AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Buldhana | 50 हजार रुपयांत किडनी! शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला, मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी

बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी आता नाईलाजाने त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली आहे. पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकऱ्यांनी किडनी विकायला काढली आहे.

Buldhana | 50 हजार रुपयांत किडनी! शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडन्या काढल्या विकायला, मुख्यमंत्र्यांकडे मागितली परवानगी
Buldhana Farmers
| Edited By: | Updated on: Jun 10, 2021 | 1:38 PM
Share

बुलडाणा : बँकाकडून होणाऱ्या छळाला कंटाळून बुलडाण्यातील शेतकऱ्यांनी आता नाईलाजाने त्यांची किडनी 50 हजाराला विकायला काढली आहे. त्यासाठी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे परवानगी मागितली आहे. पेरणीसाठी पैसे हवे म्हणून शेतकऱ्यांनी किडनी विकायला काढली आहे. यावरुनच हे दिसून येते की बळीराजा किती हतबल झाला आहे (Budhana Farmers Selling Their Kidney For Sowing Asked Permission To CM).

पीक कर्जासाठी बँकांकडून छळ होत असल्याची तक्रार करत मलकापूर तालुक्यातील लोणवडी येथील शेतकऱ्यांनी पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी मुख्यमंत्र्यांकडे मागितलीय. उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत त्‍यांनी हे निवेदन काल पाठवलेय. त्यामुळे खळबळ उडालीये.

सध्या पेरणीचे दिवस आहे. शेतकऱ्यांना बँकांकडून कर्ज घेतल्याशिवाय पेरणी करता येत नाही. कारण कोरोना काळात लावलेल्या लॉकडाऊन यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच, यापूर्वी झालेली अतिवृष्टी, नापिकी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत.

त्यातच बँका शेतकऱ्यांना पीक कर्जासाठी त्रास देत आहेत. लोणवडी येथील दीपक पाटील, योगेश काजळे, दीपकसिंह गौर, सतीश काजळे, नितीन पाटील यांच्‍यासह अन्य शेतकऱ्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन दिलेय की सेंट्रल बँक ऑफ इंडिया, जिल्हा सहकारी बँक आणि लोणवाडी ग्रामसेवा सहकारी संस्‍थेकडून गेल्या वर्षी पीककर्ज घेतले होते. मात्र, अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे ते भरता आले नाही. आता पेरणीचे दिवस जवळ आल्याने पीक कर्जाची आवश्यकता असताना बँका कर्ज देण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळे पीक कर्जाचे पुनर्गठण आणि पेरणीचा खर्च भागविण्यासाठी किडनी विक्रीची परवानगी देण्यात यावी.

विशेष म्हणजे कोणत्‍याही गरजवंताला अवघ्या 50 हजार रुपयांत प्रतिकिडनी या दराने किडनी देण्यास तयार असल्याचे शेतकऱ्यांनी म्‍हटलेय.

Budhana Farmers Selling Their Kidney For Sowing Asked Permission To CM

संबंधित बातम्या :

शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, वाचा सविस्तर

पीक विम्यासाठी भाजप आणि मित्र पक्षांचं गंगाखेड तालुक्यात आत्मक्लेश आंदोलन

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.