AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

गुडन्यूज! महिला प्रवाशांना मोठा दिलासा, NCMC कार्ड नसलेल्यांनाही मिळणार एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत

मोठी बातमी समोर येत आहे, महिला आणि वृद्ध व्यक्तींना जर एसटी बसच्या तिकिटात सवलत मिळवायची असेल तर त्यांच्यासाठी आता सरकारने NCMC कार्ड सक्तीचं केलं आहे. मात्र या संदर्भात आता एक मोठी बातमी समोर आली आहे.

गुडन्यूज! महिला प्रवाशांना मोठा दिलासा, NCMC कार्ड नसलेल्यांनाही मिळणार एसटी प्रवास भाड्यात 50 टक्के सवलत
शेलारांकडून महत्त्वाचे निर्देश Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 02, 2026 | 5:24 PM
Share

राज्यातील महिला आणि ज्येष्ठ नागरिकांना एसीट महामंडळाकडून प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सलवत देण्यात येते. विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन महायुती सरकारने महिलांसाठी एसटी प्रवास भाड्यामध्ये 50 टक्के सूट देण्याची घोषणा केली होती. त्यानुसार आता महिला तसेच ज्या वृद्ध व्यक्तींचं वय हे 65 वर्षांपेक्षा जास्त आहे, अशा लोकांना एसटी भाड्यामध्ये 50 टक्के सवलत देण्यात येते. तर दुसरीकडे ज्या व्यक्तींचं वय हे 75 पेक्षा जास्त आहे, अशा व्यक्तींना एसटीचा प्रवास हा मोफत आहे.

दरम्यान त्यानंतर आता सरकारने एसटीचा हा लाभ मिळवण्यासाठी नवा नियम लागू केला आहे. एसटी महामंडळाच्या या योजनेचा लाभ घेण्यासाठी NCMC कार्डची सक्ती करण्यात आली आहे. या कार्डसाठी एक सप्टेंबरपर्यंत मुदत देण्यात आली होती. एक सप्टेंबरनंतर ज्या महिलांकडे एनसीएमसी कार्ड नसेल त्यांना एसटीचं पूर्ण भाडं भरावं लागेल असं एसटी महामंडळाने म्हटलं होतं.  मात्र आता मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे  एसटी महामंडळाने NCMC कार्डची सक्ती तात्पुरती करू नये, असे निर्देश  सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिले आहेत.

प्रवाशांना कार्ड काढण्यासाठी वेळ द्या,  १ ऑक्टोबर किंवा १ नोव्हेंबर २०२६ पर्यंत मुदत वाढवा, गौरी-गणपती उत्सवाच्या काळात भाविक, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांची गैरसोय होऊ नये, म्हणून ज्यांच्याकडे एनसीएमसी कार्ड नाही अशा लोकांना देखील एसटी प्रवास भाड्यामध्ये दिली जाणारी सवलत कायम ठेवा,  असदे निर्देश आशिष शेलार यांनी एसटी महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे  आता ही सवलत सुरूच राहण्याची शक्यात आहे. दरम्यान शासन निर्णयानुसार ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना एसटी बसमधून प्रवास करताना NCMC कार्डची सक्ती  आहे, परंतु आता आशिष शेलार यांनी दिलेल्या नव्या निर्देशामुळे वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.  शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहेत, त्यांचा मराठी भाषा सक्तीचा एक निर्णय आधीच मुख्यमंत्र्यांनी फिरवला आहे. त्यानंतर आता या दुसऱ्या निर्णयासंदर्भात देखील निर्देश देण्यात आले आहेत.

Follow Us
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष,
ठाकरे गटाला पुन्हा मोठा धक्का! एकच कारण अन् बड्या नेत्यानं सोडला पक्ष, उपमुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची...
प्रभादेवीच्या भवानीमाता मंदिरात नवरात्रोत्सवाचा उत्साह; 58 वर्षांची परंपरा आजही कायम!
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध...
गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा, मध्यवर्ती बँकेचा निवडणूक अर्ज वैध, न्यायालयाचा मोठा निर्णय
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
अभिजीत दीपकेंना नोटीस; दिल्लीतील करोल बाग परिसरात आर्ध्या तासापासून...
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत..
मोठी खळबळ! अभिजीत दीपके थांबलेल्या ठिकाणी दिल्ली पोलीस दाखल; दिल्लीत तातडीने...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे...
महायुतीत मिठाचा खडा कुणामुळे? संजय शिरसाटांनी थेट बड्या नेत्याकडे इशारा, नेमकं कारण काय?
दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन्
TV9 Festival of India 2026 : दिल्लीत TV9 फेस्टिव्हल ऑफ इंडियाचा भव्य शुभारंभ; दुर्गापूजा, संगीत अन् भारतीय संस्कृतीचा अनोखा संगम
टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात...
Tesla Car Video: टेस्लाचा आविष्कार! हवेत झेप घेणाऱ्या कारची पहिली झलक समोर, जगभरात होतेय चर्चा
शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या....
Sunil Tatkare : शेतकऱ्यांना 5 हजारांची मदत तुटपुंजी; सुनील तटकरे नाराज, सरकारच्या निर्णयावर काय म्हणाले?
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं
मोठी बातमी! सेंट्रल पार्कमध्ये सीजेपीचे 11 जणांनाच... दिल्लीत नेमकं काय घडतंय?