
महाराष्ट्रात संभाजीनगर येथे असलेली औरंगजेबाची कबर हटवण्याच्या मागणीने जोर पकडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह काँग्रेस, शिवसेना, मनसे सर्वांनीच एकसूरात या मागणीच समर्थन केलय. औरंगजेबाची कबर हटवण्याची आमची सुद्धा इच्छा आहे, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. पण संरक्षित स्थळ आहे. काँग्रेस सरकारच्या राजवटीत या जागेला भारतीय पुरातत्व सर्वेक्षण (ASI) विभागाकडून संरक्षण मिळालं होतं. काँग्रेसने यावर प्रत्युत्तर देताना भाजपवर निशाणा साधलाय. “देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री आहेत. प्रत्येकवेळी काँग्रेसवर आरोप लावणं योग्य नाही. विद्यमान परिस्थिती पाहून सरकारने स्वत: निर्णय घेतला पाहिजे” असं काँग्रेस नेते नाना पटोले म्हणाले.
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार म्हणाले की, “मी अफजलच्या कबरी जवळच अतिक्रमण हटवलं होतं. माझा या विषयावर वेगळा विचार असू शकत नाही. महाविकास आघाडी सरकारला कबर कायम ठेवायची होती. पण आमचं सरकार ही कबर हटवण्याच्या बाजूने आहे. “औरंगजेबासारख्या आक्रमकाच उदात्तीकरण होऊ नये. रावणानंतर तो मोठा दुष्ट माणूस होता” असं सुधीर मुनगंटीवार म्हणाले. शिवसेना नेते शंभूराज देसाई म्हणाले की, “आमचं सरकार सुद्धा कबर हटवण्याच्या बाजूने आहे. या मुद्यावर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री केंद्र सरकारशी चिंता करतील”
‘काही चुकीच वाटण्यासारखं नाहीय’
शिवेंद्रराजे भोसले यांनी या मुद्दावर स्पष्ट केलं की, “औरंगजेबाची कबर महाराष्ट्रात असू नये. यात कोणाला काही चुकीच वाटण्यासारखं नाहीय” महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते बाळा नांदगावकर यांनी सुद्धा या मुद्यावर कठोर भूमिका घेतलीय. “छत्रपती शिवाजी महाराजांना त्रास देणाऱ्या आणि संभाजी महाराजांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीची महाराष्ट्रात काही आवश्यकता नाही. लवकरात लवकर ही कबर हटवली पाहिजे”