ST Bus News : एसटी बसच्या चालकाने गाडीच्या काचा फोडण्याचा दिला आदेश, मग ‘त्या’ गावातील तरुणांनी…

| Updated on: Jul 13, 2023 | 10:29 AM

buldhana news : एसटी का थांबवली म्हणून चालक आणि वाहक यांच्यात मोठा वाद झाला. गाडीत प्रवासी म्हणून बसलेल्या वाहकाने त्या गावातल्या तरुणांना दिला आदेश, मग...

ST Bus News : एसटी बसच्या चालकाने गाडीच्या काचा फोडण्याचा दिला आदेश, मग त्या गावातील तरुणांनी...
MSRTC NEWS
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

गणेश सोलंकी, बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यात एक भयानक प्रकार घडला आहे. एसटी बस (ST Bus News) न थांबवल्यामुळे गाडीत बसलेल्या एका चालकाने दुसऱ्या चालकाशी आणि वाहकाशी हुज्जत घातली. ज्यावेळी चालू एसटीत बाचाबाची सुरु होती. त्यावेळी गाडीत प्रवासी सुध्दा होते अशी माहिती मिळाली आहे. बुधवारी सकाळी बुलढाणा (Buldhana news) आगारातून धुळे आगारात ही बस निघाली होती. एसटीच्या चालकाने (MSRTC NEWS) एसटीच्या काचा फोडण्याचे तरुणांना फर्मान दिल्याने अनेकांना आच्छर्य वाटले आहे. विशेष म्हणजे त्या चालकावरती आगार काय कारवाई करणार याकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे.

बुलढाणा आगाराची एसटी बस धुळ्याला निघाली होती. त्या बसमध्ये जळगाव येथे धुळे आगारात बस चालक असलेले प्रभाकर बाजीराव पारधी हे बसले. बस चालक प्रभाकर बाजीराव पारधी यांना मुगटी या गावी जायचं होतं. परंतु मुकटी या गावाला एसटीचा थांबा नसल्यामुळे चालकाने गाडी तिथं थांबवली नाही. गाडीत बसलेल्या प्रभाकर बाजीराव पारधी यांनी तिथं असलेल्या चालकाला थांब्यावर उभ्या असलेल्या लोकांना गाडीत का घेतलं नाही असा जाब विचारला.

त्यावेळी वाहक आणि चालक यांच्यात जोराचा वाद झाला. त्यानंतर प्रभाकर बाजीराव पारधी यांना राग अनावर झाला. त्यानंतर त्यांनी पुढच्या गावातील तरुणांना रस्त्यावर येण्यास सांगितले, त्याचबरोबर गाडीच्या काचा फोडा असाही आदेश दिला.

हे सुद्धा वाचा

एसटी बसलेले चालक हे धुळे आगारात चालक म्हणून नोकरी करतात. चालकाने कशा पद्धतीने धमकीचा फोन केला, याचा व्हिडीओ एसटीतील वाहकाने मोबाईलमध्ये कैद केला आहे.

विशेष म्हणजे ज्यावेळी धुळे आगारात बस पोहोचली, त्यावेळी एसटीच्या वाहकाने त्या चालकाची तक्रार दाखल केली आहे. त्या चालकावरती काय कारवाई होणार याची सगळे वाट पाहत आहेत. वरिष्ठांकडे तक्रार केल्यामुळे कारवाई होण्याची शक्यता आहे, एस टी चालक वाहक संघटनेने सुध्दा त्या चालकावरती कारवाईची मागणी केली आहे.