Mumbai | राज ठाकरे महापालिका आयुक्तांच्या भेटीसाठी मुंबई महानगरपालिकेत दाखल
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे तसेच मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेत नव्याने नियुक्त झालेल्या आयुक्त अश्विनी भिडे यांची सदिच्छा भेट घेतली. नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा देण्यासाठी ही भेट असल्याचं सांगितलं जात आहे. या भेटीदरम्यान मनसे नेते संदीप देशपांडे तसेच मुंबई महानगरपालिकेतील मनसेचे नगरसेवकही उपस्थित होते. ही भेट औपचारिक स्वरूपाची असली तरी, मुंबईतील विविध प्रलंबित प्रश्नांवर चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेषतः शहरातील सुरू असलेली विकासकामे, वाढतं प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि महापालिका हद्दीतील नागरी समस्यांवर या भेटीत चर्चा होण्याची शक्यता आहे. मुंबईतील नागरिकांना भेडसावणाऱ्या मूलभूत समस्यांवर तोडगा काढण्याच्या दृष्टीने ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे. राज ठाकरे यांनी यापूर्वीही मुंबईतील पायाभूत सुविधा, रस्त्यांची अवस्था, वाहतूक व्यवस्था आणि प्रदूषणाच्या मुद्द्यांवर सातत्याने भूमिका मांडली आहे. त्यामुळे या भेटीतून मुंबईच्या विकासासंदर्भात काही ठोस निर्णय किंवा पुढील दिशानिर्देश मिळतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Published on: Apr 17, 2026 01:05 PM
परप्रांतीय मारहाण प्रकरणाला नवं वळण; जुपिटर रुग्णालयाबाहेर मोठ्या...
मी टीममधला 12 वा खेळाडू, पुन्हा बाद झालेल्यांना...धनंजय मुंडेंच्या
राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ, शरद पवारांचे 3 आमदार थेट भााजप
दादा जसे कटू निर्णय घ्यायचे तसे...सुनेत्रा पवार यांनी दम भरला, थेट...

