या गावांना चक्रीवादळाचा फटका, केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे…

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या गावांना चक्रीवादळाचा फटका, केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्यामुळे...
banana
Follow us
| Updated on: May 29, 2023 | 12:15 PM

जळगाव : काल रात्री चक्रीवादळासह मुसळधार पावसामुळे (heavy rain) रावेर तालुक्यातील अहिरवाडी, पाडला, खानापूर तसेच मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर जिल्ह्यातील अनेक गावांना या चक्रीवादळाचा फटका बसलाय आहे. केळी उत्पादक शेतकरी (maharashtra farmer news) मोठ्या प्रमाणात संकटात सापडला आहे. कापणीवर आलेल्या केळी बागा (banana cultivation) जमीनदोस्त झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तात्काळ पंचनामे करून शासनाने हेक्टरी 50 हजार रुपये नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी (unseasonal rain) केली आहे.

पुढील चार दिवस पावसाचा अंदाज

मागील काही दिवसांपासून भंडारा जिल्ह्यात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यामुळं शेतकरीवर्ग पुरता हतबल झाला असून शेतातील पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. उन्हाळा सुरू झाला असला तरी पावसानं मात्र उसंत घेतली नसल्याचे चित्र सध्या सर्वत्र बघायला मिळत आहे. हवामान विभागानं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पुढील चार दिवस पावसाचा अंदाज वर्तविला असून काल दुपारच्या सुमारास भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्याला अक्षरश: ताशी 40 पेक्षा अधिक वेगानं आलेल्या वादळानं झोडपून काढलं आहे. त्यातच मुसळधार पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. कापणीला आलेले धान या गारपीटमुळे अक्षरश: धनाच्या लोंब्या जमीनदोस्त झाल्या आहेत. तर, या अवकाळी पावसामुळे फळबाग आणि पालेभाज्यांची शेती ही नष्ट झाल्याने शेतकरी आता आर्थिक संकटात सापडले आहेत. अनेक ठिकाणचे वृक्ष कोलमडून पडल्याने काही ठिकाणी वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेकांच्या घरावरील टीन पत्रे उडाल्याने घरगुती साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

उन्हाळी पिके वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक

सीना कोळगाव धरणातून भोत्रा बंधाऱ्यात उन्हाळी आवर्तन पाणी सोडण्याबाबत करमाळा तालुक्यातील आवाटी व नेरले येथील सर्व शेतकऱ्यांनी व नागरिकांनी उपकार्यकारी अभियंता कार्यालय परंडा यांना निवेदन दिले असून याद्वारे पाणी सोडण्याची मागणी केली आहे. शेतकऱ्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भोत्रा बंधाऱ्यातील शेतकऱ्यांनी यावर्षी उन्हाळी पिक, ऊस, भुईमूग, या पिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. या बंधाऱ्यावर आवाटी, रोसा, नेरले, भोत्रा, मुंगशी, लोणी, परंडा आदी गावचे या लाभक्षेत्रात येत आहेत. या बंधाऱ्यावर 383 हेक्टर एवढे आहे. आज रोजी नदी व बंधारा कोरडा पडला असून उन्हाळी पिके वाचवण्यासाठी पाणी अत्यंत आवश्यक आहे.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.