AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, शिवराज मोटेगावकर, मनिषा मांढरे यांच्या अडचणी वाढल्या, सीबीआयचा मोठा निर्णय

वैद्यकीय शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची असलेल्या नीट परीक्षेचे पेपर फुटल्याचं प्रकरण समोर आलं होतं. त्यामुळे संपूर्ण देशभरात मोठा गोंधळ उडाला. नीट परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला आता या प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात मोठी अपडेट, शिवराज मोटेगावकर, मनिषा मांढरे यांच्या अडचणी वाढल्या, सीबीआयचा मोठा निर्णय
नीट पेपेरफुटी प्रकरणात मोठी अपडेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 21, 2026 | 5:33 PM
Share

नीट परीक्षा ही वैद्यकीय शिक्षणासाठी अतिशय महत्त्वाची परीक्षा आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून या परीक्षेवरून देशभरात मोठा गोंधळ सुरू आहे. नीट परीक्षेचे पेपर लीक झाल्याचं समोर आल्यानंतर देशभरात मोठी खळबळ उडाली होती, त्यानंतर सरकारने ही परीक्षाच रद्द केली, तसेच या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला, दरम्यान या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत अनेकांना अटक केली आहे. सीबीआयने ज्यांना अटक केलं, त्यामध्ये शिवराज मोटेगावकर आणि मनिषा मांढरे यांचा देखील समावेश आहे. दरम्यान आता या प्रकरणात एक मोठी बातमी समोर येत आहे, ती म्हणजे शिवराज मोटेगावकर आणि मनिषा मांढरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. सीबीआयने मोठा निर्णय घेतला आहे.

नीट पेपरफुटी प्रकरणात आता शिवराज मोटेगावकर आणि मनिषा मांढरे यांच्या स्वाक्षरीचे नमुने घेतले जाणार आहेत. स्वाक्षरीचे नमुने मिळवण्यासाठी सीबीआयने न्यायालयाकडे परवानगी मागितली आहे.  फॉरेन्सिक विभागाकडून दोघांच्या स्वाक्षरीचे नमुने तपासले जाणार आहेत.  एनटीएच्या किंवा इतर महत्वाच्या कागदपत्रांवर तसेच बँक व्यवहार करत असताना कुठली स्वाक्षरी केली? याचा सुद्धा तपास यावेळी करण्यात येणार आहे. नीट पेपरफुटी प्रकरणात दोन्ही आरोपी सध्या सीबीआयच्या कोठडीत आहेत.

लातूरमधील ‘रेणुकाई करिअर सेंटर’चा संचालक शिवराज मोटेगावकर याला नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआयकडून 17 मे रोजी चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. त्याला पुण्यातून ताब्यात घेण्यात आलं. त्याच्या चौकशीमधून धक्कादायक माहिती समोर आली होती. मोटेगावकरांनी परीक्षेच्या दहा दिवसांआधीच प्रश्नपत्रिका मिळवली होती. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मोटेगावकरला मेडिकल कॉलेजची स्थापना करायची होती, मात्र तो स्वत: डॉक्टर नसल्यामुळे मेडिकल कॉलेजची स्थापना करणं शक्य नव्हतं. म्हणून त्याने युक्ती लढवली, त्याने आपल्या मुलाला डॉक्टर करण्याचा निर्णय घेतला, आणि आपल्या मुलासाठीच मोटेगावकर याने नीटचा पेपर फोडल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान मोटेगावकरच्या मेडिकल कॉलेजचं 50 टक्के काम पूर्ण देखील झाल्याची माहिती समोर येत आहे. मात्र आता त्याच्या अडचणी चांगल्याच वाढल्या आहेत.

Follow Us
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा;
CJP नेते पुन्हा रस्त्यावर उतरणार! अभिजीत दीपकेंचा मोठा इशारा; म्हणाले, बॉन्डवर स्वाक्षरी...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट...
शिवाजी पार्कला वॉर झोन बनवलंय का? अमित ठाकरे पोलिसांवर संतापले, थेट दिलं आव्हान!
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल;
CJP नेत्यांना जामीन मिळताच आशुतोष रांकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल; म्हणाले, 'भारतासाठी...
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
एक स्वाक्षरी लोकशाहीसाठी; संदीप देशपांडेंची मोहीम, सरकारला थेट आव्हान!
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार
CJP प्रवक्ते आशुतोष रांका यांचं जामिनानंतर पहिलंच ट्वीट; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर ठाम
अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं
मोठी बातमी! अवमान प्रकरणी दिल्ली पोलिसांना सुप्रीम कोर्टाची नोटीस, सुनावणीत नेमकं काय घेडलं?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी...
मोठी बातमी! महाराष्ट्रातील कृषी संकटावर फडणवीसांची केंद्राकडे मोठी मागणी, शेतकऱ्यांना मिळणार दिलासा?
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी;
जामिनावर सुटका होताच अभिजीत दीपके थेट सिब्बल यांच्या निवासस्थानी; बैठकीत घेतला मोठा निर्णय
15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट...
Dhruv Rathee | 15-20 अज्ञातांनी माझं अपहरण केलं होतं, युट्यूबर ध्रुव राठीचा ट्विट करत आरोप
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात...
भाजपचे 4 प्रमुख नेते वेगळा निर्णय घेण्याच्या तयारीत; सहा महिन्यात... बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ