायुतीमध्ये मोठं बड होण्याची शक्यता आहे.

मंगेश चिवटे हे सुरुवातीपासूनच पुणे शिक्षक मतदारसंघातून महायुतीकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक होते. त्यासाठी आवश्यक वातावरण निर्मितीला देखील त्यांनी सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वीच या सर्व पार्श्वभूमीवर त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची देखील भेट घेतली होती. मात्र दुसरीकडे भाजप मंत्र्यांकडून सातत्याने या दोन्ही जागांवर दावा करण्यात येत होता. काही दिवसांपूर्वीच मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील या दोन्ही जागा भाजपच्याच असल्याचं म्हटलं होतं. तर मंत्री जयकुमार गोरे यांनी देखील पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात महायुती म्हणूनच आम्हाला निवडणूक लढायची आहे, परंतु वेळ पडली तर आम्ही भाजप म्हणून देखील या निवडणुकीला सामोरे जाऊ असं त्यांनी म्हटलं होतं.

Loading...

अखेर महायुतीच्या जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे, या फॉर्म्यूल्यानुसार या दोन्ही जागा भाजपाच्या वाट्याला आल्या आहेत. त्यानंतर आता या मतदारसंघात शिवसेना शिंदे गटाने आक्रमक भूमिका घेतल्याचं पहायला मिळत आहे. समोर आलेल्या माहितीनुसार मंगेश चिवटे हे आता पुणे शिक्षक मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना उमेदवारी अर्ज भरण्यास सांगितल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.

 

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us