AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ऑफिस मिटिंगवेळी महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे पाहणं गुन्हा नाही; मुंबई हायकोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं?

मुंबई हायकोर्टाने एका महत्त्वाच्या निकालात स्पष्ट केले आहे की, कार्यालयात महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे एकटक पाहणे हे गैरवर्तन असले तरी व्हॉय्युरिझम (कलम 354-C) अंतर्गत गुन्हा मानला जाणार नाही. प्रायव्हेट ॲक्टमध्ये महिलेच्या गोपनीयतेत घुसखोरी करून फोटो/व्हिडिओ घेणे किंवा शेअर करणे हा खरा व्हॉय्युरिझम आहे, असे कोर्टाने नमूद केले. यामुळे एका एफआयआरला रद्द करण्यात आले.

ऑफिस मिटिंगवेळी महिला सहकाऱ्याच्या स्तनाकडे पाहणं गुन्हा नाही; मुंबई हायकोर्टाने आदेशात नेमकं काय म्हटलं?
मुंबई हायकोर्ट
| Updated on: Apr 17, 2026 | 1:11 PM
Share

मुंबई हायकोर्टाने व्हॉय्युरिझमशी संबंधित एका प्रकरणावर महत्त्वाचा निर्णय दिला आहे. महिला सहकाऱ्यांच्या शरीराला एकटक पाहणं चुकीचं आहे. पण त्याला व्हॉय्युरिझमचा गुन्हा मानलं जाणार नाही. कोर्टाने 8 एप्रिल रोजी हा निर्णय सुनावला आहे. अभिजीत बसवंत विरुद्ध महाराष्ट्र राज्य असा हा खटला होता. त्यात अर्जदाराने 2015मध्ये दाखल करण्यात आलेल्या एफआयआरला आव्हान दिलं होतं. मुंबईच्या बोरीवली पोलीस ठाण्यात अर्जदाराच्या महिला सहकाऱ्याने त्याच्याविरोधात एफआयआर दाखल केला होता. या प्रकरणावर मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीस अमित बोरकर यांच्या एकल पीठाकडे सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने अर्जदाराविरोधातील एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

कोर्टाने 354-C (व्हॉय्युरिझम) स्पष्ट करत, कलम 354-C तेव्हाच लागू होते, जेव्हा एखादी महिला प्रायव्हेट ॲक्टमध्ये असेल आणि तिच्या प्रायव्हसीत एखाद्या पुरुषाने घुसखोरी केली किंवा तिचे फोटो किंवा व्हिडिओ काढले तसेच ते फोटो किंवा व्हिडिओ दुसऱ्यांना पाठवले, तर तो गुन्हा आहे. त्यासाठी शिक्षा होऊ शकते. प्रायव्हेट ॲक्टचा अर्थ अशी परिस्थिती जिथे महिलांना प्रायव्हसी मिळण्याची अपेक्षा असते. उदा. स्वच्छता गृहाचा वापरण करणे, आदी, असं कोर्टाने स्पष्ट केलं.

कोर्टाने काय म्हटलं?

आरोपी फक्त ऑफिसच्या मिटिंगमध्ये महिलेच्या छातीकडे पाहत असल्याचा आरोप आहे. हे चुकीचं वर्तन आहे. पण केवळ एकटक पाहणं व्हॉय्युरिझम (कलम 354-C) सारखा गुन्हा नाहीये. कार्यालयीन ठिकाणी दुर्व्यवहार किंवा अपमानासारखे वेगळ्या प्रकारचे वाद होऊ शकतात. पण ऑफिसच्या प्रत्येक तक्रारीत व्हॉय्युरिझम (कलम 354-C) सारखा गुन्हा मानला जाऊ शकत नाही, असं कोर्टाने सांगितलं. ऑफिसचं वातावरण असह्य होऊ शकतं. पण केवळ तक्रारीच्या आधारे 354-C च्या अंतर्गत गुन्हेगारी खटला चालवला जाऊ शकत नाही, असंही कोर्टाने स्पष्ट केलं.

प्रकरण काय आहे?

2014मधील हे प्रकरण आहे. ऑफिसच्या मिटिंगवेळी आरोपी डोळ्यात डोळे घालून बोलण्याऐवजी छातीकडे एकटक पाहून बोलायचा आणि आक्षेपार्ह शेरेबाजी करायचा, असा आरोप या महिलेने केला होता. हे प्रकरण आंतर्गत तक्रार निवारण समितीकडे चौकशीसाठी दिलं होतं. समितीने चौकशी केल्यानंतर आरोपीला निर्दोष मुक्त केलं होतं. त्यानंतर या महिलेने 2025मध्ये कलम 354-C (Voyeurism) अंतर्गत आरोपीच्या विरोधात एफआयआर दाखल केला होता. त्यामुळे 2015मध्ये आरोपीने या प्रकरणाला कोर्टात आव्हान दिलं. तसेच एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. आता 8 एप्रिल रोजी कोर्टाने एफआयआर रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...