खर्च केलेले पैसे सुध्दा निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने कांदा पेटवला

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठं नुकसान केलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडं मोडल आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे.

खर्च केलेले पैसे सुध्दा निघत नसल्यामुळे शेतकऱ्याने कांदा पेटवला
farmer newsImage Credit source: tv9marathi
Follow us
| Updated on: May 28, 2023 | 1:57 PM

अहमदनगर : कांद्याचे भाव (Onion prices) गडगडल्याने कांदा उत्पादक शेतकरी (Farmer) हवालदिल झाले आहेत. कांद्याला कवडीमोल दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. एकरी ५० हजार रुपये खर्च करून पिकवलेल्या कांद्याचा उत्पादन खर्च मिळत नसल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्याने (farmer news) शेतात काढून ठेवलेल्या कांद्याला आग लावली. राहुरी तालुक्यातील मानोरी येथील अमोल भिंगारे या तरुण शेतकऱ्याने हे टोकाचं पाऊल उचललं आहे, माय बाप सरकार कांदा उत्पादकांकडे लक्ष देणार का ? असा प्रश्न सुद्धा त्या तरुणाने उपस्थित केला आहे.

गोंदिया जिल्ह्यात वादळी वाऱ्याने घातले थैमान

गोंदिया जिल्ह्यातील आमगाव आणि गोरेगाव तालुक्यामध्ये सायंकाळच्या सुमारास जोरदार वादळी वारा आणि विजेच्या गडगडासह पावसाने हजेरी लावली. वादळी वाऱ्यामुळे दोन्ही तालुक्यातील अनेक झाडे पडून खाली पडली. अनेक भागांमध्ये विजेच्या तारांवर झाड पडल्यामुळे अनेक भागातील पुरवठा खंडित करण्यात आला होता. या वादळीवाऱ्यामुळे आंबा पिकास मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून शहरी आणि ग्रामीण भागात या वादळी वाऱ्याचा मोठा प्रभाव दिसून आला. त्यामुळे अनेक पिकांच्या बरोबर घरांची आणि फळबागांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे. एवढेच नाही तर वादळी वाऱ्याचा फटका रेल्वे विभागालाही बसला असून रेल्वे विभागात टिनाचे पत्रे उडून रेल्वे वाहतूक करणाऱ्या तारांवर अडकल्यामुळे काही काळ मुंबई हावडा रेल्वेमार्ग आमगावमध्ये बंद ठेवण्यात आला होता.

हे सुद्धा वाचा

कांदा पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम

धुळे जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने कांदा पिकांचे मोठं नुकसान केलं असून कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे कंबरडं मोडल आहे. मोठ्या कष्टाने पिकवलेल्या कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याने धुळे जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला आहे. कांदे फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. कांदा उत्पादनासाठी अग्रेसर मानले जाणाऱ्या धुळे तालुक्यातील परिसरात शेतकऱ्यांनी शेतातच कांदा फेकला. भाव मिळत नसल्यामुळे अखेरीस खत बनवण्यासाठी कांद्याचा वापर केला जात आहे. अवकाळी पावसामुळे कांदा पिकाच्या उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने कांद्याचे दर घसरत असल्याने शेतकऱ्यांची चांगलीच आर्थिक कोंडी झाली आहे.

जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु
जळगावात रेल्वे अपघातातील ११ बळी प्रवाशांची ओळख पटविण्याचे काम सुरु.
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं
जळगावात 'पुष्पक'मधून थेट रूळावर उड्या अन् दुसऱ्या ट्रेननं उडवलं.
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं
धसांकडून परळीतील दोन खुणांचा खुलासा, एकाची हत्या तर एकीला जीवंत जाळलं.
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्
सैफच्या हॉस्पिटल बिलावरून नवा वाद, सर्वसामान्यांना 5 लाख देत नाही अन्.
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय
निकष धुडकावून 1500 रूपये घेतले, अशा 'बहिणीं'साठी सरकारचा मोठा निर्णय.
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर
अखेर सैफनं 'त्या' रिक्षाचालकाची भेट घेतली, फोटो आला समोर.
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार
Beed Case BIG Breaking: सरपंच हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे फरार.
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'
'उदय सामंत भटकती अन् लटकती आत्मा, दावोसला आमदार फोडायला गेलेत'.
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ
सरपंच हत्येबद्दल मुंडे स्पष्टच बोलले, जे हत्यारे आहेत, त्यांना तात्काळ.
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'
कराडला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी अन् जरांगे म्हणाले, '..आरोपी एकच'.