Ashok Kharat Case | खरातच्या शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळकेंचं अपघाती निधन
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला.
समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचा मृत्यू झाला आहे. या अपघाताने एकच खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, छत्रपती संभाजीनगरहून शिर्डीकडे जात असताना धोत्रे गावाजवळ हा अपघात घडला. उभ्या कंटेनरला कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने कार थेट कंटेनरखाली घुसली. अपघात इतका भीषण होता की कारचा पूर्णपणे चक्काचूर झाला. या दुर्घटनेत जितेंद्र शेळके यांचा जागीच मृत्यू झाला असून, त्यांची पत्नी आणि मुलगा गंभीर जखमी झाले आहेत. जखमी मुलाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पत्नी कारमध्ये अडकलेल्या अवस्थेत असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, शेळके हे भोंदू अशोक खरात यांचे निकटवर्तीय असल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेमुळे परिसरात भीती आणि तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे.
प्रशांत किशोर राष्ट्रवादीसोबत काम करणार की नाहीत? पार्थ पवारांनी...
स्वत:चं मेडिकल कॉलेज, लेकाच्या नावापुढे डॉक्टर, मोटेगावकरचं स्वप्न...
पंतप्रधान मोदींच्या आखाती दौऱ्यावरून पडळकरांचा मोठा दावा...
युद्धामुळे नितीन गडकरींच्या व्यवसायाला फटका, निर्यात रखडली; स्थानिक...

