AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vinod Kambli Health Update : विनोद कांबळीची प्रकृती आता कशी? पत्नीने जे सांगितलं ते ऐकून..

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळीच्या प्रकृतीबद्दल चिंताजनक बातम्या पसरल्या होत्या, ज्यात ब्रेन स्ट्रोकचा धोका नमूद होता. मात्र, त्यांची पत्नी अँड्रिया हेविटने स्पष्ट केले आहे की, विनोदची तब्येत उत्तम असून तो ठणठणीत आहे. या अफवांना पूर्णविराम देत पत्नीच्या अधिकृत अपडेटमुळे चाहत्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनी मदत गोळा केली असली तरी, विनोदची प्रकृती आता स्थिर आहे.

Vinod Kambli Health Update : विनोद कांबळीची प्रकृती आता कशी? पत्नीने जे सांगितलं ते ऐकून..
माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी
| Updated on: Apr 17, 2026 | 2:43 PM
Share

Vinod Kambli : भारताचा माजी डावखुरा फलंदाज विनोद कांबळी पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. विनोद कांबळीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतंय. विनोदला ब्रेनस्ट्रोकचा धोका असल्याचंही सांगितलं जात आहे. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. गेल्या तीन दिवसापासून विनोद रुग्णालयात उपचार घेत आहेत. त्याचे मित्र त्याची काळजी घेत आहे. आता त्याची पत्नी अँड्रिया हेविटने त्याच्या प्रकृतीबाबतची महत्त्वाची अपडेट दिली असून त्यामुळे त्याच्या चाहत्याचा जीव भांड्यात पडला आहे.

विनोद कांबळीला पुन्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्याची बातमी पसरल्यानंतर सचिन तेंडुलकरसह विनोदच्या जवळच्या मित्रांनी त्याच्या मदतीसाठी हात पुढे केला आहे. अनेकांनी त्याच्यासाठी फंडिंग जमा केल्याचं वृत्त आहे. विनोदचा अत्यंत जवळचा मित्र मार्कस काउटो याने विनोदच्या मदतीचं सर्वात पहिलं आवाहन केलं. त्यानेच विनोदचे सर्व जुने मित्र आणि विनोदच्या चाहत्यांना एकत्र आणलं. मात्र, विनोद कांबळीची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याच्या बातम्या येऊ लागल्या. त्यामुळे सर्वांनाच चिंता लागून राहिली. या सर्व बातम्यांच्या पार्श्वभूमीवर विनोदची पत्नी अँड्रिया हेविटने स्वत: समोर येऊन विनोदच्या प्रकृतीची अपडेट दिली आहे.

विनोदची तब्येत कशी?

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, अँड्रियाने दिलासा देणारी माहिती दिली आहे. देवाच्या कृपेने विनोद ठणठणीत आहे. विनोदच्या प्रकृतीबाबत लोक चुकीच्या बातम्या का देतात? कोण अशा बातम्या पसरवतं? हे मला कळत नाही, असं अँड्रियाने म्हटलं आहे. अँड्रियाने स्वत: हेल्थ अपडेट दिल्याने आता विनोदच्या प्रकृतीबाबत उडणाऱ्या अफवांना पूर्णविराम मिळाला आहे.

या आधी आलेल्या एका वृत्तानुसार मार्कस काउटोने एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केला आहे. कांबळी अडचणीत असल्याने त्याला आर्थिक मदत व्हावी म्हणून मार्कस प्रयत्न करत असल्याचंही सांगितलं जात होतं.

मार्कसने दिली बातमी

मार्कसनेच विनोदला आर्थिक मदत व्हावी म्हणून एक व्हॉट्सअप ग्रुप तयार केल्याचं सांगितलं होतं. विनोदच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाल्याचा दावाही त्याने केला होता. गेल्या सहा महिन्यापासून विनोदला हा त्रास असून तो कमी झाला नाही, असंही त्याने म्हटलं होतं.

मार्कसने हिंदुस्तान टाइम्सशी संवाद साधला होता. त्यावेळी त्याने ही माहिती दिली होती. आम्ही विनोदच्या सर्व मित्रांनी एक व्हाट्सअप ग्रुप तयार केला आहे. आम्ही नाव न घेता विनोदला आर्थिक मदत करत आहोत. गेल्या सहा महिन्यापासून विनोदच्या स्मरणशक्तीवर परिणाम झाला आहे. त्याला काहीच आठवत नाहीये. पण त्याला अचानक क्लिक झाल्यावर सर्व आठवतं. नाही तर त्याच्यासाठी आठवणं कठिण होऊन जातं, असं मार्कसने म्हटलं होतं.

पुढची स्टेप ब्रेन स्ट्रोकची होऊ शकते, असं डॉक्टरांचं म्हणणं आहे. विनोदने दारू पिणं बंद केलं आहे. पण कधी कधी बिल्डिंगच्या खाली गेल्यावर जवळून येणाऱ्या जाण्याऱ्यांकडे तो सिगारेट मागतो, असंही त्यांनी म्हटलं होतं.

Follow Us
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
Sunetra Pawar | तुमचा वाढदिवस आता जयंती म्हणून साजरा करताना मन तुटतंय... दिवंगत अजित पवार यांच्या जयंतीनिमित्त सुनेत्रा पवार यांची भावनिक पोस्ट
मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
Mumbai Rain Update | मुंबईत पावसाची दमदार एंट्री; पुढील काही तास मुसळधार पावसाचा इशारा
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?.

सर्वात मोठी बातमी ! शरद पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटले; काय झाली चर्चा?

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया.

Sharad Pawar Meet PM Modi : शरद पवार दिल्लीत पंतप्रधान मोदींना का भेटले? राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची पहिली प्रतिक्रिया

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा...

धर्मेंद्र प्रधान यांच्यात असे काय? ज्यामुळे मोदी सरकार घेत नाही राजीनामा, ही मुख्य 5 कारणे वाचा..

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा.

Farmer Loan Waiver: शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता! कर्जमाफीची पहिली यादी आजच धडकणार, किती वाजता जाहीर करणार? मंत्री बाबासाहेब पाटील यांची मोठी घोषणा

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार.

आमच्याकडे व्हिडीओ पाहायला वेळ नाही, सुप्रीम कोर्टाचा पोलीस कारवाईच्या विरोधात तात्काळ सुनावणीला नकार

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय.

Katrina Kaif : ‘आवाज का उठवला नाही?’ CJP वादावरून कतरिनाचं मौन, नाराज चाहत्यांनी घेतला मोठा निर्णय