AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपकडून तिकीट; उमेदवारी मिळताच पवार कुटुंबाबद्दल म्हणाले….

विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने सुप्रिया सुळेंचे व्याही अरुण लखाणी यांना उमेदवारी दिली आहे. अर्ज भरण्यापूर्वी त्यांनी पवार कुटुंब आणि प्रचारावर दिलेली सविस्तर पहिली प्रतिक्रिया वाचा.

सुप्रिया सुळेंच्या व्याहींना भाजपकडून तिकीट; उमेदवारी मिळताच पवार कुटुंबाबद्दल म्हणाले....
Arun Lakhani Supriya sule
| Updated on: Jun 01, 2026 | 9:35 AM
Share

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीसाठी अर्ज भरण्याचा आज शेवटचा दिवस आहे. या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. भाजपने जाहीर केलेल्या ११ उमेदवारांच्या यादीत नागपूरचे प्रसिद्ध उद्योगपती आणि भाजपचे सह-कोषाध्यक्ष अरुण लखानी यांचा समावेश आहे. भाजपने अरुण लखानी यांना चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली या मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. अरुण लखानी हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांचे व्याही असून मुलगी रेवती सुळे यांचे होणारे सासरे आहेत. त्यामुळे या उमेदवारीची राज्यभर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

पवार साहेबांचं नाव मोठं, पण मी भाजपचा कार्यकर्ता

आता उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी अरुण लखानी यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. यावेळी त्यांना सुप्रिया सुळे आणि पवार कुटुंबाशी असलेल्या कौटुंबिक संबंधांवर प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी फारच चोखपणे उत्तर दिले. मी भाजपचा जुना कार्यकर्ता आहे. गेल्या अनेक वर्षांपासून मी भाजप पक्षाचे प्रामाणिकपणे काम करत आलो आहे. पवार साहेब हे देशातील आणि राज्यातील खूप मोठे नाव आहे. ते एक मोठे राजकीय कुटुंब आहे. त्या व्यतिरिक्त आमचे केवळ कौटुंबिक संबंध आहेत, त्यात कोणतेही राजकारण नाही, अशी प्रतिक्रिया अरुण लखानी यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून मदत मिळणार का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर त्यांनी स्पष्ट केले की, ते मला मदत करणार आहेत की नाही, हे सध्या मला माहिती नाही. पण पक्षानं माझ्यावर विश्वास ठेवून मला ही मोठी संधी दिली आहे, या संधीचं सोनं करण्याचं काम मी नक्की करेन.

सून रेवती प्रचाराला येणार का?

अरुण लखानी यांचे सुपुत्र सारंग लखानी आणि सुप्रिया सुळे यांची कन्या रेवती सुळे यांचा विवाह ठरला असून नुकतेच दोन्ही कुटुंबांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन लग्नाचे निमंत्रण दिले होते. यावर लखाणी म्हणाले, पवार फॅमिली मोठी असल्यामुळे मी सुप्रिया सुळे यांचा व्याही म्हणून निवडणूक लढवतोय, असा उल्लेख राजकीय वर्तुळात होणारच. परंतु, माझी होणारी सून रेवती सुळे प्रचारासाठी येणार नाही; कारण त्यांचा स्वतःचा महाविकास आघाडीचा उमेदवार या निवडणुकीत उभा आहे. आम्ही कौटुंबिक आणि राजकीय गोष्टी पूर्णपणे वेगळ्या ठेवल्या आहेत, असे अरुण लखानी यांनी म्हटले.

पाण्याच्या क्षेत्रातील अनुभवाचा फायदा मतदारसंघाला देणार

अरुण लखानी हे विश्वराज इन्फ्रा (Vishvaraj Group) या नामांकित कंपनीचे अध्यक्ष असून पाणी पायाभूत सुविधा आणि पर्यावरण पूरक प्रकल्पांमध्ये त्यांनी मोठे काम केले आहे. माझं मुख्य काम पाण्याच्या क्षेत्रात आहे. माझ्या या व्यावसायिक आणि सामाजिक अनुभवाचा फायदा चंद्रपूर-वर्धा-गडचिरोली मतदारसंघाच्या विकासासाठी नक्की होईल. आज उमेदवारी अर्ज भरल्यावर उद्यापासून प्रत्यक्ष प्रचाराला सुरुवात होईल, असे लखानी यांनी स्पष्ट केले. दरम्यान आज लखानी यांचा अर्ज दाखल करण्यासाठी भाजपचे अनेक वरिष्ठ नेते उपस्थित राहण्याची शक्यता आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात