AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; 5 नगरसेवकांसह 200 पदाधिकारी फोडले

भाजपने एकनाथ शिंदेंना मोठा धक्का दिला आहे. भाजपने शिंदेंचे 5 नगरसेवकांसह 200 पदाधिकारी फोडले आहेत. या राजकीय फोडाफोडीमुळे चर्चांना उधाण आलं आहे.

भाजपचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; 5 नगरसेवकांसह 200 पदाधिकारी फोडले
eknath shinde newsImage Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 17, 2026 | 2:40 PM
Share

राज्यात बँक आणि विधानपरिषदेच्या निवडणुकीमुळे राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या निवडणुकीमुळे महायुतीतच संघर्ष सुरू झाल्याचे दिसत आहे. पुण्यात शिंदे गटाने शिक्षक मतदारसंघात भाजपचा उमेदवार असतानाही उमेदवार सचिन सानप यांना पाठिंबा दर्शवला. सानप यांना पाठिंबा देत शिंदेंनी भाजपविरुद्ध बंड पुकारल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यानंतर  भाजपने सोलापुरात शिंदे गटाला मोठा धक्का दिला आहे. भाजपने शिंदेंच्या पाच नगरसेवकांसह 200 पदाधिकारी फोडले आहेत. ही राजकीय फोडाफोडी करत भाजपने सोलापुरात शिंदे गटाचं टेन्शन वाढवलं आहे.

भाजपने 200 पदाधिकारी फोडले 

सोलापूरच्या मंगळवेढ्यात भाजपने शिवसेना शिंदे गटाला दे धक्का दिला आहे. मंगळवेढा नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सुनंदा आवताडे यांच्यासह 5 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. त्याचबरोबर खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर आवताडे, डीसीसीचे माजी उपाध्यक्ष बबनराव आवताडे यांच्याशी 200 पदाधिकारी देखील प्रवेश करणार आहेत. याआधी मंगळवेढा नगरपरिषदेतील आवताडे गट शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्याच्या चर्चा होत्या. मंगळवेढा शहरासह ग्रामीणचे 10 सरपंच, 40 ग्रामपंचायत सदस्य, बाजार समिती सभापतीसह 17 संचालक, खरेदी विक्री संघाचे 15 सदस्य, 70 सोसायटी सदस्य प्रवेश करणार आहेत. नगरपरिषदेला बबनराव आवताडे गटाने तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवली होती. मात्र आता ऐन डीसीसी बँक आणि विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर भाजपमधील प्रवेशामुळे शिवसेना शिंदे गटाला मोठा धक्का मानला जातोय.

तीर्थक्षेत्र विकास आघाडीलाही बसला धक्का 

तत्पूर्वी, आवताडे दहा महिन्यांपूर्वी भगीरथ भालके यांच्यासोबत युती केली होती. त्यांनी भाजपच्या विरोधात मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक लढवली होती. आता आवताडे गटाने भाजपसोबत जाण्याचा घेतलाय. त्यामुळे मंगळवेढ्यातील तीर्थक्षेत्र विकास आघाडीला देखील मोठा धक्का बसल्याचे बोलले जात आहे. खरंतर अवताडे आणि भालकेंच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीने नगराध्यक्षांसह 9 जागा जिंकल्या होत्या. परंतु सत्ता स्थापन केल्यावर काही महिन्यातच स्वीकृत नगरसेवक व पक्षनेता निवडीवरून फूट पडली होती.  दोन्ही गटाने जिल्हाधिकाऱ्यांकडे स्वतंत्र्यपणे पत्रव्यवहार केला होता.  पुढे तीर्थक्षेत्र विकास आघाडीचे भगीरथ भालके, नगाध्यक्ष डॉ. प्रणिता भालके यांच्यासह काही समर्थकांनी शिंदे गटासोबत जाण्याचा निर्णय घेतला. या सर्व नेत्यांनी एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत पंढरपुरात सेनेत प्रवेश केला होता.

Follow Us
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय..
सतीश चव्हाणांच्या प्रचारासाठी सुनेत्रा पवार मैदानात; बीडमध्ये राजकीय हालचालींना वेग
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी,
मोठी बातमी! युट्युबर ध्रुव राठींच्या अडचणी वाढल्या; थेट वॉरंट जारी, आता...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोरा...
जामीनाच्या अटींचं उल्लंघन भोवलं! अभिजीत दिपके अटकेत, तर नेहा बोराची 12 तसांसनंतर सुटका
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण..
एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत मोठे फेरबदल होणार? मंत्र्यांना डच्चू, तरुण आमदारांना संधी
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात..
प्रदीप पुरणेकर प्रकरणात संजय राऊतांचा मोठा इशारा; दसऱ्यानंतर ठाण्यात जाऊन उघड करणार नवी माहिती!
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
राजकीय घडामोडींना वेग! लातूर जिल्हा बँक निवडणुकीमध्ये महायुतीत फूट
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील...
अमृता फडणवीसांनी गायलं गाणं, प्रवीण दरेकरांनी धरला ठेका; बोरिवलीतील गरबा उत्सवात रंगत!
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका...
डॉनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय, रशियन तेलाबाबत अमेरिकेची भूमिका बदलली? आता भारतात...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल...
प्रतापगडावर 367 मशालींचा झगमगाट! शिवरायांच्या शौर्याचा जागर, मशाल महोत्सवाने किल्ला उजळला
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल
मोठी बातमी! भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी अपोलो रुग्णालयात दाखल