AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सांगली बँक निवडणूक ‘मॅचफिक्सिंग’, संजयकाका पाटील यांच्या आरोपाला, विशाल पाटील यांनी दिले उत्तर

सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतल्याने खासदार संजयकाका पाटील मॅच फिक्सिंगचा आरोप केला आहे.

सांगली  बँक निवडणूक 'मॅचफिक्सिंग', संजयकाका पाटील यांच्या आरोपाला, विशाल पाटील यांनी दिले उत्तर
vishal patil and sanjaykaka patil
| Updated on: Sep 29, 2026 | 5:45 PM
Share

राज्यातील जिल्हा बँक निवडणूकांची घोषणा झाल्याने वातावरण तापले आहे. सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा बँकांच्या निवडणूकीत चांगली चुरस पाहायला मिळत आहे. सांगली जिल्हा बँकेच्या निवडणूकांसाठी खासदार विशाल पाटील आणि त्यांची पत्नी पूजा पाटील यांनी अर्ज भरला आहे तर काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देखील प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी आपला अर्ज भरला आहे. दरम्यान, खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी नुकतीच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली होती. त्यावरुन सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक ही मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप खासदार संजयकाका पाटील यांनी केला आहे. त्यासाठीच खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम हे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी भेटल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, या दोघांनीही आपण दुष्काळ संदर्भात पालकमंत्र्यांना भेटल्याचे स्पष्टीकरण दिले आहे.

राज्यातील जिल्हा बँक निवडणुकांची (Election) रणधुमाळी सुरु झाली असून सांगली, सातारा, सोलापूर जिल्हा बँकांच्या निवडणुकीत चांगलीच चूरस पाहायला मिळत आहे. सध्याच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी मागणी खासदार विशाल पाटील यांनी केली आहे. विशेष म्हणजे, विशाल पाटील आणि त्यांच्या पत्नी पूजा पाटील या दोघांनीही उमेदवारी अर्ज भरला आहे. तसेच, काँग्रेसचे आमदार आणि माजी राज्यमंत्री विश्वजीत कदम यांनी देखील प्रथमच जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची भेट घेतली आहे. यामुळे खासदार संजयकाका पाटील यांनी ही निवडणूक म्हणून मॅच फिक्सिंग असल्याचा आरोप केला आहे.

या आरोपावरून खासदार विशाल पाटील आणि विश्वजीत कदम यांनी स्पष्टीकरण दिले आहे. खासदार विशाल पाटील,हे पालकमंत्री चंद्रकांत पाटलांना भेटले आहेत, ही वस्तुस्थिती आहे, पण जिल्ह्यातील दुष्काळाच्या प्रश्नावर आणि डीपीडीसी बाबत त्यांची चर्चा झाल्याचे काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी स्पष्ट केले आहे. तर आपण वेगवेगळ्या कामांसाठी पालकमंत्र्यांना सातत्याने भेटत असतो,बैठका घेत असतो,ही भेट आणि बैठक देखील दुष्काळी संदर्भात होती आणि ती जाहीर भेट होती, त्यामुळे त्याचा वेगळा अर्थ कोणी काढू नये, असं स्पष्टीकरण खासदार विशाल पाटील यांनी केले आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर...
शेतकऱ्यांसाठी मंदिर संस्थानांचा मदतीचा हात; शेगाव आणि तुळजापूर देवस्थानाकडून तब्बल...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM...
आझाद मैदानावरील एल्गारानंतर मातंग समाजाची मुख्यमंत्र्यांकडे धाव; CM फडणवीसांसोबत महत्त्वाची भेट
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही;
केतन अग्रवाल प्रकरणी चार्जशीटमधून... चेतन, सिया किंवा तिचा भाऊ नाही; कट रचणारी तिसरी व्यक्ती कोण?
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस..
मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा निर्णय; अग्निवीर पूर्ण करणाऱ्यांना पोलीस किंवा तत्सम पदावर मिळणार नोकरी
पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
Video : पारंपरिक चवीचा ठेवा, उंदळकालची अनोखी पाककृती, कोकणी पदार्थ
एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? राजकीय वर्तुळात चर्चा
Video : एकनाथ शिंदेच पुन्हा मुख्यमंत्री? शिवसेनेच्या नेत्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चा
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी...
सियाला सरप्राईज देण्यासाठी केतनने चक्क... वडील विशाल अग्रवालांनी स्वतः दिली डोकं चक्रावणारी माहिती
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
नाशिक कालिका यात्रेतील रहाट पाळण्याच्या लिलावावर अनियमिततेचे आरोप
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता, ; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका...
निलेश घायवळांची निर्दोष मुक्तता; तक्रारदाराच्या माघारीनंतर मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय!
मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...
Sachin Waze : मोठी बातमी! तब्बल 5 वर्षांनी सचिन वाझेला जामीन, पण...अँटेलिया प्रकरणात कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय