AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच...

आता प्रणित मोरे प्रकरण थेट संसदेत? शिंदेंच्या महिला खासदाराचा प्रचंड संताप; लवकरच…

| Updated on: Jun 13, 2026 | 6:23 PM
Share

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या कॉमेडियन प्रणित मोरे वादावर खासदार ज्योती वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांचा निषेध करत या विषयावर आगामी अधिवेशनात प्रस्ताव मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

राज्यात सध्या चर्चेत असलेल्या कॉमेडियन प्रणित मोरे वादावर खासदार ज्योती वाघमारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी अशा प्रकारच्या वक्तव्यांचा निषेध करत या विषयावर आगामी अधिवेशनात प्रस्ताव मांडणार असल्याचे स्पष्ट केले.

माध्यमांशी संवाद साधताना ज्योती वाघमारे म्हणाल्या की, “हे सर्व प्रकार समाजातील मर्यादा ओलांडणारे आहेत. यापूर्वीही काही व्यक्तींनी आपल्या आई-वडिलांबाबत आक्षेपार्ह वक्तव्ये केली होती. अशा घटनांमुळे समाजात चुकीचा संदेश जात आहे.”

त्या पुढे म्हणाल्या की, “घाणेरडी आणि गलिच्छ वक्तव्ये करायची आणि त्यानंतर माफी मागायची, अशी एक पद्धत काही लोकांनी सुरू केली आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम आणि शो आयोजित केले जात असून, त्याला वेळीच आळा घालण्याची गरज आहे.”

या प्रकरणात महिलांचाही उल्लेख होत असल्याने हा विषय अधिक गंभीर असल्याचे वाघमारे यांनी नमूद केले. अशा प्रकारच्या आक्षेपार्ह आणि समाजविघातक वक्तव्यांविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, प्रणित मोरे वादावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा रंगली असून, आगामी अधिवेशनात या विषयावर काय भूमिका घेतली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Published on: Jun 13, 2026 06:22 PM

Follow Us