AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजपाला धक्का, त्या पदाधिकाऱ्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवला थेट राजीनामा

ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने थेट रविंद्र चव्हाण यांच्याकडे राजीनामा पाठवला आहे. या राजीनाम्याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे.

भाजपाला धक्का, त्या पदाधिकाऱ्याने रवींद्र चव्हाण यांच्याकडे पाठवला थेट राजीनामा
bjp flag
| Updated on: Oct 30, 2025 | 10:34 PM
Share

स्थानिक स्वाराज्य संस्थांची निवडणूक लक्षात घेता राज्यभरात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. अनेक नेते, पदाधिकारी सोईच्या पक्षात दाखल होत आहेत. राज्यभरातील अनेक नेत्यांनी भाजपात प्रवेश केला आहे. काही ठिकाणी तर सत्ताधारी पक्षांनाही धक्का बसला आहे. असे असतानाच आता भाजपाला मोठा धक्का बसला आहे. एका बड्या आणि महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने भाजपाची साथ सोडली आहे. आगामी विधानसभा निवडणूक तोंडावर असताना ही माहिती समोर आल्याने राजकीय वर्तुळात या राजीनाम्याची चर्चा होत आहे.

माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जातोय

मिळालेल्या माहितीनुसार भाजपा युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपले राजीनामापत्र भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केले आहे. “गेल्या काही दिवसांपासून माझ्यावर खोटे आरोप केले जात आहेत. माझी नाहक बदनामी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. माझ्यामुळे आपल्या पार्टीची प्रतिमा मलीन होऊ शकते,” असे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे

मोरे यांनी पुढे नमूद केले आहे की, “माझे आई-वडील, माझे कुटुंब आणि मी गेली ४० वर्षांपासून भारतीय जनता पक्षाचे काम प्रामाणिकपणे आणि अविरत करत आहोत. बुथ अध्यक्ष ते भाजयुमो प्रदेशाध्यक्ष या प्रवासात पक्षाने माझ्यावर विश्वास टाकला. आमचा परिवार आणि मी सदैव भारतीय जनता पक्षासोबत आहे आणि राहू.” असेही मोरे यांनी म्हटले आहे.

भाजपा कोणाला संधी देणार?

“भारतीय जनता पक्षाची माझ्यामुळे प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून मी हा निर्णय घेत आहे. मी सदैव ‘प्रथम राष्ट्र, नंतर पार्टी, नंतर स्वतः’ या तत्वावर निष्ठेने कार्य करत राहीन,” असेही त्यांनी पत्रात स्पष्ट केले आहे. दरम्यान त्यांच्या या अचानक राजीनाम्यामुळे युवा मोर्चा संघटनेत मोठी उलथापालथ होऊ शकते. त्यामुळे पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. सोबतच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत मोरे यांच्यावर पक्षाने काही जबाबदारी टाकली असती आता भाजपाला मोरे यांच्या जागेवर पर्यायी आणि सक्षम चेहऱ्याचा शोध घ्यावा लागणार आहे. त्यामुळे आता मोरे यांची जागा नेमकं कोण घेणार? भविष्यात मोरे काही वेगळा विचार करणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...