Rahuri By Poll Election | राहुरी पोटनिवडणुकीच्या मतदानापूर्वीच राष्ट्रवादीला मोठा धक्का; बडा नेता थेट भाजपात प्रवेश करणार
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. 20 तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तनपुरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून, त्यानंतर पुढील राजकीय निर्णय जाहीर केला जाणार आहे.
राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना सध्या वेग आला आहे. 20 तारखेला ते आपली भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी तनपुरे कार्यकर्त्यांचा मेळावा घेणार असून, त्यानंतर पुढील राजकीय निर्णय जाहीर केला जाणार आहे. राहुरी पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इच्छुक असताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि नेते राधाकृष्ण विखेपाटील यांनी त्यांची भेट घेतली होती. या भेटीनंतर तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज न भरण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान, “माझी भूमिका हीच कार्यकर्त्यांची भूमिका असेल,” असं स्पष्ट करत त्यांनी पुढील निर्णय विचारपूर्वक घेणार असल्याचं सांगितलं. त्यामुळे 20 तारखेला तनपुरे नेमकी कोणती भूमिका घेतात, याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, तनपुरे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तर, शरद पवार गटाला हा सर्वात मोठा धक्का असेल. प्राजक्त तनपुरे यांच्या या भूमिकेवर शरद पवार यांची नेमकी प्रतिक्रिया काय येते, हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं ठरणार आहे.
Published on: Apr 17, 2026 01:42 PM
आम्ही चिमटे नाही काढत थेट हल्ला करतो... भर मंचावर संजय राऊतांची सत्ताध
ये डर अच्छा है! ऑपरेशन टायगरच्या चर्चेत वाघमारेंचा ठाकरे गटाला इशारा
पाणी डोक्यावरून गेलंय... ठाकरे गटाची तातडीने बैठक अन् अंबादास दानवेंचं
प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप

