AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपकडून नव्या पॉवरफुल टीमची घोषणा, कोणाला डच्चू? कोणाला संधी? पाहा संपूर्ण यादी

भारतीय जनता पार्टीच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली असून नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून तर केशव उपाध्ये यांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती झाली आहे. रवींद्र चव्हाण यांनी जाहीर केलेल्या या यादीत सुजय विखे पाटील आणि चित्रा वाघ यांचाही समावेश आहे.

भाजपकडून नव्या पॉवरफुल टीमची घोषणा, कोणाला डच्चू? कोणाला संधी? पाहा संपूर्ण यादी
bjp mumbai
| Updated on: Feb 24, 2026 | 9:46 AM
Share

राज्यातील लोकसभा, विधानसभा, महापालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समितींच्या निवडणुका पार पडल्यानतंर आता भाजपने मोठे फेरबदल केले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी आज भाजपच्या नवीन प्रदेश कार्यकारिणीची आज अधिकृत घोषणा केली. या नवीन निवडींमध्ये अनेक जुन्या चेहऱ्यांना बढती देण्यात आली आहे. तर काही नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे आतापर्यंत मुख्य प्रवक्ते म्हणून जबाबदारी सांभाळणारे केशव उपाध्ये यांची आता प्रदेश उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी नवनाथ बन यांची मुख्य प्रवक्ता म्हणून वर्णी लागली आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेऊन नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. ही कार्यकारिणी निवडणुकीनंतर जाहीर करण्याचे आधीच ठरले होते. पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता सक्षम असून, ज्यांना या यादीत स्थान मिळालेले नाही. त्यांना आगामी काळात संघटनेच्या इतर कामात सामावून घेतले जाईल, अशी माहिती रवींद्र चव्हाण यांनी दिली.

12 जणांची उपाध्यक्षपदी निवड

भाजपने एकूण १२ जणांची उपाध्यक्ष म्हणून नियुक्ती केली आहे. यात प्रामुख्याने माजी खासदार आणि आमदारांचा समावेश आहे. यात अतुल काळसेकर, डॉ. भारती पवार, संजय कौडगे, संजय भेंडे, रामदास तडस, केशव उपाध्ये, प्रवीण पोटे, गोपीचंद पडळकर, चैतन्यबापू देशमुख, प्रिया शिंदे, सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर या १२ जणांच्या नावावर उपाध्यक्ष म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.

6 सरचिटणीसांची घोषणा

तर दुसरीकडे संघटनात्मक कामात महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी ६ सरचिटणीसांची घोषणा करण्यात आली आहे. यासाठी आमदार निरंजन डावखरे, संजय कुटे, माधवी नाईक, राजेश पांडे, सुनील राणे आणि योगेश सागर यांची सरचिटणीस म्हणून वर्णी लागली आहे. तर मंगेश चव्हाण, संजय कुटे, परिणय फुके, वर्षा डहाळे, संजय जगताप, अर्चना डेहणकर, रोहिणी नायडू, राम सातपुते, प्रवीण घुगे, रेखा कुलकर्णी आणि भैरवी घाक यांसारख्या युवा आणि आक्रमक चेहऱ्यांना चिटणीस पदावर संधी देण्यात आली आहे.

विविध आघाड्यांचे प्रमुख

युवा मोर्चा: कोल्हापूरचे कृष्णराज महाडिक यांची युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाली आहे.

महिला मोर्चा: आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांच्याकडे महिला मोर्चाची धुरा कायम ठेवण्यात आली आहे.

ओबीसी मोर्चा: योगेश टिळेकर यांची ओबीसी मोर्चाच्या अध्यक्षपदी घोषणा करण्यात आली आहे.

अर्थ आणि प्रवक्ते विभाग

कोषाध्यक्ष: मुंबईचे आमदार मिहीर कोटेचा यांच्याकडे पक्षाच्या तिजोरीची किल्ली सोपवण्यात आली आहे.

मुख्य प्रवक्ता: केशव उपाध्ये यांच्यानंतर आता नवनाथ बन हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पाहतील.

दरम्यान या कार्यकारिणीत सुजय विखे पाटील आणि अर्चना पाटील चाकूरकर यांच्या निवडीतून भाजपने पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील राजकीय समीकरणे साधण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच, गोपीचंद पडळकर आणि रामदास तडस यांच्या नियुक्तीतून बहुजन समाजाला प्रतिनिधित्व देण्यावर भर दिला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...