ग्रामीण भागातील शेतीच्या कामाला वेग, बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत

रब्बी हंगामात पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारल्याचे आंतरपीक घेतल्याने शेतकऱ्याला त्याचा चांगलाचं फायदा झाला आहे. भरघोस पीक, शेतीच्या पहिल्याच प्रयोगात कडू कारल्याने पवन मावळातील शेतकऱ्याचे तोंड गोड केलंय.

ग्रामीण भागातील शेतीच्या कामाला वेग, बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत
farmer puneImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 9:53 AM

परळी : परळी (parali) तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पावसाळा (rain update) तोंडावर आला असून शेतीची कामे करण्यास वेग आला आहे. शेतीची मशागत, पाळी घालने, धसकट विचणे आदी कामे अंतिम टप्प्यात आली आहेत. अनावश्यक तण उगवणार नाही याची देखील शेतकऱ्यांनी काळजी घेतली आहे. मात्र याचबरोबर आवश्यकतेनुसार शेतात पाणी साठवणे व निचरा होण्याची व्यवस्था करणे, यासाठी बांधबंदिस्ती करण्यात येत आहे. पावसाळा तोंडावर आला असून पावसाळ्यापूर्वीच्या शेतीच्या कामाला वेग आला आहे. सध्या शेतातील कामे (maharashtra farmer news) करण्यासाठी मजूर मिळेनासे झाले असल्याने घरातील सर्व जण एकत्र येऊन शेतात कामे करत आहेत.

भाताच्या आगारात कडू कारले पीक जोमात

रब्बी हंगामात पारंपरिक शेतीला फाटा देऊन आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून कारल्याचे आंतरपीक घेतल्याने शेतकऱ्याला त्याचा चांगलाचं फायदा झाला आहे. भरघोस पीक, शेतीच्या पहिल्याच प्रयोगात कडू कारल्याने पवन मावळातील शेतकऱ्याचे तोंड गोड केलंय. या मालाला चाकण, पुणे मार्केटयार्ड, लोणावळा, देहूरोड, पिंपरी-चिंचवड मार्केटमध्ये चांगली मागणी आली आहे. त्यामुळे शेतकऱ्याला त्याचा चांगला फायदा झाला आहे.

शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली

नंदूरबार जिल्ह्यातील धडगाव आणि अक्कलकुवा तालुक्यात मध्यरात्री जोरदार अवकाळी पावसाची हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतीतून काढून ठेवलेला माल आणि चारा याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. तर गेल्या काही दिवसापासून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. रात्री तोरणमाळ आणि मोलगी परिसरात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसामुळे घराचं नुकसान देखील होण्याची शक्यता आहे. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. यावर्षी हवामान खात्याने 16 जूनपर्यंत पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. परंतु अधून-मधून येणाऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांना पेरणी करण्यासाठी मोठे अडचण निर्माण होणार आहे, तर शेतकऱ्यांमध्ये वेळेवर पाणी पाऊस पडणार का असा संभ्रम आहे.

हे सुद्धा वाचा

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत.

या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान
या 40 गद्दारांचा सूड आपल्याला घ्यायचा आहे, संजय राऊत यांचे आव्हान.
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे
नशीब मोदी येणार म्हणून बाप्पाला पुढची तारीख दिली नाही - उद्धव ठाकरे.
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा
'...तोपर्यंत मुख्यमंत्री पदावर...,' केजरीवाल यांनी काय केली घोषणा.
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी
मला पंतप्रधान पदाची ऑफर होती, परंतू...काय म्हणाले गडकरी.
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की...
लाडकी बहिण योजनेवरुन शरद पवार यांचा राज्य सरकारला टोला, म्हणाले की....
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?
आनंद आश्रमातील प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल तर काय म्हणाले शिंदे?.
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?
तो निर्णय आम्हाला मान्य, खडसेंच्या प्रवेशावर काय म्हणाले फडणवीस?.
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ
देवेंद्र फडणवीसांनी नागपुरात दणक्यात वाजवला ढोल, बघा व्हिडीओ.
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?
आता मराठी विषय सक्तीचा... सरकारी-खासगी शाळांना शासनाचा निर्देश काय?.
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल
दिघे असते तर... आनंद आश्रममधील घडलेल्या प्रकाराबाबत राऊतांचा हल्लाबोल.