AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती की नाही? अभिनेता सयाजी शिंदे यांच्या दाव्याने खळबळ; पटेल आणि तटकरे यांना मोठा धक्का?

दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती की नाही, याबाबत अभिनेता सयाजी शिंदे यांनी मोठा दावा केला आहे. या दाव्यामुळे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची चर्चा झाली होती की नाही? अभिनेता सयाजी शिंदे यांच्या दाव्याने खळबळ; पटेल आणि तटकरे यांना मोठा धक्का?
सयाजी शिंदे, अजित पवार, शरद पवारImage Credit source: Tv9
| Updated on: Feb 08, 2026 | 2:19 PM
Share

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघातातील मृत्यूनंतर राज्यातील राजकारणात अनेक घडामोडी घडत आहेत. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर दुसरीकडे दोन्ही राष्ट्रवादी पक्षांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनाही जोर धरला आहे. अशातच अभिनेते सयाजी शिंदे यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणं हे बोलणं आमच्यासमोर झालं होतं, दोन्ही NCP नं एकत्र यावं हे अजितदादांचं स्वप्न होतं, असं सयाजी शिंदे म्हणाले. दादांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, अशी इच्छा सयाजी शिंदेंनी बोलून दाखवली आहे. राज्याची ताकद वाढवण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादींनी एकत्र यावं, असंही म्हणाले आहेत.

“सर्वधर्मसमभाव ठेवून, गरीब-श्रीमंत न बघता, खालून आल्यामुळे त्यांनी सर्व इतकं पुढे नेण्याचं ठरवलं होतं. मला असं वाटतं की, त्यांची स्वप्नं ही आपण सर्वांनी आणि खासकरून सुनेत्रा वहिनींनी, सुप्रियाताईंनी पूर्ण करावीत. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावं, हे दादांचं पहिलं स्वप्न होतं. हे त्यांचं अपुरं राहिलेलं स्वप्न पूर्ण व्हावं, तरच महाराष्ट्राला खरी ताकद मिळेल. महाराष्ट्राची ताकद वाढवायची असेल तर दोन्ही पवार कुटुंबीय ताबडतोब एकत्र यायला पाहिजेत”, असं मत सयाजी शिंदे यांनी मांडलं आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती, असा दावा त्यांनी यावेळी केला. याविषयी ते पुढे म्हणाले, “कौटुंबिक भावना बाजूला सारून त्यांनी याबाबत निर्णय घ्यावा. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आमच्यासमोर चर्चा झाली होती. पण अचानक हे सर्व घडलं. कोणीकाही या गोष्टीला वेगळा मार्ग न लावता, त्याआधी दोन्ही पवार कुटुंब एकत्र आले, तर महाराष्ट्र पुढे जाईल.” सयाजी शिंदेंनी नुकतीच सुनेत्रा पवार यांची भेट घेतली.

“अजित पवार यांच्या जाण्याने महाराष्ट्र नि:शब्द झाला आहे. काहीतरी सुचायलाही खूप वेळ जातोय, काय बोलावं हेच सुचत नाहीये. आज मी सुनेत्रा पवारांची भेट घेतली. काय बोलावं हेच कळत नव्हतं. त्यानंतर मोठ्या साहेबांचीही भेट घेतली. मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भल्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्यात. निवडणुकीच्या वेळी, प्रचाराच्या वेळी अशी चर्चा झाली होती की आता एकत्रच येणार आहोत. फक्त औपचारिकता राहिली होती. असं असताना असं अचानक काहीतरी व्हावं, हे महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत वाईट झालं आहे”, अशा शब्दांत ते व्यक्त झाले.

Follow Us
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन.
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का
राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का.
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल.
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी
ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची संधी.
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय
भाजपचं कॅरेक्टर, चरित्र, ढोंग काय आहे हे त्या प्रकरणात दिसतंय.
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र
संसदेत शाब्दिक चकमक; संजय राऊतांचे भाजपवर तीव्र शब्दांत टीकास्त्र.
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार
नाशिक धर्मांतर प्रकरणातील 7 जण अटकेत,मुख्य सूत्रधार निदा खान कुठे फरार.
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल
नारी शक्ती विधेयकावर लोकसभेत घमासान; अरविंद सावंतांचा सरकारला सवाल.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला.
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?.