AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, थेट भाजपाला धक्का, भाजप युवा मोर्चाचे..

विधान परिषदेची रणधुमाळी सुरू असतानाच शिवसेना शिंदे गटाने अत्यंत मोठा धक्का भाजपाला दिला. जळगाव जिल्ह्यातील भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. मोठ्या संख्येने हा पक्षप्रवेश झाला.

मोठी बातमी! शिवसेना शिंदे गटाचा मोठा गेम, थेट भाजपाला धक्का, भाजप युवा मोर्चाचे..
BJP and Shiv Sena Shinde faction
| Updated on: Jun 07, 2026 | 10:37 AM
Share

राज्यात विधान परिषदेच्या निवडणुका बिनविरोध व्हाव्यात याकरिता महायुतीने कस लावली. मात्र, काही ठिकाणी यश मिळाले नाही. विरोधकांकडून या निवडणुकीत मोठा घोडेबाजार झाल्याचा आरोप केला जात आहे. विधान परिषदेच्या निवडणुका महायुती म्हणून लढण्यात आल्या. यादरम्यानच आता भाजपाला मोठा दणका शिवसेना शिंदे गटाकडून देण्यात आला. जळगावमधील भाजपच्या युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांचा मुंबईत शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गट आणि भाजपात मोठी चढाओढ बघायला मिळतंय. त्यामध्येच आता जळगावात भाजपाला मोठे खिंडार पडताना दिसतंय. एक दोन नव्हे तर भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव यांच्यासह 15 जण शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. शिवसेना शिंदे गटाकडून भाजपाला मोठा धक्का दिला जात आहे.

भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष राहुल पाटील, चित्रपट कामगार आघाडीचे प्रदेश सचिव भूषण भोळे यांच्यासह 15 जणांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. आमदार किशोर पाटील यांच्या नेतृत्वात शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत या कार्यकत्यांनी मुंबईत शिवसेना (शिंदे गट) पक्षात जाहीर प्रवेश केला.

मनपा निवडणुकीत निष्ठावंतांना डावलून मर्जीतल्या लोकांना उमेदवारी देण्यात आल्याच्या नाराजीमुळे भाजप पक्ष सोडल्याची कार्यकर्त्यांनी माहिती दिली. हे कार्यकर्त्ये नाराज होते. त्यांनी आपली नाराजी वरिष्ठांकडून बोलूनही दाखवल्याचे सांगितले जाते. पक्ष सोडण्यापूर्वी या सर्व कार्यकर्त्यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्याकडे राजीनामे सुपुर्द केले होते.

त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला. विधान परिषद निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपच्या 20 वर्ष जुन्या कट्टर कार्यकर्त्यांच्या शिवसेनेतील प्रवेशाची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. शिवसेनेकडून राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये आपली ताकद वाढवली जात आहे. शिवसेना शिंदे गटाचे काही नेते भाजपावर नाराज आहेत, त्यांनी आपली नाराजी थेट जाहीरपणे बोलूनही दाखवली.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात