AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार

लोकांना अगदी नाईलाज झाला तरच ते पोलीस ठाणे आणि कोर्टाची पायरी चढत असतात. मात्र,कोणी तुरुंगात रात्र काढणे पसंद करेल काय ? परंतू ही बातमी खरी आहे. असा तुरुंग अस्तित्वात आहे आणि त्यात एक रात्र काढण्यासाठी लोक हजारो रुपये खर्च करण्यासही तयार आहेत.

या डेंजर तुरुंगात रात्र घालवण्यासाठी लोक म्हणतात होऊ दे खर्च ! एका रात्रीचे इतके पैसे मोजायला तयार
pentridge jail
| Updated on: Feb 13, 2026 | 5:29 PM
Share

तुरुंगात रात्र घालवणे हे ऐऱ्या गबाळ्याचे काम नाही, कारण येथे रात्र काढताना भल्याभल्यांची बोबडी वळते.अनेक नामीगिरामी खून, दरोडे आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपींचा तुरुंगात सहवास मिळू शकतो. त्यामुळे तुरुंग म्हटला की घाम फुटतो. परंतू ऑस्ट्रेलियात जगातील खतरनाक तुरुंगात रात्र काढायला अनेक श्रीमंत एका पायावर तयार असतात. ऑस्ट्रेलियात सर्वात खतरनाक जेल आहे जेथे पैसे देऊन रात्र काढण्यासाठी लोक येत असतात. यास तुम्ही वेडेपणा म्हणाल परंतू गोष्ट वेगळीच आहे.

डेली मेलच्या बातमीनुसार ऑस्ट्रेलियातील जगातील सर्वात खतरनाक जेल पैकी एक असलेल्या एचएम  प्रिजन पेंट्रिज तुरुंगात लोकांना एक रात्र काढण्यासाठी किमान २८ हजार रुपये खर्च करावा लागतो. कारण हा तुरुंगाचे रुपांतर फाईव्ह स्टार हॉटेल सारखे केला आहे. या जेलमध्ये कधीकाळी ऑस्ट्रेलियाचा सर्वात कुख्यात आरोपींचे घर झाले होते. यात रोनाल्ड जोसेफ रयान आणि मार्क ‘चॉपर’ रीड सारख्या गँगचे सदस्यांनी देखील शिक्षा भोगली आहे. ऑस्ट्रेलियात फाशी झालेला हा शेवटचा कैदी आहे.

खतरनाक आरोपींचे माहेर घर

येथे उतरणारे गेस्ट त्या हॉल आणि रुममध्ये राहु शकतात जेथे कधी काळी सर्वात खतरनाक आरोपी फिरायचे. या रुमचे एकारात्रीचे भाडे  AU$449.00 म्हणजे 28 हजार रुपयांपासून सुरु होते. या जेलच्या मध्यभागी एक आलिशान अंडरग्राऊंड तुरुंग आहे. यात तयार करण्यास तीन महिन्यांहून जास्त काळ लागला होता. कारण त्याची निर्मिती तुरुंगाच्या मूळ स्वरुपांना धक्का न लावता केली आहे.

अनेक लक्झरी सुविधा

हा तुरुंग आता 5 स्टार रुममध्ये परावर्तित झाला आहे.त्यामुळे बाहेरुन आत जाताना आपण तुरुंगात जात आहोत असा फिल येतो. परंतू आता लक्झरीयस सुविधा आहे. यात हॉटेलमध्ये १९ स्युईट आहेत. ज्यांना चार वा पाच रुमंना आतून जोडण्यासाठी जाड्या निळ्या दगडांच्या भींतींना तोडून तयार केले आहे. प्रत्येक रुमला घुमटाकार छत आणि दगडांच्या भींती आहेत. पूर्वीचा हेरिटेज लूक आणि आत आधुनिक सुविधा आहेत. यात हंटर लॅब हेअर आणि स्कीनकेअर सह अनेक लक्झरी सुविधा आहेत. स्थानिक वस्तूंनी सुसज्ज एक शानदार मिनीबारही आहे.

140 एकर भागात भागात वसलंय जेल

1851 ते 1997 मध्ये हा खरोखरचा तुरुंग होता. 19 व्या शतकात ऑस्ट्रेलियाच्या व्हिक्टोरियामध्ये निर्मित सर्वात मोठा तुरुंग परिसर होता. एचएम प्रिझन पेंट्रिजची स्थापना 1850 मध्ये झाली होती, जी मेलबर्नपासून 8 km उत्तरेकडे पेंट्रिज नावाच्या 140 एकर भागात झाली होती. आज या भागाला कोबर्ग नावाने ओळखले जाते. सरकारद्वारा तुरुंगाचे खाजगीकरणांतर्गत यास बंद केले गेले. व्हिक्टोरिया राज्य सरकारने या पेंट्रिजला स्वतंत्र इस्टेट डेव्हलपर्सला विकले. त्यानंतर 2023 मध्ये हे हॉटेल उघडले.

Follow Us
मी पुन्हा येईल, मी... फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
Abhijeet Dipake On CM Fadnavis : जेलमध्ये टाकलं तर... मीच तेच म्हणेल जे तुम्ही म्हणायचे; मी पुन्हा येईल, मी पुन्हा येईल...मुख्यमंत्री फडणवीसांच्या इशाऱ्यावर दिपकेंचं प्रत्युत्तर
खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
Abhijeet Dipke : खाकी वर्दी नको, तर खाकी...; सचिन शर्मांवर अभिजीत दिपकेंचा जोरदार हल्लाबोल
मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं कौतुक
Abhijeet Dipke : मुंबई पोलीस OG Pookie, कुच्चू पुच्चू; अभिजीत दिपकेंकडून मुंबई पोलिसांचं तोंडभरून कौतुक
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ते.....
CJPच्या आंदोलनातील मिम पोस्टर्सची चर्चा; ‘ग्यानू मस्ट गो’पासून ‘वोटचोर ग्यानू’पर्यंत भन्नाट पोस्टर्स होतायेत व्हायरल
दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; शिरसाटांचा विरोधकांना..
Sanjay Shirsat : दिशा सालियन प्रकरणात हीच भूमिका का घेत नाही?; संजय शिरसाटांचा विरोधकांना थेट सवाल, पुढे म्हणाले...
CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच..
Mumbai CJP Protest : ज्ञानेश कुमारांविरोधात शिवाजी पार्कवर रणकंदन; CJPच्या आंदोलनाला महाराष्ट्रभरातून कार्यकर्त्यांची गर्दी, VIDEO बघाच...
परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी....
Mumbai CJP Protest : परवानगी नाकारली, तरी शिवाजी पार्कवर प्रचंड गर्दी;  ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्यासाठी CJPचं जेलभरो आंदोलन
हे आंदोलन म्हणजे..; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले
Ashish Shelar : हे आंदोलन म्हणजे....; आशिष शेलारांचा आंदोलकांवर थेट घणाघात, पुढे म्हणाले...
व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : व्यापाऱ्यांचा UPI शुल्काला विरोध. काळ्या दिवाळीचा इशारा
Video : ठाकरे बंधूंवर विखे पाटलांनी साधला निशाणा
Video : राजकीय प्रतिमा परत मिळवण्यासाठी ठाकरे बंधूं..., विखे पाटलांनी साधला निशाणा