Uddhav Thackeray | उद्धव ठाकरेंनी नकार दिला तर या महिला नेत्याला विधान परिषदेत जाण्याची मिळू शकते संधी सरकारला घाम फुटणार?
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसत असून, या निवडणुकीत महायुतीकडून मोठा राजकीय डाव टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.
विधान परिषद निवडणुकीचे बिगुल वाजले असून, 9 जागांसाठी 12 मे रोजी मतदान होणार आहे. राज्याच्या राजकारणात या निवडणुकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. विधानसभेतील संख्याबळाचा विचार करता महायुतीचं स्पष्ट वर्चस्व दिसत असून, या निवडणुकीत महायुतीकडून मोठा राजकीय डाव टाकला जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे. महाविकास आघाडीच्या पारड्यातील काही जागा खेचून आणण्याचाही प्रयत्न होऊ शकतो.
दरम्यान, उद्धव ठाकरे मैदानात उतरल्यास ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, त्यांनी निवडणूक न लढवण्याची भूमिका घेतल्यास महायुतीकडून अतिरिक्त उमेदवार देण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून ठाकरे यांना पाठिंबा दर्शवण्यात आला आहे, तर काँग्रेसच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ठाकरे गटाकडून अंबादास दानवे, सुषमा अंधारे आणि विनायक राऊत यांच्या नावांची चर्चा सुरू आहे.
जर निवडणूक चुरशीची झाली, तर महाविकास आघाडीतील मतविभाजनाचा फायदा महायुतीला होऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात या निवडणुकीत मोठे राजकीय समीकरण बदलण्याची शक्यता आहे.
tv9 मराठीच्या बातमीचा इम्पँक्ट, अन्न व औषध प्रशासनाचं कार्यालय उघडलं
तटकरेंवर खरातचा दाबाव होता की... राष्ट्रवादीतील नेत्याचा मोठा दावा...
तटकरे-शरद पवार भेटीवरून बिनसलं, रोहित पवार आजोबांवर नाराज? बैठकीतच...
वांद्रे पूर्वेत रेल्वेची धडक कारवाई सुरूच; दुसऱ्या दिवशीही झोपड्यांवर

