शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, वाचा सविस्तर

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. (PM Narendra Modi Cabinet bid decision)

शेतकरी, सर्वसामान्यांना दिलासा देण्यासाठी मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय, वाचा सविस्तर
PM Narendra Modi
Follow us
| Updated on: Jun 10, 2021 | 11:52 AM

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत सर्वसामान्यांना दिलासा देणारे तीन मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी याबाबत माहिती दिली आहे. खरिप हंगांमाच्या पार्श्वभूमीवर किमान आधारभूत किंमत जाहीर करण्यात आली आहे. दुसरीकडे रेल्वेला 4 जी स्पेक्ट्रम वापरण्यास मंजुरी देण्यात आलीय. तेलंगाणातील रासायनिक खते निर्मिती कंपनीला अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे. ( Narendra Modi cabinet decision government of India Farmer MSP Minimum Support Price for Crops 4G Spectrum for railway)

एमएसपी 20 रुपये ते 452 रुपयांपर्यंत वाढवली

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक बाबींवरील मंत्रिमंडळाच्या समितीने 2021-22 च्या सर्व हंगामातील खरेदीसाठी खरीप पिकासाठी किमान आधारभूत किंमती (एमएसपी) मध्ये वाढ करण्यास मान्यता दिली आहे. शेतकरी उत्पादकांना त्यांच्या उत्पन्नाच्या मोबदल्याची रास्त किंमत मिळावी, या उद्देशाने सरकारने खरीप पिकांचा एमएसपी वाढवला आहे. मागील वर्षांच्या तुलनेत एमएसपीमध्ये सर्वाधिक वाढीची शिफारस तीळ 452 रुपये प्रति क्विंटल आणि त्यानंतर तूर आणि उडीद 300 रुपये प्रति क्विंटलसाठी करण्यात आली आहे. भूईमूग किंवा शेंगदाणा आणि नाचणी बाबतीत गतवर्षीच्या तुलनेत अनुक्रमे 275 आणि 235 रुपयांची वाढ करण्यात आली आहे.विविध प्रकारच्या पिकांची लागवड व्हावी म्हणून वेगवेगळ्या पिकांसाठी वेगळी एमएसपी जाहीर करण्यात आली आहे. सर्वात कमी एमएसपी मका पिकाची वाढली आहे. मका पिकाची एमएसपी 1850 वरुन 1870 वर गेली आहे.

4G स्पेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी

प्रकाश जावडेकर यांनी केंद्र सरकारनं 4G स्प्रेक्ट्रम रेल्वेला वापरण्यास परवानगी दिली आहे. आतापर्यंत रेल्वे संदेशवहनासाठी 2G स्पेक्ट्रम वापरत होते. आता रेल्वेला 700 मेगा हर्टझ बँड दिला जाईल. रेल्वेला या निर्णयाचा फायदा होईल आणि सुरक्षा यावर फरक पडेल, असं सांगण्यात आलं आहे. अत्याधुनिक स्पेक्ट्रमच्या वापरामुळं रियल टाईम कम्युनिकेशन होणार आहे. ऑटोमेटिक ट्रेन प्रोटेक्शन व्यवस्थेमुळे रेल्वे व्यवस्था मजबूत होणार आहे. रेल्वेला 4G स्पेक्ट्रम संदेशवहन प्रणाली विकसित करण्यासाठी 25 हजार कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. हे काम येत्या 5 वर्षात पूर्ण होईल.

तेलंगाणातील खत कंपनीला अनुदान

2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर नव्यानं स्थापन होणाऱ्या खतनिर्मिती कंपनीला अनुदान देण्याचं जाहीर केलं होतं. त्यानुसार तेलंगाणातील रामगुंडम फर्टिलायजर आणि केमिकल फॅक्टरी स्थापन झाली आहे. या धोरणानुसार रामगुंडम खतनिर्मितीला कंपनीला अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील कंपनीतून 12 लाख 70 हजार मेट्रिक टन यूरिया उत्पादन होईल. यूरियाची आयात कमी होईल.

संबंधित बातम्या

खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?

उद्धव ठाकरेंनी नरेंद्र मोदींपुढं मांडलेलं पीक विम्यांचं बीड मॉडेल नेमकं काय?

(Narendra Modi cabinet decision government of India Farmer MSP Minimum Support Price for Crops 4G Spectrum for railway)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान
लोकसभा निवडणुकीतील कमी जागांवर शरद पवार यांचं मोठं विधान.
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित
एअर इंडियाची तेल अवीवमध्ये जाणारी सेवा 30 एप्रिलपर्यत स्थगित.
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.